सोयाबीन पेरणी नियोजन ,माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापन▪️पेरणी लागवड पूर्वी काही चाचणी करणे खूप गरजेचे असतात.त्यासाठी जमिनीची चाचणी म्हणजे माती परीक्षण करणे खूप आवश्यक आहे.नंतर जमिनीची पूर्वमशागत म्हणजेच नागंरण पाळी, वखरण पाळी करणे होय.
▪️बियाणे निवड करताना आपण कोणते बियाणे वापर करावे ते समजून घेतले पाहिजे.१० वर्षाच्या आत मध्ये या बियाण्याचे रोग आणि प्रतिकार शक्ती कशी होते.ते माहिती समजून घेतले पाहिजे. वाण कोणते , आपल्या शेत जमीन मध्ये चांगले येऊ शकते.पाऊसाचे नियोजन कसे होतील.बुरशी समस्या जास्त येतील का.हे सुद्धा आपण समजून घेतले पाहिजे आणि जाणीवपूर्वक अभ्यास केला पाहिजे.सोयाबीन लागवडीकरिता मध्यम भारी प्रतीची उत्तम पाण्याचा निचरा होणारी , तसेच सामू ६.५ ते ७.५ असणारी जमीन निवडावी . कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता नांगरणी नंतर वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन जमीन समपातळीत करावी त्याचबरोबर शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी ५ टन कुजलेले चांगले शेणखत टाकावे. ▪️ वाण निवडले नंतर बीज अंकुर चाचणी करायला पाहिजे.सोयाबीन बियाणे चे उगवण शक्ती तपासून घेणे.बियाणे योग्य आहे का ते माहिती परिपूर्ण पाहून घेणे.ते बियाणे योग्य असेल तर ज्या मान्सून पूर्व पाऊस आपल्या शेतात येईल.त्या दिवशी ७५-१०० मिलिमीटर पाऊस होणार. असे गृहीत धरून आपण स्वतः मातीत ओलावा ६ इंच जास्त राहील अशी पाहणी करावी.तेव्हा पेरणी योग्य होणार असे इतर पेरणी करणे.पेरणी यंत्र वापर करताना साधे पेरणी यंत्र किंवा BBF यंत्र ने पेरणी करायला पाहिजे .शक्य नसल्यास लाकडी तिफन घेऊन पेरणी करावी.
BBF यंत्र चे फायदे :-
पेरणीची खोली नेमकी 3-5 सेमी ठेवता येते.दोन ओळींतील व दोन रोपांतील अंतर योग्य राखता येतं.हवा,सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात मिळतो.आंतरमशागतीची कामे सोपी होतात.यांमुळे संरक्षित सिंचन देण्यास मदत होते.बियाण्याची बचत होते.उत्पादनात वाढ होते. ▪️पेरणी करताना ३-५ सेमी खोलीवर पेरणी करावी.आणि दोन ओळीतील अंतर तसेच दोन रोपांतील अंतर ४५*१० सेमी.पेरणी यंत्र सोबतच शेतकरी मित्रांनी माती परीक्षणानुसार अहवाल नुसार खतांचा वापर करावा .सोयाबीन
( पेरणीच्या वेळी ) मात्रा द्यावा. युरिया ( नत्र ) : एकरी 43 कि - सिंगल सुपर फॉस्फेट ( स्फुरद ) : एकरी 188 कि म्युरेट ऑफ पोटॅश ( पालाश ) : एकरी 30 कि सिंगल सुपर फॉस्फेट दिलं नसेल तर सल्फर ( गंधक ) : एकरी 10 कि
असावेत. नंतर पेरणी करून झाले नंतर किती दिवसात बीज अंकुरतात यांची चाचणी करावी.
▪️खत व्यवस्थापनसाठी शेणखत , गांडूळ खत,हिरवळीचे खत,कंपोस्ट खत द्यावेत. मातीच्या गरजेनुसार तसेच माती परीक्षण नुसार खते द्यावे.सुरुवातीला पिकांची वाढ वर्तक म्हणून कृषी संजीवक वापर करावा.तसेच गो कृपा अमृत वापर करावा.
▪️पाणी व्यवस्थापनमध्ये ठिंबक सिंचन चा वापर केल्यास योग्य उत्तम आहे.नसेल तर सध्या पद्धतीने म्हणजेच तुषार सिंचन चा वापर करावा.सोयाबीन पिकाला मुख्यतः २ वेळा पाण्याची खूप गरज असते.पहिलेच फांद्या फुटताना ३०-३५ दिवसात पाणी देणे खूप आ्हानात्मक असते.तसेच पीक फुलोरा अवस्थेत असताना ४०-४५ दिवसांनी नक्की पाणी द्यावेत.पावसाचा खंड पडल्यास तुषार सिंचन चा वापर करावा.किंवा साध्या पद्धतीने पाणी नियोजन करावेत. ▪️तण व्यवस्थापन साठी पाहिले डवरण पाळी २५ दिवसांनी द्यावे. नंतर व्यवस्थापन पाहून तण नियंत्रण करावेत.तण नाशक योग्य असल्यास आपण फवारणी करू शकता तण नियंत्रण साठी.त्यामुळे पिकावर येणारे रोग नियंत्रण होतील.पीक फुलोऱ्यात असताना डवरण पाळी देऊ नयेत.सोयाबीन पिकाला पहिली फवारणी १५-२० दिवसांनी करावी.तसेच दुसरी फवारणी वाढ वर्तक म्हणून आणि कीड नाशक म्हणून २५-३० दिवसांनी करावी.पीक फुलोर अवस्था मध्ये असताना ४५-५५ दिवसात शेवटची फवारणी करावी.
▪️कीटक नियंत्रण साठी आपण जैविक कीडनाशक चा वापर करायला पाहिजे.त्यासोबतच निम अर्क, दशपर्णी अर्क, व्हर्टीसेलियम लेकाणी , बिव्हरिया बसियाना, मेटारायझम अनिसोपली वापर करावा.यात प्रामुख्याने खोडमाशी ,रस शोषण करणारे कीटक,उंट अळी,पाने खाणारी अळी तसेच इतर कीटक जैविक कीडनाशक वापर करून नियंत्रण करावेत.शक्य झाल्यास फवारणी सकाळी ८ वाजता पासून करावी.दुपारी जास्त उन्हात फवारणी करू नयेत.
पीक संरक्षण
• रोगांचा बंदोबस्त
१ ) मर रोग फुजॉरियम ऑक्सीस्पोरम , उपजात सायसेरी या बुरशीमुळे मर रोग होतो .या रोगामुळे २५ ते ४५ टक्के उत्पादनामध्ये घट झाल्याचे आढळते . उपाय मर रोग प्रतिबंधक जातीचा वापर करावा.
२ ) मुळकुंज : हा रोग राझाक्टोरिया बटाटीकोला या बुरशीमुळे होतो .
३ ) मानकुजव्या हा रोग स्क्लेरोशियम सेल्फसाय या बुरशी पासून होतो .
उपाय : पिकास पाण्याचा ताण पडणार नाही असे पाण्याचे व्यवस्थापन करावे . बियाण्यास पेरणीपूर्वी बियाण्यास बीज प्रक्रिया करावी.शेतातील रोगट फांद्या , धसकटे इत्यादी वेचावे म्हणजे रोगाचा प्रसार टाळता येईल .
• किडींचा बंदोबस्त : सोयाबीन पिकावर पाच प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव दिसुन येतो.परंतु या पैकी सर्वात महत्वाची व आर्थिक नुकसानकरणारी प्रमुख किड म्हणजे खोड कीड ही होय . ▪️एकरी पिवळे निळे चिकट सापळे ५० लावावेत.लाकडी काठी वर बांधावेत.कामगंध सापळे चा प्रत्येक शेतकरी मित्रांनी वापर करायला पाहिजे.एकदम कमी खर्चात होणारे कीटक नियंत्रणसाठी पक्षी थांबे एकरी २० - २५ लावावेत.प्रकाश सापळे एकरी ४ लावावेत.
जैविक खतांचे फायदे : जमिनीची नैसर्गिक व जैविक सुपिकता टिकून राहते.पर्यावरणाचा समतोल राखला जातो . उपयुक्त जिवजंतू व मित्र किडींना कसलाही अपाय होत नाही.सेंद्रीय पदार्थ कुजण्यास मदत होते व जमिनीचा पोत सुधारतो.नैसर्गिक पद्धतीने अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते . पिकाच्या उत्पादनात वाढ होते .जमिनीत सोडलेल्या प्रतिजैविकांमुळे पिकाची रोग व किड प्रतिकारशक्ती वाढते .जैविक खतांनी जमिनीत सोडलेल्या संजिवकामुळे बियाण्याची उगवणशक्ती वाढते व पिकांची वाढ चांगली होते.जैविक खतांमध्ये जमीन , पाणी व पिके यांसाठी अपायकारक अशी रसायने नसतात .जैविक खते तुलनेत स्वस्त असतात त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होते .
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यूट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.
टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560
0 टिप्पण्या
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र
कु- हा , अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू 9529600161