Ad Code

Responsive Advertisement

तण नियंत्रणासाठी राऊंड अप तणनाशकांचा वापर शेतकरी फार मोठ्या प्रमाणात करत असल्याने शेतातील काही दुष्परिणाम

नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी जैविक शेती मित्र निखिल तेटू. 
               शेतकरी बांधवांना माझी थोडी विनंती आहे  कि, सर्व शेतकरी मित्र राऊंड अप तणनाशकांचा वापर फार मोठ्या प्रमाणात करत आहेत.पावसाळा सुरू होताच तण नियंत्रण करण्यासाठी खूप मागणी वाढत आहे. त्या गावांमध्ये आणि शेतामध्ये फार मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे प्रमाण वाढले अस दिसून येत आहे.राऊंड अप तणनाशकाला पूर्ण जगात बंदी आहे.तरी सुद्धा आपल्या कृषीप्रधान भारत देशात फार मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते आहे. कॅन्सर टाटा मेमोरियल, अपोलो कॅन्सर यातील काही तज्ञ  डॉक्टरांचे मत आहे कि राऊंड अप तणनाशक हे मानवी शरीराला  खूप घातक आहे.अमेरिकेच्या ‘नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन’ या संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ‘ग्लायफोसेट’चा (तण नियंत्रण) शोध १९७४साली लागला.आज जगभरातला वापर १९९५ साली ६७ दशलक्ष किलोंवरून २०१४ साली ८२६ दशलक्ष किलोंपर्यंत, म्हणजेच १२ पटींनी वाढला. 
आज जगातल्या १६० देशांमध्ये ‘ग्लायफोसेट’युक्त तणनाशके वापरली जातात. ‘राऊंडअप’ तणनाशकांद्वारे जागतिक बाजारपेठ काबीज करण्यात ‘मोन्सॅन्टो’ पूर्ण यशस्वी झाली. मात्र, दुसर्‍या बाजूला ‘ग्लायफोसेट’च्या कर्करोग फार मोठ्या प्रमाणात दिसून येते आहे.जमिनीतील सेंद्रिय कर्बाचा दर्जा कमी होत आहे.गांडुळांची संख्या कमी झालेली दिसून येत आहे.आणि जमिनी मध्ये राहणारे इतर सूक्ष्म जीवाणू मरत असल्याने आज पाऊस आला तरी जमिनीतील मातीचा सुगंध येत नाही आहेत. जमिनी कडक होवून टणक होत आहे.त्यामुळे बैलजोडी काम करत नसल्याने आज ट्रॅक्टर यंत्र जास्त विकसित झाले आहे. 
मानवाला कॅन्सर होत आहे.इतर आजार सुद्धा जास्त पटीने वाढत आहे.जे आजार माहिती सुद्धा नव्हते.फक्त नाव एकले होते.ते आजार आता सर्वांना दिसत आहे .रोज वाढत जात आहे. तरी सुद्धा आपल्या कृषीप्रधान भारत देशातील विक्री बंद झाली नाही.अजून सुद्धा Black मध्ये विक्री होत आहे. कंपनी बनवत आहे.येत कुठून आहे. कोनलाच माहिती नाही.पण शेतकरी वापर करत आहे.अजून सुद्धा वापर थांबायला तयार नाहीत. ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग तसेच शहरी भागातील सुशिक्षित वर्ग वापर करतच आहे.होणारे स्वतःला आणि आपल्या काळया आई ला काय इजा होत आहे याकडे लक्ष द्यायला कोणीच तयार नाही.शेतकरी मित्रांसाठी वापर थांबविणे खूप महत्वाचे आहे.
            तेव्हाच आपली शेती सुपीक होवू शकते.वाचवू शकते.
माती वाचवा.रसायन वापर बंद करा.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.

फेसबुक पेज ला फॉलो करा.


टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या