पावसाळा मध्ये पेरणी चे संकेत देणारा पावशा पक्षी.शेतकरी मित्र या संकेताची नेहमी आवर्जून वाट पाहत असतात.
पावसाळा सुरू झाला की , पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जंगल, माळरान, शेते, पर्वत तुडवीत असताना एक पक्षी दिवसभर ओरडताना आढळतो. ‘पेरते व्हा, पेरते व्हा.’ शेतकरी मित्रांना कोणत्या दिवशी पेरणी करायला पाहिजे ते सांगितले जाते.कधी पाऊस येतील यांचे संकेत दिले जातात.शेतकरी बळीराजाही जणू काही त्या पक्ष्याच्या सांगण्यावरून शेतीच्या कामांना सुरुवात करतो.शेतीचे अवजार, कोळपे, लाकडी साहित्य तयार करायला लागतो.कोकिळेच्याच जातकुळीतील कॉमन हॉक कक्कू किंवा पावशा पक्षी हा पावसाळ्यात स्थलांतर करून आपल्या भागात येतो. पावशा पक्षी दिवसभर एकाच प्रकारची शीळ देत असतो.आणि नेहमी एकच आवाज देत असतो.त्याच्या या शिळेच्या आवाजाला जगभरातील भाषांमध्ये निरनिराळे अर्थ आहेत.त्यामुळे त्यावरूनच त्याची स्थानिक नावे तयार झाली आहेत. काही जणांना त्याच्या शिळेतून ‘पेरते व्हा’ असे ऐकू येते, तसेच त्याच्या आवाजातून ‘पाऊस आला, पाऊस आला’ असेही ऐकू येते.हिंदीत ‘पिया कहा’ म्हणजे माझं प्रेम कुठेय ? माझे प्रेम कुठे गेले. मी प्रेम विसरलो. तर बंगालीत याचा आवाज ‘चोख गेलो, चोख गेलो’ म्हणजे ‘माझे डोळे गेले’ असे म्हटले जाते.पावशा पक्षी हा मुख्यत्वेकरून झाडावरच राहतो.तिथेच घरटी तयार करतो.झाडावरच पिलांचे पोषण करतो. अगदी क्वचितप्रसंगी हा पक्षी जमिनीवर उतरल्याचे दिसून येते. कोकीळ कुळातील इतर पक्ष्यांप्रमाणे पावशाही स्वत:चे घर बनवीत नाही. मैना, सातभाई अशा पक्ष्यांच्या घरटय़ात तो आपली अंडी घालतो.साधारण २५ mm आकाराचे निळ्या रंगाचे एक अंडे पावशा मूळ मालकाच्या नकळत त्याच्या घरटय़ात घालतो आणि संगोपनाच्या जबाबदारीतून सुटतो. साधारण कबुतराएवढा आकार, करडट डोके आणि पाठ तर फिक्कट तांबूस ते पांढरट छाती आणि पोट. शेपटीवर काळे पट्टे. असा हा पावशा पक्षी झाडांमध्ये लपून संपूर्ण पावसाळ्यात मोठय़ाने शीळ घालताना आपल्या भागात दिसतो. शिक्रा नावाच्या शिकारी पक्ष्याशी याचे रूप मिळतेजुळते असते. या साध्यम्र्यामुळे त्याला ओळखताना गडबड होऊ शकते. अशा वेळी याची चोच पाहावी. पावशाची चोच शिक्रापेक्षा लहान आणि नाजूक असते. याचे शास्त्रीय नाव ‘हायरोकॉक्सीस व्हेरियस’ असे आहे. त्यातील हायरॅक्स म्हणजे शिकारी पक्षी आणि कॉकक्स म्हणजे कोकीळ. या दोन शब्दांच्या मिश्रणातून हा शब्द तयार झालाय तर व्हेरियस म्हणजे अनेक.
असा हा वैशिष्टय़पूर्ण स्वभाव असलेला पावशा पक्षी आपल्या सर्वाना जंगलामध्ये भटकंती करताना सोबत करतो.
विविध फळांच्या जोडीला किडेही खाणारा पक्षी आहे.जैविक शेती मध्ये सुद्धा हा पक्षी कीटक तसेच अळी सुद्धा खाते.हा मिश्रआहारी पक्षी सध्या आपल्या आजूबाजूलाच फिरतोय.तसेच आपण सर्व पक्ष्यांचे सवर्धन करायला पाहिजे. चला तर या पावसाळ्यात पावशाचे, खऱ्याखुऱ्या पाऊसपक्ष्याचे दर्शन घेऊ या. पक्षी वाचवा.निसर्ग वाचवा.अन्न वाचवा.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या यट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.
टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560
0 टिप्पण्या
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र
कु- हा , अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू 9529600161