शेतकऱ्यांना शेती पिके घेताना उडत्या हानिकारक कीटकांमुळे मोठे नुकसान (Agriculture Technology) सोसावे लागते. या उडत्या किडींमध्ये प्रामुख्याने नाकतोडा, पतंग पाकोळ्या आणि काही फळ माशांचा समावेश असतो. तर कुठे अळी तयार करणाऱ्या अळीच्या पतंगाचा समावेश असतो. शेतकरी काही भागांमध्ये या किटकांना "पतंग पाकोळ्या" या ग्रामीण नावाने देखील ओळखतात. विशेषतः टोमॅटो आणि भाजीपाला सारखे पीक घेताना तर या पाकोळ्या शेतकऱ्यांना मोठा त्रास होतो. शेतामध्ये कामगंध सापळे लावूनही शेतकऱ्यांना या किडींवर म्हणावे असे नियंत्रण मिळवता येत नाही. मात्र आमच्या कडे उपलब्ध असलेल्या सोलर उर्जेवर आधारित एक यंत्र आहे. त्याला सौर ऊर्जेवर चालणारा प्रकाश सापळा असे म्हणतात. ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या कीटकांचा प्रभावी बंदोबस्त करता येऊ शकतो. 'कीटक सापळा यंत्र' असे या सौर ऊर्जा आधारित यंत्राचे नाव असून शत्रू किडी नियंत्रणात उत्तम असे काम करते.देशातील करोडो हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांकडून अनेक पिकांची लागवड केली जाते. मात्र काही उडते कीटक शेतकऱ्यांचे पूर्ण पीक फस्त करून टाकतात. त्यामुळे उत्पन्नात फार मोठी घट होते. कीटकनाशकांची फवारणी (Agriculture Technology) करायची म्हटले तरी तो पर्याय खूप खर्चिक असतो. त्यात औषध खर्च, मजूर खर्च, पाणी,वेळ, इंधन एवढा प्रचंड जुगाड् शेतकऱ्यांना मोठा प्रमाणात करावा लागतो. मात्र शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन आम्ही सौर ऊर्जेवर चालणारे 'कीटक सापळा यंत्र' विकसित केले आहे. जे आमच्या कडे उपलब्ध असून विक्री करत आहेत. शेतकरी या यंत्राचा वापर मोठ्या संख्येने करत, प्रभावीपणे आपल्या पिकांतील कीटकांचा बंदोबस्त करत आहेत.
आमच्या कडे उपलब्ध असलेल्या या कीटक सापळा यंत्राची किंमत 1200 ते 1300 रुपयांच्या आसपास आहेत. या यंत्राची विशेषतः म्हणजे ते स्वयंचलीत असून, संध्याकाळी अंधार पडले पासून सुरू होतात. त्या सोलर ट्रॅप सेन्सॉर वर पूर्णपणे अंधार पडला की ते आपोआप सुरू होतात. त्याचा प्रकाश मंद स्वरूपाचा आहे. पांढरा रंग चा लाईट असल्याने तो लाईट LED आहेत. प्रकाशमान होत पिकांवर आपल्या मर्यादित क्षेत्रात लाईट प्रसारित करते. पतंग व पाकोळ्या नियंत्रण करण्याचे काम सुरू होते. प्रकाशाकडे आकर्षित होत असलेले किडी पाण्यात पडून मरतात. हे यंत्र मध्यरात्री 11 वाजेच्या आसपास स्वयंचलित चीपच्या माध्यमातून आपोआप बंदही होते. व सकाळ पासून पूर्ण चार्जिग होणे सुरू होते.
🔹कीटकनाशकांवरील खर्च कमी
सुरुवातील हैदराबाद, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये वापर केले गेले आणि रिझल्ट घेत गेले. त्यानंतर आता महाराष्ट्र मध्ये धान, ऊस, डाळिंब, पेरू,संत्रा, नारळ, चहा, कॉफी व इतर फळबाग आणि भाजीपाला पिकांवरील कीटकांचा बंदोबस्त करण्यासाठी या यंत्राचा प्रभावी वापर केला जात आहे. काही शेतकऱ्यांच्या वापरातून अशी माहिती समोर आली आहे की, त्यांनी या कीटक सापळा यंत्राचा वापर केल्यानंतर त्यांचा कीटकनाशक फवारणीवरील खर्च फारच कमी झाला आहे. 4-5 फवारणी साठी होत असलेला खर्च वाचला. त्यामुळे तुम्हीही पिकांवरील कीटकांपासून त्रस्त असाल आमच्या कडे उपलब्ध असलेल्या यंत्राचा वापर करू शकतात. बाजारात वेगवेगळया प्रकारचे 'कीटक सापळा यंत्र' उपलब्ध आहेत. आपण यंत्राची संपूर्ण खात्री आणि माहिती घेऊनच खरेदी करावी. जेणेकरून आपल्याला कीटकांपासून प्रभावीपणे पिकांचे संरक्षण करता येईल.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.
टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.
धरतीशास्त्र जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती. शेतकरी मित्र निखिल तेटू +919529600161 / +917721881560
0 टिप्पण्या
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र
कु- हा , अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू 9529600161