Ad Code

Responsive Advertisement

ट्रायकोडर्मा -एक नैसर्गिक रोगनाशक बुरशी .जमिनीतील बुरशी नियंत्रण करण्यासाठी ट्रायकोडर्मा पद्धती वापर करा.

ट्रायकोडर्मा -एक नैसर्गिक रोगनाशक बुरशी 
         अलीकडे रासायनिक बुरशीनाशकाला पर्याय म्हणून ट्रायकोडर्मा बुरशीचा उपयोग पिकावरील रोग नियंत्रणासाठी होवू लागला आहे . पिकावरील मुळ कुजवा व मर या रोगाचे नियंत्रण ट्रायकार्डमा बुरशीमुळे करता येते . ट्रायकोडर्माच्या दोन प्रजाती वापरात आहेत . एक ट्रायकोडर्मा हरजीएनम व दुसरी ट्रायकोडर्मा व्हिरीडी .यांचे संवर्धन एका किलो पाकिटाच्या स्वरूपात बाजारात मिळते.
          ट्रायकोडर्माची कार्यपध्दती :-  सर्वप्रथम ट्रायकोडर्मा ही बुरशी हानिकारक बुरशीच्या धाग्यामध्ये विळखा घालून आपले साम्राज्य पसरविते व त्यातील पोषक द्रव्ये शोषून फस्त करते . परिणामी अपायकारक बुरशीचा बंदोबस्त होतो . या बुरशीची वाढ जलद गतीने होते . त्यामुळे अन्नद्रव्य शोषणासाठी ही बुरशी स्पर्धा करते . अपायकारक बुरशीच्या वाढीसाठी लागणारे , कर्ब , नत्र , व्हिटॅमिन इत्यादीची कमतरता होऊन हानिकारक बुरशीची वाढ खुंटते . तसेच ट्रायकोडर्मा बुरशी ग्यायोटॉक्झीन व व्हिरीडीन नावाची प्रती जैविके निर्माण करते . ही प्रती जैविक रोगजन्य बुरशीच्या वाढीला मारक ठरतात , तसेच या बुरशीचे कवकतंतू रोपाच्या मुळावर पातळ थरात वाढतात व त्यामुळे रोगकारक बुरशीचे कवक तंतू मुळामध्ये प्रवेश करू शकत नाही .
ट्रायकोडर्मा वापरण्याची पध्दत :- 
१ ) बीज प्रक्रिया – ट्रायकोडर्मा ही बुरशी वापरण्याची सर्वसाधारण व उपयुक्त अशी पध्दत म्हणजे बीज प्रक्रिया पेरणीचे वेळी 10 ग्रॅम या प्रमाणात 1 किलो बियाण्यास ट्रायकोडर्मा पावडरची बीज प्रक्रिया करावी. सर्व बियाण्यावर सारखे थर होईल याची काळजी घ्यावी . बियाणे सावलीत वाळवून लगेच पेरणी करावी .
२ ) माती प्रक्रिया – जमिनीमार्फत होणाऱ्या रोगजन्य बुरशीच्या नियंत्रणासाठी 1 ते 2.5 किलो ट्रायकोडर्मा भुकटी 30 ते 40 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिश्रण करून एक हेक्टर क्षेत्रात पसरवून मातीत मिसळावे व शक्य असल्यास पाणी द्यावे.
 ट्रायकोडर्मा बुरशीचे फायदे :- नैसर्गिक घटक असल्यामुळे या बुरशीचा पर्यावरणावर कोणताच परिणाम होत नाही . प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याची शक्यता कमी .जमिनीत सेंद्रीय पदार्थ कुजवून देण्यास तसेच जमीन सुधारण्यात मदत होते .बीज प्रक्रिया केल्याने उगवण शक्ती वाढवून बीज अंकुरण जास्त प्रमाणात होते .हानिकारक / रोगकारक बुरशीचा संहार करते .पिकाचे संपूर्ण वाढीच्या अवस्थेपर्यंत संरक्षण करते. किफायतशीतर असल्याने खर्च कमी होतो .
जीवाणू संवर्धन :- जीवाणु खत संपूर्ण सेंद्रीय व सजीव असून त्यामध्ये कोणताही अपायकारक , टाकाऊ अथवा निरूपयोगी घटक नाही . हवेतील नत्र शोषून व साठवून नंतर पिकांना उपलब्ध करून देणाऱ्या जीवाणूंची प्रयोगशाळेत वाढ करून त्यापासून तयार केलेल्या खतांना जीवाणू खते म्हणतात . जीवाणू संवर्धन म्हणजेच जीवाणू खते ज्यात नत्र उपलब्ध करून देणाऱ्या व जमिनीतील स्फुरद विरघळविणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंच्या गटाचे मिश्रण असते .
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या

यट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.

https://youtube.com/channel/UCMgI-5G6wRzARE-CbSWf8uA

फेसबुक पेज ला फॉलो करा.

https://www.facebook.com/nikhil1mitr/

https://www.facebook.com/100102642144899/posts/346997600788734/

टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.

https://t.me/+Xe_Kx5pSrxdhZjRl

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या