Ad Code

Responsive Advertisement

काजव्यांचे शेतीमधील योगदान फार जाणकारक आहे.ते महत्व फक्त शेतकरी मित्रच समजू शकतात.

  काजव्यांचे शेतीमधील योगदान फार जाणकारक आहे.ते महत्व फक्त शेतकरी मित्रच समजू शकतात.
     
  मी लहान असतात पावसाळा सुरू झाला की ठिकठिकाणी काजवे लुकलुकत असत.आम्ही त्याला आग्या मन्ह्त असो.माझी आई मला काजवा दाखवत असायची आणि मी त्या काजव्याच्या मागे पळत राहायचो.आणि मला काजवा सापडताच मला खूप आनंद होत होता.तो मग मी छोट्या आगपेटी डबी मध्ये ठेवत होतो.अंधार झाला की बाहेर काढत होतो.माझ्या मित्रांना दाखवत होतो.तसेच माझे सर्व मित्र लहानपणी हे काम करत असायचे. माझा भाऊ यात जोरदार पटाईत होतो.तो जास्त गोळा करत होता.आम्ही सर्व मित्र 15-20  मिनिटात जवळपास शंभर काजवे पकडून ते बाटलीत भरून ती बाटली अंधाऱ्या खोलीत ठेवून आम्ही मज्जा करत असायचो. 
             अवघ्या 18 वर्षात हे काजवे अश्या पद्धतीनं गायब होतील याचा त्या काळी विचार पण केला नव्हता.आज तास भर अंधारात फिरलो तरी नजरेला जेमतेम एक तरी काजवा दिसला तर नशीब.माझ्या शेतात आता पण दिसतात.पण घरी नाही.गल्लीत नाहीत.मला खूपदा विचार येते.कोणी मारले.कुठे गेले.काय झालं.पण मला अजून उत्त्तर मिळाले नाहीत. 
▪️हे काजवे गेले तरी कुठे ?
◾ त्यांचं भविष्य काय ?
◾ त्यांचा जीवनक्रम कसा असतो ?
◾ काजवे काय खातात ?
◾ ते कसे चमकतात ?
◾ या काजव्यांचा विचार आता ही मी करत आहे.बाकी कोणी बोलताना दिसत नाही आहे.
◾शहरातील लोक स्वतःच्या कामात व्यस्त आहे.पण ग्रामीण भागात आज सुद्धा काजव्यांचा विचार करणारी वृध्द मंडळी दिसतात.बोलताना दिसतात.
 
काजवे भुंग्यांच्या कुळात मोडतात, जगभरात काजव्याच्या जवळपास १५००-२००० विविध प्रजाती विखुरलेल्या आहेत. त्यातील भारतात जेमतेम ९ ते १० प्रजाती आढळतात. काजव्यांचा जीवनक्रम पूर्ण व्हायला एक वर्ष लागते.पावसाळ्यात एक मादी तब्बल १००-१२० अंडी देते. ही अंडी ती एखाद्या झाडाच्या खोडामधे किव्वा पाणथळ जागांच्या शेजारी, किंवा उंच गवताळ ठिकाणी पालापाचोळा मध्ये दिली जातात. काजव्याची अंडी व अळी दोन्ही अंधारात चमकतात. साधारण दोन आठवड्यात अंड्यातून 
काजव्याची अळी बाहेर येते, आणि मग सुरू होतो जगण्यासाठीचा तिचा संघर्ष.अन्न पाणी साठी यांना खूप मेहनत करावी लागतात.कारण यांचा संघर्ष खूप अटळ आहे.प्रत्येक वेळी जेव्हा त्यांचा आकार वाढतो तेव्हा त्या कात टाकतात. एकूण पाच वेळा कात टाकल्यानंतर अळ्या विकासाच्या पुढच्या टप्प्यात येतात,जिथे त्या फुलपाखरा प्रमाणे कोश रुप धारण करतात.तो वेळ असतो मे ते जून महिन्याच्या. आणि पावसाच्या एक दोन जोरदार सरी येऊन गेल्या नंतर ह्या कोषातून लुकलुकणारे काजवे बाहेर येतात. आता त्यांचे दुसरे आयुष्य सुरू होते, जिथे ते हवेत उडणारे लहान मोठे कीटक खातात. लहान मोठ्या किटकांव्यातिरिक्त ते स्वाजाती भक्षण देखील खत असतात.प्रत्येक जातीचा काजवा एका विशिष्ट पद्ध्तीने लुकलुकत असतो. काही काजवे अगदी कमी वेळात जलद गतीने लुकलुक करतात, तर काही मंद गतीने लुकलुकत असतात. त्यांच्या लुकलुकणाऱ्या ची वारंवारता त्यांना त्यांच्या जनुकीय संरचनेच्या आधारे मिळते. ज्या मुळे हे काजवे आपल्या जातीच्या नर व मादीना ओळखतात आणि आकर्षित करतात. काही जातीच्या मादा इतर जातींच्या लुकलुक करण्याच्या पद्धती ची नक्कल करून दुसऱ्या जातीच्या नराला आकर्षित करतात व त्याला भक्ष देखील बनवतात.
असे हे काजवे कोषातून बाहेर आले की त्यांच्या जवळ खूपच कमी वेळ असतो. कारण कोषातून बाहेर आल्यावर त्यांचे आयुष्य केवळ दहा ते पंधरा दिवसांचे असते. एवढ्या कमी वेळात त्यांना मादी सोबत मिलन करून त्यांची पुढली पिढी निर्माण करण्यासाठी स्पर्धा सुरू असते.त्यांना लवकर प्रजनन करून पुढच्या पिढीला वेळ द्या लागतात.त्यासाठी ते खूप मेहनत करून जिवनात संघर्ष करत असतात. म्हणून बहुदा बरेच नर काही न खाता केवळ मिलन करणे हाच एक क्रम सुरू ठेवतात आणि लवकरच मरून जातात. पुढे मादी देखील अंडी दिल्या नंतर अवघ्या काही दिवसात मरून जाते. आणि आता अंड्यातून अळी अळी पासून कोश आणि कोषापासून काजवा तयार व्हायला तब्बल एक वर्षाचा काळ लागतो. आपल्या आयुष्याचा खूप मोठा काळ अश्या रीतीने काजवे जमिनीवर काढत असतात. 
   काजवे पूर्वी खूप दिसायचे कारण त्या काळी बऱ्याच पाणथळ जमिनी अस्तित्वात होत्या.कुठे पण पाणी मिळत असायचे.ग्रामीण भागात तर शेतात असो या गावात पाणी दिसायचे.म्हणून त्या ठिकाणी असलेल्या पाणथळ जमिनींमुळे भूजल पातळी काठोकाठ भरलेली असे परिणामी जमिनीतील आद्रता पूर्ण वर्षभर टिकून राहत असे, तसेच त्या वेळी मोठं मोठी गवताची आच्छादन अस्तित्वात होती. ज्या मुळे उंच वाढलेल्या दाट गवता मुळे सूर्यप्रकाश जमिनी पर्यंत पोहोचत नसे. ज्या मुळे तेथे काजव्यांसाठी योग्य आद्रता वर्षभर टिकून राही. तसेच शेतांच्या बांधावर नागफणी, थेंगड, इत्यादी काटेरी झाडांचे कुंपण असे ज्या मुळे अश्या ठिकाणी देखील आद्रता चांगल्या प्रकारे राहत असे आणि बरोबर ह्या ठिकाणी असलेल्या खेकड्याच्या सुक्या बिळात कजव्यांच्या अळ्या रात्री चमकताना दिसत होते.शेताच्या बांधावर सुद्धा काजवाच्या अळी पाहायला मिळत असतं. पुढे हळू हळू एका पाठोपाठ एक पाणथळ जागा आणि गवताळ कुरणे नष्ट होत गेल्या, ज्या मुळे जमिनीतील आद्रता पावसाळा संपल्यानंतर देखील टिकेनाशी झाली. परिणामी काजव्यांच्या अळीला जगण्यासाठी आवश्यक असलेली आद्रता मिळेनाशी झाली.पुढे शेतात देखील माणसाने रासायनिक फवारणी आणि रासायनिक खते तसेच तणनाशक फवारणी करायला  सुरुवात केली. ज्या मुळे इतर उपद्रवी किटकांपाठोपाठ परागीभवनासाठी उपयुक्त असणाऱ्या मधमाश्या आणि इतर काजव्यांसरख्या शेतीस उपयुक्त कीटक देखील नष्ट झाले.उरली सुरली कसर वाढत्या शहरकरणाने पूर्ण केली, शहरातील लोकांनी स्वतःच्या स्वार्थ पोटी काजव्यांचा जीव घेतला.स्वतः स्वार्थी पणा करून जंगले नष्ट करून तिथे मोठे मोठे कंपनी,घरे,मॉल्स,हॉटेल बांधल्या गेली.  त्यामुळे अगदी थोडा वेळ मिलनासठी पंख उघडून लुकलुक करणारे हे कीटक रात्रीच्या वेळी लावलेल्या एल. ई.डी. आणि इतर झगमगाटामुळे त्यांना त्यांचा जोडीदार शोधण्यात अडथळे येऊ लागले. ज्या मुळे आधीच कमी उरलेल्या काजव्यांच्या संख्येत आणखीन घट होत गेली.पुढे निसर्ग पर्यटन म्हणुन लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तिथे सुद्धा काजवे संपुष्टात आणले.कारण हे निसर्ग प्रेमी नसून स्वार्थ प्रेमी तयार झाले.निसर्ग प्रेमी  या नावाखाली उरल्या सुरल्या ठिकाणी जिथे आजही काजवे त्यांची शेवटची लुकलुक करून पृथ्वीच्या पाठीवरुन कायमचे नष्ट होणार आहेत अश्या ठिकाणी ही विचित्र शहरी माणसे यायला लागली तिथे नाईट ट्रेल, करत सोबत बॅटरी घेऊन फिरू लागली. ज्या मुळे काजव्याना घनदाट जंगलात देखील आता त्यांचा जोडीदार शोधण्यात अडथळे येऊ लागले आहेत.जमिनीवर राहणारा माणसाची मानसिकता दिवसेंदिवस खूप घाणेरडी होत चालली आहे.आधी तो निसर्ग ओरबाडून काढतो, त्यातील जीवनाचा एकूण एक थेंब शोषून त्याचा कागदी पैसा बनवतो. आणि नंतर हाच माणूस त्या पैशाने निसर्गात भ्रमंती करायला येतो. निसर्गाला बटिक समजतो पाहिजे तसे उपभोगाची आणि पैसे फेकून मोकळं व्हायचं. ह्याच वृत्ती मुळे आज सर्वत्र पृथ्वी वरील जीवन क्षणोक्षणी नष्ट होत आहे.अवघ्या 18 वर्षात काजव्या पाठोपाठ असे कितीतरी बहुउपयोगी कीटक आपण संपवले आहेत ज्याचा खूप भयानक परिणाम येत्या काळात आपल्याला भोगावा लागणार आहे.
निसर्ग वाचवा.पक्षी वाचवा.मित्र कीटक सवर्धन करा.माती वाचवा.अन्न वाचवा.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा
फेसबुक पेज ला फॉलो करा.


टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या