नियोजन आपल्या शेतातील शेणखताचाचे.व्यवस्थापन जमिनीतील सूक्ष्म जीवाणू खतांचे आणि गांडूळ खताचे.1) एका ठिकाणी जमा केलेल्या शेणखता चे ढीग आपल्याला दिसत असतात.तर आपण स्वतः 12*4*2 फूट आकार ठेऊन शेण खत ढीग तयार करावा.म्हणजे लवकर हवा उन्ह पाणी मिळणार.बेड मध्यम सावली मध्ये लावावा.जिवाणू लवकर सक्रिय होवून वाढणार.तिथे शेतातील वन्य प्राणी नुकसान करत असतील तर संरक्षण आधीच करावेत.बेड कोरड्या जागेवर लावावेत.बेड मध्ये शेण खत,कोंबडी खत,लेंडी खत,सेंद्रिय कर्ब असलेले पाला पाचोळा, टाकावा. प्रोम तसेच इतर पिकांचे पाने सुद्धा टाकावे.तसेच आपण जिवाणू खते PSB,KMB, रायझोबीयम, Tricoderma Viridi पण सोडू शकतो.गरज वाटत असल्यास नक्की सोडावेत. 2) बेड लाऊन झाले एक ड्रम मध्ये गो कृपा अमृतम् तयार करावेत.दुसरा ड्रम मध्ये 180 लिटर पाणी घेऊन जीवामृत बनवावे.आता बेड वर आपण ट्रायकोडर्मा पावडर किंवा बायो मिक्स पावडर पाणी मध्ये मिसळून टाकावेत.आणि बेड पूर्ण ओला करावा.हा बेड दिवसामधून एकदा तरी ओला करावा.गुळाचे पाणी सुद्धा वापर करावेत.गांडूळ बेड मध्ये सोडायचे असल्यास आपण एसेनिया फोयटिडा ही गांडूळ प्रजाती सोडू शकतो.त्यामुळे उत्तम प्रकारचे गांडूळ खात बनेल.अंडी तयार होतील. 3)तिसऱ्या दिवशी जीवामृत बनले की निम पाला तोडून टाकून द्यावा. नंतर शेण खत ढीग वर जीवामृत टाकून द्यावे.आणि पूर्ण लीपून घ्यावेत.4 दिवसांनी गोमूत्र ताक फवारणी करून बेड पूर्ण ओला करावा.बाकी दिवस गूळ पाणी फवारणी केले तरी चालतात.नंतर 8-10 दिवसांनी गो कृपा अमृतम् बनले की शेण ढीग फेरपालट करावा. मधात गड्डा करावा. जेवढे गो कृपा अमृतम् बसेल तेवढे टाकावे.
4)गो कृपा अमृतम् ढीग मध्ये रोज टाकावेत.एक दिवस थाबून ढीग फेरपालट करावा.25 -30 दिवसात जिवाणू वाढ होतील.तसेच काही प्रमाणात नैसर्गिक गांडूळ दिसायला सुरुवात होणार.पुन्हा आपल्याला करावे असल्यास अशी प्रक्रिया करू शकता. 5) हे शेणखत ढीग 30 दिवसांनी शेतामध्ये टाकण्यास योग्य तयार होतात.त्या अगोदर पूर्ण कुजलेले शेणखत ओले करणे खुप गरजेचे आहे. या मध्ये गांडूळ सुद्धा दिसणार नक्की.या कुजलेले शेणखत सोबत आपण निम पेंड, सेंद्रिय खते, कंपोस्ट खत, बोन मिल , मायकोरायझा वापर करू शकतो.पण शेणखत जमिनीमध्ये ओलावा असताना फेकावेत.नंतर आपण प्रति फळ वर्गीय झाड १० किलो शेण खत टाकावे.वेल वर्गीय झाड ५०० ग्रॅम टाकावे.बाकी इतर पिकाला झाडांचे वय पाहूनच टाकावेत. 6) हे शेण खत पूर्णपणे जैविक प्रक्रिया करून तयार झालेले आहे त्यामुळे आपल्या पिकांना पूर्णपणे अन्न मिळून देतात.जिवाणू सक्रिय होवून काम करतात.जमनितील हानिकारक बुरशी नियंत्रण होतात.जमिनीतून सेंद्रिय कर्ब वाढतात.जीवाणू वाढतात. झाडांना वेळेवर अन्न मिळत असतात.त्यामुळे झाडांना वेळेवर अन्न मिळत असल्याने झाड सुद्धा फुले फळ देतात.फळे पोषक वातावरण मध्ये तयार होतात.पिकांची नवीन पालवी वाढतात.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
0 टिप्पण्या
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र
कु- हा , अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू 9529600161