काजव्यांचे शेतीमधील योगदान फार जाणकारक आहे.ते महत्व फक्त शेतकरी मित्रच समजू शकतात. मी लहान असतात पावसाळा सुरू झाला की ठिकठिकाणी काजवे लुकलुकत असत.आम्ही त्याला आग्या मन्ह्त असो.माझी आई मला काजवा दाखवत असायची आणि मी त्या काजव्याच्या मागे पळत राहायचो.आणि मला काजवा सापडताच मला खूप आनंद होत होता.तो मग मी छोट्या आगपे…
अधिक वाचापावसाळा मध्ये पेरणी चे संकेत देणारा पावशा पक्षी.शेतकरी मित्र या संकेताची नेहमी आवर्जून वाट पाहत असतात. पावसाळा सुरू झाला की , पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जंगल, माळरान, शेते, पर्वत तुडवीत असताना एक पक्षी दिवसभर ओरडताना आढळतो. ‘पेरते व्हा, पेरते व्हा.’ शेतकरी मित्रांना कोणत्या दिवशी पेरणी करायला पाहिजे ते सांगितले जाते.कधी …
अधिक वाचापावसाळ्यात साप का बाहेर येतात.सर्पदंश सर्वात जास्त पावसाळ्यात का होते. पावसाळ्यात सर्वदूर पाऊस असते.जमिनी ओल्या असतात.बिळात सुद्धा पाणी असते.त्यामुळे थंडी जास्त पसंद नाही आल्याने साप बाहेर येतात.कोरड्या जागी ठिकाण शोधू शकतात. ◾साप चावल्यावरचा रामबाण उपाय शेतकरी मित्रांनी काय करायचा आहे. तुम्हाला माहिती असेल की साप चावला …
अधिक वाचानमस्कार शेतकरी मित्रांनो. मी जैविक शेती मित्र निखिल तेटू. शेतकरी बांधवांना माझी थोडी विनंती आहे कि, सर्व शेतकरी मित्र राऊंड अप तणनाशकांचा वापर फार मोठ्या प्रमाणात करत आहेत.पावसाळा सुरू होताच तण नियंत्रण करण्यासाठी खूप मागणी वाढत आहे. त्या गावांमध्ये आणि शेतामध्ये फार मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे प्रमाण वाढले…
अधिक वाचानियोजन आपल्या शेतातील शेणखताचाचे.व्यवस्थापन जमिनीतील सूक्ष्म जीवाणू खतांचे आणि गांडूळ खताचे. 1) एका ठिकाणी जमा केलेल्या शेणखता चे ढीग आपल्याला दिसत असतात.तर आपण स्वतः 12*4*2 फूट आकार ठेऊन शेण खत ढीग तयार करावा.म्हणजे लवकर हवा उन्ह पाणी मिळणार.बेड मध्यम सावली मध्ये लावावा.जिवाणू लवकर सक्रिय होवून वाढणार.तिथे शेतातील वन्य …
अधिक वाचाजांभूळ जंगली फळ खाल्ल्यानं होणारे आरोग्यदायी फायदे.तसेच विषमुक्त पद्धतीने तयार होत असल्याने यात मधुमेह, हदयविकार, पोटाचे विकार आणि त्वचाविकारावर ह्या समस्या लवकर नियंत्रणात येतात. - मृण्मयी पगारे मे महिना संपताच जूनचा काळ म्हणजे बाजारात जांभळं मिळतातंच. पाऊस सुरू होतात. मोसमी वारे वाहू लागतात.पक्षी आनंदाने नाचू लागतात. …
अधिक वाचासर्व पिकात मिश्रपीक पद्धतीच्या अवलंब करणे खूप फायद्याचे आहे .कोणत्या मिश्र पिकात कोणते पीक लागवड करायची ते माहिती . १ ) भात - ग्लिरिसिडीया, मका, चवळी. २ ) सोयाबीन - मका, तीळ, धने, मेथी, तूर, सापळा - एरंडी व सुर्यफुल. ३ ) कापूस - भेंडी ,गवार,तुर,चिकणी ज्वारी,नाचणी,बडीशोप,अजवाईन/ओवा,भगर,बाजरी मटकी,सुर्यफुल,म…
अधिक वाचाट्रायकोडर्मा -एक नैसर्गिक रोगनाशक बुरशी अलीकडे रासायनिक बुरशीनाशकाला पर्याय म्हणून ट्रायकोडर्मा बुरशीचा उपयोग पिकावरील रोग नियंत्रणासाठी होवू लागला आहे . पिकावरील मुळ कुजवा व मर या रोगाचे नियंत्रण ट्रायकार्डमा बुरशीमुळे करता येते . ट्रायकोडर्माच्या दोन प्रजाती वापरात आहेत . एक ट्रायकोडर्मा हरजीएनम व दुसरी ट्रायकोडर्मा व्हि…
अधिक वाचामित्र कीटक लेडी बर्ड बीटल कसा ओळखायचा.लेडी बर्ड बीटल शेतात काम कसे करतो. शत्रू किड कसं नियंत्रण करतात. मित्र कीटक लेडी बर्ड बीटल एक शिकारी आहे.लेडीबर्ड बीटल या किटकाचे प्रौढ भुंगे व त्यांच्या अळ्या प्रामुख्याने मावा किडीवर जगतात.लेडीबर्ड बीटलची अंडी रंगाने पिवळसर व आकाराने लांबुळकी असून, समूहामध्ये पण उभी घातलेली असतात. …
अधिक वाचा◾मुट्टई रस्सम ◾अंडा संजीवक भारताच्या दक्षिण प्रांताची, कृषी प्रधान देशाला मिळालेली ही एक बहुमूल्य निविष्ठा आहे.शेतकरी मित्रांनी ही निविष्ठा विसरायला नाही पाहिजे.प्रत्येक शेतकरी मित्रांनी वापर करायला पाहिजे.अंड्याला तमीळ भाषेत मुट्टई व मल्याळी भाषेत मुट्टा हे संबोधले जातात .याचा अर्थ मुट्टई म्हणजे अंडे व रस्सम म्हणजे त्यापासून बनविल…
अधिक वाचापिकात सुत्रकृमि नियंत्रण करण्यासाठी देशी झेंडू आणि पपई , डाळिंब पीक लागवड.फळबाग लागवड मधमाश्या व मित्र किड आकर्षण करण्यासाठी करावी. देशी झेंडूत अफ्लाटर्थोनाईल हे रसायन सुत्रकृमी/ निमॅटोड ,सुत्रकृमि नाशक आहे म्हणून काम करतात.त्यामुळे सुत्रकृमि ,निमॅटोड नियंत्रण करण्यासाठी देशी झेंडू च लावावा प्रत्येक शेतकरी मित्राने आपल…
अधिक वाचामी निखिल मधुकर तेटू माझ्या वयाच्या १३ वर्षा पासून मी माझ्या, घरच्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहे. तसेच मी शेती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याने करत आहे. माझी शेती ५ एकर असून सर्व शेती जैविक पद्धतीने सुरू आहे. तसेच जैविक निविष्ठा मी स्वतः वापर करून विषमुक्त अन्न तयार करतो. माझ्या शेतात मी जैविक शेती जेव्हा पासून सुरू केली तेव्हा पासून मला मधमाशी ,फुलपाखरू, सोनपाखरू, पक्षी दिसतात. खूप मोठ्या प्रमाणात दिसत असल्याने यांच्याशी मला खूप प्रेम आहे. त्यांना जेवण सुद्धा विषमुक्त मिळत असल्याने माझे प्रिय मित्र कीटक माझ्या शेतातच राहतात. मी माझ्या शेतात सर्वात जास्त वापर शेणखताचा करतो. नाडेप कंपोस्ट खत प्रक्रिया चा वापर करतो. मी प्रक्रिया केलेले शेणखत, गांडूळ खत व गांडूळ पाणी यांचा वापर करतो.कंपोस्ट खत, सोनखत, एरंडी पेंड,निम पेंड,करडई पेंड,मासोळी खत,हाडांचा चुरा,रॉक फॉस्फेट (राख) यांचा सेंद्रिय कर्ब म्हणून वापर करतो.बोरू धेंचा ताग शेतात पेरणी करून फुल अवस्था मध्ये कापणी केली जाते व ते जमिनी मध्ये सेंद्रिय कर्ब वाढवितो व ते आच्छादन म्हणून सुद्धा वापर करतो. माझ्या शेतात जमिनीला पोषक असे जिवाणू खते मी स्वतः बनविलेले आहे व वापर केलेले आहे जीवामृत, पंचगव्य, जैविक ह्यूमिक ,तांदूळ पेज,बेल रसायन, आवळा रसायन, जिवाणूपाणी कल्चर, फळांचा सडवा,GA, जिवाणू वाढविणे,पळसाची फुले, जैविक पोटॅश, तरल खत, राख, गारबेज enzymes व गूळ फवारणी करतो. शेतात बीजप्रक्रियासाठी मी नेहमी यांचा वापर करतो. :- गावरान गायचे ताजे शेण,गोमूत्र,हिंग,हळद, काळा गूळ, वारूळ माती किंवा सुपीक माती,मासोळी तैल. तसेच मला बीजप्रक्रिया स्पर्धा मध्ये Second Prize सुद्धा मिळाले आहे. जैविक पद्धतीने मी स्वतःबनविलेले कीटकनाशक:- निम अर्क, दशपर्णी अर्क, तरल खत, अंडा संजीवक,बाजरी कीटकनाशक, हिंगनास्त्र,अग्निहोत्र राख,करंज तेल, कीटकनाशक, ब्रह्मास्त्र,महाअस्त्र, CVR . जैविक बुरशीनाशक :- दही तांबे धातू, अग्निहोत्र राख,गोमूत्र ताक गूळ, ताक तांबे धातू , मासोळी तैल.तसेच मदर कल्चर आणून Trico derma virodi बनविणे नंतर multiply करून वापर करणे. जैविक पद्धतीने कीटक नियंत्रण साठी मी प्रयोग केलेले स्वतः :- प्रकाश सापळे लावणे,लाईट ट्रॅप बांधावर लावणे,पक्षी थांबे,पिवळे निळे चिकट सापळे,मिश्रपीक पद्धती, ऑईल लावून साडी फिरविणे , पांढरा कागद प्लास्टिक आणून शेतात फिरविणे. मित्र कीड संगोपनसाठी मी दरवर्षी वापर करतो:- ट्रायकोग्रामा मित्र कीटक संगोपन कार्ड वापर करणे.पक्ष्यांना अन्न सहज उपलब्ध करून देणे.मधमाशी यांना पाणी फुले जवळपास उपलब्ध करून देणे. शेतात बाजारातील रसायने कोणतेही वापर न करणे. मला संधी कृषी कॉलेजवर जैविक शेती विषमुक्त अन्न हे प्रशिक्षण देण्यासाठी मिळाली आहे. जैविक शेती संगोपन विषयी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलेले आहे.तसेच कृषी विज्ञान केंद्र मध्ये सुद्धा प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिलेले आहे.माझ्या शेतकरी मित्रासाठी मी घरी आणि माझ्या शेतात जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र उघडले आहे.माझे स्वतःचे काही ग्रुप असून मी शेतकरी मित्रांना रोज जैविक शेती ,बाजार,विक्री माहिती देतो.हवामान विषयक सुद्धा महिती देतो.तसेच मी माझ्या सर्व शेतकरी मित्रांची विषमुक्त फळे,धान्य,भाजीपाला विक्री करून देतो. शेतकरी मित्रांना जैविक शेती बद्दल संपूर्ण माहिती,व्यवस्थापन , तसेच नियोजन माहिती अगदी मोफत मिळावी या साठी मी ग्रुप तयार केलेले आहे.तसेच उत्पन्न वाढ आणि विक्री व्यवस्थापन साठी शेतकरी मित्रांना मी नेहमी मदत करतो.कारण अन्नदाता सुखी भव:हेच आमचे ध्येय आहे जैविक पद्धतीने तसेच नैसर्गिक पद्धतीने शेती केली तर पर्यावरण पूरक शेती होणार.विषबाधा होणार नाही. शेती मध्ये पर्यावरण स्वच्छ असल्याने शत्रू कीटक जास्त प्रमाणात राहणार नाही आणि विषमुक्त अन्न ,विषमुक्त फळे तयार होत असल्याने आजारांचे प्रमाण कमी राहणार .शेतीवरील खर्च कमी झाल्याने शेतकरी सुखी होणार.आर्थिक बजेट शेती विषयक कमी होतील. जैविक शेती एकदम कमी खर्चात कशी करावी.जैविक शेती मध्ये विषमुक्त अन्न, धान्य, फळे, भाजीपाला कसा तयार करावा.शेतकरी मित्रांना घरीच जैविक पद्धतीने कीड नियंत्रण माहिती देऊ. नैसर्गिक पद्धतीने शेती का करावी.उत्पन्न वाढ करून शेती वरील खर्च कसा कमी करावा. पिकेल ते विकेल हे मार्गदर्शन शेतकरी मित्रांना देऊ.तसेच आंरराष्ट्रीय शेतमाल कसा विक्री करावा. शेतकरी मित्रांना जैविक शेती बद्दल संपूर्ण माहिती,व्यवस्थापन,तसेच नियोजन अगदी मोफत मिळावी व उत्पन्न वाढ आणि विक्री कशी करावी या माहिती ने शेतकरी मित्रांना मदत व्हावी या साठी ही माहिती देत आहे.
Social Plugin