Ad Code

Responsive Advertisement

पिकात सुत्रकृमि नियंत्रण करण्यासाठी देशी झेंडू पीक लागवड खूप फायद्याची.फळबाग लागवड करणे म्हणजे मधमाश्या व मित्र किड आकर्षण करणे होय.

 पिकात सुत्रकृमि नियंत्रण करण्यासाठी देशी झेंडू आणि पपई , डाळिंब पीक लागवड.फळबाग लागवड 
मधमाश्या व मित्र किड आकर्षण करण्यासाठी करावी.

देशी झेंडूत अफ्लाटर्थोनाईल हे रसायन सुत्रकृमी/ निमॅटोड ,सुत्रकृमि नाशक आहे म्हणून काम करतात.त्यामुळे सुत्रकृमि ,निमॅटोड नियंत्रण करण्यासाठी देशी झेंडू च लावावा प्रत्येक शेतकरी मित्राने आपल्या शेतात.
◾ निमॅटोड व त्या वरील उपाय :-
निमॅटोडस् हे सुक्ष्मदर्शकाद्वारे दिसणारे अत्यंत लहान आकाराचे सुक्ष्म असे जीव आहेत. यात दोन प्रकारचे निमॅटोड येतात. पहिल्या गटातील निमॅटोड पिकाच्या मुळांमध्ये राहतात, आणि मुळांवर जगतात. मुळावर वाढतात.पिकांचे मुळे खातात.गाठी तयार करतात. दुस-या गटातील निमॅटोड पिकाच्या मुळांवर जगतात मात्र, जमिनीत राहतात.तिथे वास्तव तयार करतात.पिकांना मिळणारे अन्नद्रव्य खात असतात.
◾ प्रादुर्भाव होण्याची कारणे :- 
प्रादुर्भाव जमिनीत वापरल्या जाणा-या हत्यारांतुन, चप्पल, बुट, तसेच प्रादुर्भाव ग्रस्त रोपांद्वारे, मातीद्वारे होतो. निमॅटोड चा जीवक्रम हा 6 अवस्थांतुन जातो. पहिली अवस्था – अंडी अवस्था, 2 ते 5 अशा नंतरच्या 4 अवस्था ह्या अविकसीत अवस्था असतात, व शेवटची 6 वी अवस्था हि परिपक्व (प्रौढ) अवस्था असते. मादी हि तिन महिन्यांपर्यंत जिवंत राहु शकते व एकावेळेस 100 पर्यंत अंडी देते. 
निमॅटोडच्या वाढीसाठी 13 ते 34 डिग्रि तापमान योग्य ठरते, जास्त योग्य 29 डिग्री आहे. उन्हाळ्याच्या उबदार वातावरणात निमॅटोडच्या कित्येक जाती अंडी अवस्थेतुन परिपक्व अवस्थेत 21 ते 28 दिवसांत पोहचतात. निमॅटोड जमिनीत अंड्यांच्या स्वरुपात सुप्तवस्थेत राहते. सहसा मादी हि मुळांतुन बाहेर निघत नाही, मुळांवरिल नरम पडलेल्या गाठीत ती अंडी देवुन राहते. मात्र नर  निमॅटोड पिकांचे  मुळे सोडुन बाहेर पडतो.ज्यावेळेस वातावरण पोषक असते त्यावेळेस प्रामुख्याने मुळांच्या टोकाद्वारे प्रादुर्भाव होतो. मुळांवरिल गाठींमुळे पिकांस अन्नद्रव्ये व पाणी मिळत नाहीत, कधी कधी या गाठी 1 इंच इतक्या जाडीच्या बनतात. पिकाची वाढ कमी होते, अन्नद्रव्यांची कमतरता दिसु लागते.उबदार, बागायती परिसरात जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसुन येतो.
 ◾  सुत्रकृमी ,निमॅटोड वर घरगुती उपाय :- 
झेंडुची , पपई , डाळिंब झाड लागवड करावी. व इतर फळबाग लागवड करावी. तसेच भाजीपाला पिकात देशी झेंडूची मिश्र पीक पद्धतीने लागवड करावी.देशी झेंडूतील अफ्लाटर्थोनाईल हे रसायन सुत्रकृमी नियंत्रण करते व फुलाचे उत्पादन दोन्ही हेतु साध्य होवुन परागिकरणासाठी मधमाश्या आकर्षित होतात व मित्र कीड सवर्धन होते .मित्र किट मरत नाहीत.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.

https://youtu.be/75gfTcLxOO8

फेसबुक पेज ला फॉलो करा.

https://www.facebook.com/nikhil1mitr/

https://fb.watch/dtIKAz6b1d/

टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.

https://t.me/+Xe_Kx5pSrxdhZjRl

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या