Ad Code

Responsive Advertisement

ओळख रानभाजी कर्टुले (काटवाल) लागवड ची आणि पोषणाची.

ओळख रानभाजी कर्टुले (काटवाल) लागवड ची आणि पोषणाची,नियोजनाची.
सामान्यतः " कर्टुले किंवा कंटोला " म्हणून ओळखली जाणारी ही भाजी शतकानुशतके भारतामध्ये लागवड केल्या जाणाऱ्या प्रसिद्ध आणि पौष्टीक अशा दुर्मिळ रानभाज्यांपैकी एक आहे.ती भाजी आरोग्यसाठी खूप महत्वाची असून त्या भाजीमध्ये 
पौष्टिक मूल्य प्रति १०० ग्रॅम खाद्य फळामध्ये 
- ८४.१ % आर्द्रता - ७.७ ग्रॅम
 कार्बोहायड्रेट - ३.१ ग्रॅम
प्रथिने - ३.१ ग्रॅम 
चरबी - ३० ग्रॅम 
फायबर - १.१ ग्रॅम तसेच या मध्ये 
खनिजे एस्कॉर्बिक ऍसिड , कॅरोटीन , थायामिन , रिबोफ्लेविन आणि नियासिन यांसारखी आवश्यक जीवनसत्त्वे देखील काही प्रमाणात आहे. म्हणुन ही भाजी खूप आरोग्यासाठी महत्वाची आहे.मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी फार लाभदायक आहे.कारण ती भाजी खाल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी करते, कर्करोग होण्याची शक्यता कमी करते.डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो.याचा आहारात वापर केल्याने जास्त घाम येणे
 ( हायपरहायड्रोसिस ) कमी होते.फायबर आणि ॲटी ऑक्सिडंट्सचे प्रमाण भरपूर असल्याने सुलभ पचनासाठी अतिशय उपयुक्त आहे.आपल्या आहारात याचा वापर केल्यास खोकल्याची समस्या व श्वसनासंबंधीचे त्रास कमी होण्यास मदत होते.प्रति १०० ग्रॅम कंटोला मध्ये ७२ MCG इतके फोलेट असते , जे नवीन जन्मलेल्या मुलांमध्ये आढळणारे न्यूरल ट्यूब डीफेक्टस कमी करण्यास मदत करते.यासाठी गरोदर मातांना या भाजीचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो मुख्यतः पश्चिम बंगाल आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये या रानभाजीची मोठ्या प्रमाणात व्यावसायिक लागवड केली जाते.उत्तर प्रदेश , ओडिशा , झारखंड , महाराष्ट्र , छत्तीसगढ आणि मेघालयाच्या काही भागामध्ये देखील याची लागवड केली जाते.
मुख्यतः भारतामध्ये प्रमुख दोन जाती आढळतात.
१ )पहिली आहे ती देशी किंवा गावरान .हे फळ बारीक गोलाकार असते.फळाचा व्यास सरासरी १ इंच आणि लांबी १.५ ते २ इंच असते .बाजारात या जातीला विशेष मागणी असते .याची उपलब्धता ही फक्त जुन ते ऑक्टोबर या कालावधीत असते.
२ )दुसरी आहे ती संकरित किंवा हायब्रिड .याचे फळ मोठे , लांब आणि दंडगोलाकार असते .फळाचा व्यास सरासरी १.५ इंचापर्यंत असतो आणि लांबी २.५ ते ३.५ इंचापर्यंत असते.या पिकासाठी उबदार हवामान पोषक असते .पिकाच्या उत्तम वाढीसाठी कमी आद्रता आणि भरपूर सूर्यप्रकाश गरजेचे आहेत.साधारणतः २५ ते ३५ डिग्री तापमान असलेल्या प्रदेशामध्ये या पिकाची लागवड करता येऊ शकते .त्यामुळे उत्पन्न मिळतात.पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये कर्टुले लागवड करता येते .वालुकामय रेताड जमीन अधिक पोषक असते. पाणथळ जागेत लागवड टाळावी कारण तिथे फुल गळ समस्या आणि बुरशी समस्या वाढतात.पिकाच्या उत्तम वाढीसाठी मातीचा सामू ( PH) हा ५.५ ते ७ इतका असावा. भरपूर सेंद्रिय द्रव्य असलेली जमीन या पिकासाठी अतिशय चांगली असते.बियाणांची लागत ही बियाणाच्या उगवण क्षमतेवर अवलंबून असते .
३)त्यासाठी बीज प्रक्रिया करणे खूप आवश्यक असते.मध्यम स्वरूपाची उगवण क्षमता असेल तर एकरी दीड ते दोन किलो बियाणे लागते .उच्य प्रतीची उगवण क्षमता असेल तर एकरी एक किलो बियाणे पुरेसे होते .कंदापासून लागवड करायची असल्यास एकरी ५००० ते ५५०० कंद लागतात. परंतु कंदापासून केलेली लागवड आपला उत्पादन खर्च वाढवते.महाराष्ट्रामध्ये कर्टुले या पिकाची लागवड मार्च ते मे महिन्यात करतात.कर्टुले लागवडीच्या पुर्वमशागतीमध्ये जमिनीची मशागत खूप महत्वाची आहे .त्यासाठी जमिनीची खोलवर नांगरणी करून घ्यावी .नंतर दोन ते तीन वेळा रेघा पाळी करून माती भुसभुशीत करावी .याच वेळेस आपण चांगले कुजलेले शेणखत,गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत मिसळू शकता .तसेच बुरशीनाशक वापर करू शकता.कीटक नियंत्रणसाठी निम अर्क वापर करू शकता.
४)पाणी देण्याची सुविधा जशी असेल ( ड्रीप किंवा दंडाने ) त्या प्रमाणे बेड किंवा सऱ्या पाडून घ्याव्या .आमच्या अनुभवानुसार दोन ओळीतील अंतर हे ४ फूट व दोन रोपातील अंतर २ फूट असावे .अशा पद्धतीने आपल्याला एकरी ५४४५ वेलांची लागवड करता येईल .या पिकांमध्ये नर वेल आणि मादी वेल असतात .व्यावसायिक लागवड करायची असल्यास अधिक उत्पन्नासाठी जास्त वेल लावावेत.तसेच मादी आणि नराचे प्रमाण ठेवावे म्हणजे चांगले परागीभवन होते. वेलांना फुलं लागेपर्यंत आपण नर आणि मादी वेल ओळखु शकत नाहीत , म्हणून लागवड करताना एका ठिकाणी ४ ते ६ बिया टोपण करण्याचा सल्ला दिला जातो .चांगली उगवण व रोपांना बुरशीजन्य रोगापासून मुक्त ठेवण्यासाठी बिजप्रक्रिया आवश्यक असते .१ किलो बियाणांच्या प्रक्रियेसाठी १ लिटर पाण्यामध्ये ६ मिली कृषी संजीवक व २० ग्रॅम ह्यूमिक ऍसिड मिसळुन ते बियाणे ८ ते १२ तास भिजवून ठेवावे .नंतर लागवडीपूर्वी १ तास बियाणे सावलीत सुकवावे. बियाणे एकदम कोरडे होऊ देऊ नये ,थोडा ओलसर पणा असल्याने बियाण्याची उगवण लवकर होते.अन्यथा उगवणीवर परिणाम होतो .
५)लागवड करण्याआधी दोन दिवस बेड ओला पूर्णपणे करून घ्यावा. पाणी सोडून चांगला भिजवुन घ्याव्या .वापसा झाल्यानंतर एक ते दीड इंच खोलीवर बिया टोपाव्यात .लागवड झाल्यानंतर १० ते २५ दिवसात बियांची उगवण दिसण्यास सुरवात होते .लागवडीपासून ७५ ते ८० दिवसात फुले येण्यास सुरवात होते व पुढील ७ ते ८ दिवसात पीक पहिल्या तोडणीसाठी तयार होते .पाणी व्यवस्थापनासाठी पाण्याच्या उपलब्धतेनुसार सरी पद्धत किंवा ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करू शकतो . बियांच्या लागवडीनंतर लगेचच पाणी द्यावे . नंतर हवामान आणि जमिनीच्या आद्रता नुसार एक दिवसाआड पाणी द्यावे .या पिकासाठी सेंद्रिय किंवा रासायनिक अशी दोन्हीही खते देऊ शकतो.जमिनीमध्ये एकरी १० टन चांगले कुजलेले शेणखत ,गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत मिसळावे.नंतर वरखतांची आवश्यकता लागत नाही. पिकासाठी रासायनिक खतांचा वापर करायचा असल्यास लागवडीपूर्वी प्रति एकरी NPK खते किलो या प्रमाणात जमिनीत मिसळून घ्यावे.वेळेवर तणांचा बंदोबस्त करणे हे फायद्याचे ठरते कारण पिकातील तणामुळे पिकावर थ्रिप्स , पाने व फळे खाणाऱ्या अळ्या आणि फळमाशीचा पादुर्भाव होऊ शकतो .त्यामुळे वेलं लागवड केलेल्या क्षेत्रात कुठलेही तणनाशक फवारणी करू नये .चिकट सापळे कीटक नियंत्रण साठी नक्की वापर करा.तसेच फळमाशी ट्रॅप नक्की लावा.शक्य झालंय तर निम अर्क फवारणी.गो कृपा अमृत फवारणी करावी.
६)हे एक वेलवर्गीय पीक असल्यामुळे वाढ आणि विस्तारासाठी आधाराची गरज लागते .दोन प्रकारे आपण वेलांना आधार देऊ शकतो.साधारणतः दोन ते अडीच महिन्यामध्ये पीक तोडणीसाठी तयार होते पहिल्या तोडणीनंतर दर तीन - चार दिवसांनी तोडणी करणे योग्य राहते , यामुळे फळाची जास्त वाढ होऊन पिकण्याची प्रक्रिया सुरु होत नाही व बाजारात ताजी कोवळी कर्टुली विकता येतात.आपण कर्टुले या पिकाचा तोडणी हंगाम जून पासुन ऑक्टोबर पर्यंत चालतो . या पूर्ण हंगामामध्ये प्रति मादी वेल सरासरी एक ते दीड किलो उत्पन्न मिळते. अशा पद्धतीने पूर्ण एक एकरामधील ४ ९ ०० मादी वेलापासून ४ ९ ०० किलो उत्पन्न मिळेल . जुन ते ऑक्टोबर २०२१ चा होलसेल रेट सरासरी ८० - १०० रुपये प्रति किलो इतका होता. या गणिताप्रमाणे एकरी ४ , ९ ०,००० रुपये इतके उत्पन्न मिळते.

पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यूट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.


टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या