शेतकरी मित्रांनी तज्ञांच्या सल्ल्यानेच स्वतःच्या शेतामध्ये रासायनिक खते तसेच रासायनिक फवारणी अती प्रमाणात केल्या.त्यामुळे शेतांमध्ये रासायनिक खतांचा भरपूर वापर केला गेला.त्याचे दुष्परिणाम सुद्धा जाणवायला लागले आहेत.त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी रासायनिक खतांच्या ऐवजी सेंद्रीय खतांचा आणि गांडूळ खताचा वापर करणे योग्य आहेत. …
अधिक वाचाज्याला माती कळाली त्याला शेती कळाली.शेती हा विषय न समजणारा आहे त्यामुळे शेतीचा मुख्य पाय म्हणजे माती हा मुख्य घटक समजून घेणे खूप आवश्यक आहे. ऊसाची पाचट जाळु नका.शेतकरी मित्रहो.शेतात कुजवा.सेंद्रिय कर्ब वाढवा.जमिनी सुपीक बनवा. पाचट जाळणारे शेतकरी मित्र स्वतःचे घर व भविष्य जाळत आहे.त्यासाठी शेतकरी मित्रांनी पुन…
अधिक वाचासंत्र्यामधील पोषकतत्वे (Nutrients In Orange) संत्री खाण्याचे फायदे जाणून घेण्याआधी मध्यम आकाराच्या संत्र्यामध्ये किती पोषक तत्वं असतात हे अवश्य समजून घ्या. कॅलरिज 60,फायबर्स 3 ग्रॅम,कार्बोहायड्रेड 15 ग्रॅम,साखर 12 ग्रॅम,प्रोटीन्स 1 ग्रॅम,व्हिटॅमिन ए 14 मायक्रोग्रॅम,व्हिटॅमिन सी 70 मिग्रॅ,कॅल्शियम – 52 मिग्रॅ,पोटॅशियम –…
अधिक वाचाजमिनीमध्ये पीक पेरणी केल्यानंतर पिकांना डवरणी आणि खुरपणी (निंदन) खुप महत्वाचे असते • डवरणी केल्यानंतर पिकांना ऑक्सिजन मिळते.पिकामधिल निघालेले आणि नको असलेले पिकांचे अवशेष निघून जातात. तण निघून गेल्याने पिकांची वाढ लवकर होते. • जमिनी मध्ये मोकळी हवा खेळत राहते.त्यामुळे पिकांना अन्नद्रव्य पुरवठा सुरळीत होतो. • जमिनी मध्ये …
अधिक वाचासोयाबीन पेरणी नियोजन ,माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापन ▪️पेरणी लागवड पूर्वी काही चाचणी करणे खूप गरजेचे असतात.त्यासाठी जमिनीची चाचणी म्हणजे माती परीक्षण करणे खूप आवश्यक आहे.नंतर जमिनीची पूर्वमशागत म्हणजेच नागंरण पाळी, वखरण पाळी करणे होय. ▪️बियाणे निवड करताना आपण कोणते बियाणे वापर करावे ते समजून घेतले पाहिजे.१० वर्षाच्या आत म…
अधिक वाचाओळख रानभाजी कर्टुले (काटवाल) लागवड ची आणि पोषणाची,नियोजनाची. सामान्यतः " कर्टुले किंवा कंटोला " म्हणून ओळखली जाणारी ही भाजी शतकानुशतके भारतामध्ये लागवड केल्या जाणाऱ्या प्रसिद्ध आणि पौष्टीक अशा दुर्मिळ रानभाज्यांपैकी एक आहे.ती भाजी आरोग्यसाठी खूप महत्वाची असून त्या भाजीमध्ये पौष्टिक मूल्य प्रति १०० ग्रॅम खाद्य …
अधिक वाचा--- भूमि उपचार के लिए --- भारतीय कृषि अनुसंधान संस्थान पुसा, नई दिल्ली द्वारा विकसित तकनीक से इकोलोजिकल प्रोडक्ट इन्डस्ट्रीज द्वारा निर्मित ब्ल्यू ग्रीन एलगी 1. यह जमीन में कम व अधिक नमी की दोनों प्रकार की स्थितियों में काम करती है, अतः यह सभी फसलों के लिए लाभदायक है। 2. जमीन में यह फासफोरस की उपलब्धता बढ़ाती है…
अधिक वाचापावसाळ्यात करण्यात येणारे मुख्य नियोजन म्हणजे हुमणी अळी अवस्था , जीवन प्रणाली माहिती आणि नुकसान आणि नियंत्रण व्यवस्थापन हुमणी अळी अवस्था आणि ओळख :- प्रथम अळी अवस्था पांढरीशुभ्र, पिवळे डोके, सुमारे 8 मी.मी. लांबी. छातीवर पायांच्या तीन जोड्या.पूर्ण विकसित अळ्या पिवळट-सफेद, डोक्याचा रंग बदामी व इंग्रजीच्या "सी' अक्षराप्रमा…
अधिक वाचातण (सेंद्रीय कर्ब) जाणुन घेऊया फायदे,गुणधर्म आणि नुकसान तसेच नियंत्रण समजून घेऊया. तण : मनुष्याने काही वनस्पतींची अन्न, वस्त्र, निवारा आणि इतर गरजांसाठी लागवड सुरू केली. तेव्हापासूनच तणांच्या कल्पनेचा उगम झाला.ज्या वेळी मनुष्य एखाद्या वनस्पतीची हेतुपूर्वक लागवड करतो त्या वेळी शेतात वाढणाऱ्या इतर सर्व वनस्पतींना ‘तण’ म्हण…
अधिक वाचा"नियोजन तसेच व्यवस्थापन खरीप हंगाम मधील कपाशी(कापूस) पिकांचे." प्रथमत कपाशी नियोजन करण्याआधी माती परीक्षण आणि पाणी परीक्षण करणे.आपल्या गावाजवळील किंवा शहराजवळील शासकीय माती प्रयोगशाळा मध्ये माती आणि पाणी नेऊन परीक्षण करावे.लवकरच रिपोर्ट प्राप्त करावेत.रिपोर्ट नुसार खतांच्या कोणत्या मात्रा कधी द्यावा हे लिहून ठेवावे…
अधिक वाचामी निखिल मधुकर तेटू माझ्या वयाच्या १३ वर्षा पासून मी माझ्या, घरच्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहे. तसेच मी शेती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याने करत आहे. माझी शेती ५ एकर असून सर्व शेती जैविक पद्धतीने सुरू आहे. तसेच जैविक निविष्ठा मी स्वतः वापर करून विषमुक्त अन्न तयार करतो. माझ्या शेतात मी जैविक शेती जेव्हा पासून सुरू केली तेव्हा पासून मला मधमाशी ,फुलपाखरू, सोनपाखरू, पक्षी दिसतात. खूप मोठ्या प्रमाणात दिसत असल्याने यांच्याशी मला खूप प्रेम आहे. त्यांना जेवण सुद्धा विषमुक्त मिळत असल्याने माझे प्रिय मित्र कीटक माझ्या शेतातच राहतात. मी माझ्या शेतात सर्वात जास्त वापर शेणखताचा करतो. नाडेप कंपोस्ट खत प्रक्रिया चा वापर करतो. मी प्रक्रिया केलेले शेणखत, गांडूळ खत व गांडूळ पाणी यांचा वापर करतो.कंपोस्ट खत, सोनखत, एरंडी पेंड,निम पेंड,करडई पेंड,मासोळी खत,हाडांचा चुरा,रॉक फॉस्फेट (राख) यांचा सेंद्रिय कर्ब म्हणून वापर करतो.बोरू धेंचा ताग शेतात पेरणी करून फुल अवस्था मध्ये कापणी केली जाते व ते जमिनी मध्ये सेंद्रिय कर्ब वाढवितो व ते आच्छादन म्हणून सुद्धा वापर करतो. माझ्या शेतात जमिनीला पोषक असे जिवाणू खते मी स्वतः बनविलेले आहे व वापर केलेले आहे जीवामृत, पंचगव्य, जैविक ह्यूमिक ,तांदूळ पेज,बेल रसायन, आवळा रसायन, जिवाणूपाणी कल्चर, फळांचा सडवा,GA, जिवाणू वाढविणे,पळसाची फुले, जैविक पोटॅश, तरल खत, राख, गारबेज enzymes व गूळ फवारणी करतो. शेतात बीजप्रक्रियासाठी मी नेहमी यांचा वापर करतो. :- गावरान गायचे ताजे शेण,गोमूत्र,हिंग,हळद, काळा गूळ, वारूळ माती किंवा सुपीक माती,मासोळी तैल. तसेच मला बीजप्रक्रिया स्पर्धा मध्ये Second Prize सुद्धा मिळाले आहे. जैविक पद्धतीने मी स्वतःबनविलेले कीटकनाशक:- निम अर्क, दशपर्णी अर्क, तरल खत, अंडा संजीवक,बाजरी कीटकनाशक, हिंगनास्त्र,अग्निहोत्र राख,करंज तेल, कीटकनाशक, ब्रह्मास्त्र,महाअस्त्र, CVR . जैविक बुरशीनाशक :- दही तांबे धातू, अग्निहोत्र राख,गोमूत्र ताक गूळ, ताक तांबे धातू , मासोळी तैल.तसेच मदर कल्चर आणून Trico derma virodi बनविणे नंतर multiply करून वापर करणे. जैविक पद्धतीने कीटक नियंत्रण साठी मी प्रयोग केलेले स्वतः :- प्रकाश सापळे लावणे,लाईट ट्रॅप बांधावर लावणे,पक्षी थांबे,पिवळे निळे चिकट सापळे,मिश्रपीक पद्धती, ऑईल लावून साडी फिरविणे , पांढरा कागद प्लास्टिक आणून शेतात फिरविणे. मित्र कीड संगोपनसाठी मी दरवर्षी वापर करतो:- ट्रायकोग्रामा मित्र कीटक संगोपन कार्ड वापर करणे.पक्ष्यांना अन्न सहज उपलब्ध करून देणे.मधमाशी यांना पाणी फुले जवळपास उपलब्ध करून देणे. शेतात बाजारातील रसायने कोणतेही वापर न करणे. मला संधी कृषी कॉलेजवर जैविक शेती विषमुक्त अन्न हे प्रशिक्षण देण्यासाठी मिळाली आहे. जैविक शेती संगोपन विषयी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलेले आहे.तसेच कृषी विज्ञान केंद्र मध्ये सुद्धा प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिलेले आहे.माझ्या शेतकरी मित्रासाठी मी घरी आणि माझ्या शेतात जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र उघडले आहे.माझे स्वतःचे काही ग्रुप असून मी शेतकरी मित्रांना रोज जैविक शेती ,बाजार,विक्री माहिती देतो.हवामान विषयक सुद्धा महिती देतो.तसेच मी माझ्या सर्व शेतकरी मित्रांची विषमुक्त फळे,धान्य,भाजीपाला विक्री करून देतो. शेतकरी मित्रांना जैविक शेती बद्दल संपूर्ण माहिती,व्यवस्थापन , तसेच नियोजन माहिती अगदी मोफत मिळावी या साठी मी ग्रुप तयार केलेले आहे.तसेच उत्पन्न वाढ आणि विक्री व्यवस्थापन साठी शेतकरी मित्रांना मी नेहमी मदत करतो.कारण अन्नदाता सुखी भव:हेच आमचे ध्येय आहे जैविक पद्धतीने तसेच नैसर्गिक पद्धतीने शेती केली तर पर्यावरण पूरक शेती होणार.विषबाधा होणार नाही. शेती मध्ये पर्यावरण स्वच्छ असल्याने शत्रू कीटक जास्त प्रमाणात राहणार नाही आणि विषमुक्त अन्न ,विषमुक्त फळे तयार होत असल्याने आजारांचे प्रमाण कमी राहणार .शेतीवरील खर्च कमी झाल्याने शेतकरी सुखी होणार.आर्थिक बजेट शेती विषयक कमी होतील. जैविक शेती एकदम कमी खर्चात कशी करावी.जैविक शेती मध्ये विषमुक्त अन्न, धान्य, फळे, भाजीपाला कसा तयार करावा.शेतकरी मित्रांना घरीच जैविक पद्धतीने कीड नियंत्रण माहिती देऊ. नैसर्गिक पद्धतीने शेती का करावी.उत्पन्न वाढ करून शेती वरील खर्च कसा कमी करावा. पिकेल ते विकेल हे मार्गदर्शन शेतकरी मित्रांना देऊ.तसेच आंरराष्ट्रीय शेतमाल कसा विक्री करावा. शेतकरी मित्रांना जैविक शेती बद्दल संपूर्ण माहिती,व्यवस्थापन,तसेच नियोजन अगदी मोफत मिळावी व उत्पन्न वाढ आणि विक्री कशी करावी या माहिती ने शेतकरी मित्रांना मदत व्हावी या साठी ही माहिती देत आहे.
Social Plugin