Ad Code

Responsive Advertisement

मुट्टई रस्सम भारताच्या दक्षिण प्रांताची, कृषी प्रधान देशाला मिळालेली ही एक बहुमूल्य निविष्ठा

◾मुट्टई रस्सम  ◾अंडा संजीवक
भारताच्या दक्षिण प्रांताची, कृषी प्रधान देशाला मिळालेली ही एक बहुमूल्य निविष्ठा आहे.शेतकरी मित्रांनी ही निविष्ठा विसरायला नाही पाहिजे.प्रत्येक शेतकरी मित्रांनी वापर करायला पाहिजे.अंड्याला तमीळ भाषेत मुट्टई व मल्याळी भाषेत मुट्टा हे संबोधले जातात .याचा अर्थ मुट्टई म्हणजे अंडे व रस्सम म्हणजे त्यापासून बनविलेला रस किंवा अर्क. मुट्टई रस्सम हे पिकांना वाढवर्धक व एक संजीवक म्हणून जरी प्रचलित असले तरी पिकाच्या प्रजोत्पादन कालावधीत पिकाला आवश्यक असलेले हार्मोन्स पुरविणारा महत्वपूर्ण घटक आहे.

  ◾ साहित्य :- 
 • काचेची किंवा प्लस्टिकची झाकण असलेली         भरणी अथवा पात्र. 
• २०- २५ मोठ्या आकाराचे पिवळे पिकलेले           लिंबू.
• १० ते १५ देशी कोंबडीची अंडी.
•  ५०० ग्रॅम काळा गुळ.
 ◾ कृती :-  
लिंबू कापून त्याचा रस पिळून काढावा व त्यात २५० ग्रॅम गुळ मिसळावा.अंडी न फोडता भरणी किंवा पात्रात ठेवा. काळा गुळ कालवलेला लिंबांचा रस त्यात टाका.अंडी या द्रावणात पूर्णपणे बुडत नसतील तर आणखी लिंबांचा रस टाका. किंवा १-२ अंडी कमी करा.अंडी द्रावणात पूर्णपणे बुडणे आवश्यक आहे.तेव्हाच ते योग्य अंडा संजीवक बनतील. शेतकरी तज्ञ च्या मतानुसार पिळलेल्या लिबांच्या सालीही यात टाकतात. यानंतर बरणीला झाकण लावा व सावलीच्या, सामान्य तापमान असेल अशा ठिकाणी १५ दिवस ठेवा.दिवसातून एकदा हलविणे खूप आवश्यक आहे.भरणी मध्ये तयार झालेला गॅस बाहेर काढणे.नंतर पुन्हा हवाबंद भरणी करणे. दरम्यान लिंबाच्या रसातील साइट्रिक आम्लात अंड्याच्या कवचातील कॅल्शीयम आणि प्रोटीन  लागते. १० दिवसात अंड्याच्या कवचातील कॅल्शीयम पूर्णपणे विरघळणे अपेक्षित आहे. त्यानंतर अंड्याच्या आतील बिलबिलित पापुद्रा शिल्लक राहतो. पण अंडी काही प्रमाणत फुटलेली असतात. 
 स्वच्छ हात धुऊन आपण हाताने अंडी फोडून द्रावणातच कुस्करावे. उरलेले २५० ग्रॅम गु्ळ थोड्याश्या पाण्यात कालवून या द्रावणात मिसळावे. बरणीस झाकण लावून हे द्रावण पुन: १० दिवस तसेच ठेवावे.१० दिवसानंतर गाळून वापरण्य़ास घ्यावे किंवा लगेच वापरणार नसल्यास काचेच्या अथवा प्लास्टिकच्या पात्रात झाकण लावून ठेवावे. 
  ◾ कसे वापरावे :- 
१ लिटर पाण्यात १० - १२ मिली मिसळून पिकांवर फवारणी व जमीनीतून देण्यासाठी वापरावे.
पिकाच्या बदलाच्या अवस्थेत याची फवारणी करावी. 
द्रावण गाळून घेतल्या पासून ६ महिन्याच्या आत याचा उपयोग करावा. नंतर काही फायदा मिळत नाही.
◾ अंड्याच्या कवचातील विरघळलेला कॅल्शियम आणि प्रोटीन पिकाच्या पान व देठातील अन्नद्रव्य फुल व फळधारणेसाठी उपलब्ध करतो.
 अंड्याच्या बलकात असणारे विविध प्रकारचे अमीनो असीड फळधारणे दरम्यान फळांना फुगवण व चकाकी प्रदान करतात.गुळ हा जगभरातील निविष्टांमधे उत्कृष्ट संजीवक म्हणून वापरला जातो. 
    ◾ महत्वाचे :- 
लिंबू व्यवस्थित पिकलेले नसतील तर त्यांच्या रसातील आम्लता कमी असते.परीणामी अंड्याचे कवच त्यात पूर्णपणे विरघळत नाही किंवा पूर्ण विरघळण्यास १० दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागतो.या करीता पिवळे व आकाराने मोठे लिंबू निवडावेत. 
अंडी देशी कोंबडीची असतील तर फार योग्य  कारण त्यांच्या कवचातील केवळ कॅल्शीयम हा घटक अपेक्षित आहे.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या

यट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा

https://youtube.com/channel/UCMgI-5G6wRzARE-CbSWf8uA

फेसबुक पेज ला फॉलो करा.

https://www.facebook.com/nikhil1mitr/

https://www.facebook.com/100102642144899/posts/346997600788734/

टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.

https://t.me/+Xe_Kx5pSrxdhZjRl

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या