जमिनीमध्ये पीक पेरणी केल्यानंतर पिकांना डवरणी आणि खुरपणी (निंदन) खुप महत्वाचे असते
• डवरणी केल्यानंतर पिकांना ऑक्सिजन मिळते.पिकामधिल निघालेले आणि नको असलेले पिकांचे अवशेष निघून जातात. तण निघून गेल्याने पिकांची वाढ लवकर होते.
• जमिनी मध्ये मोकळी हवा खेळत राहते.त्यामुळे पिकांना अन्नद्रव्य पुरवठा सुरळीत होतो.
• जमिनी मध्ये अंडी घातलेली हुमणी अळी ,तयार झालेली हुमणी अळी, उदळी चे नियंत्रण होते.जमिनी मधील कोष आणि इतर बुरशी समस्या नियंत्रण होतात.
• रोझोयोबियंम् ,PSB ,KMB या जिवाणू culture चि बीज प्रकिया केल्याने पिकावर गाठी तयार होतात.पिके सक्षम बनतात.पिकांना अन्नद्रव्य मिळतात .
• जमिनीला उन्ह मिळाल्याने जमिनीमधील बुरशी कमी होतात.गांडूळ ची फेरपालट झाल्याने संख्या वाढ होते.आणि लहान पिल्ले दिसायला लागतात.गांडूळ अंडी जास्त दिसायला लागतात.
• पिकांची रोगप्रतिकाशक्ती क्षमता समजते.सूक्ष्म जीव सुद्धा जलद काम करू शकतात.रासायनीक फवारणी खर्च, तणनाशक खर्च वाचतो.मजूर खर्च , पैसा वाचतो.त्यामुळे जैविक शेती खूप फायद्याची ठरते.त्यामुळे जैविक शेती शेतकरी मित्रांनी नक्की करायला पाहिजेत. • पिकांचे अवशेष कुजल्याने जमिनीचा सेंद्रीय कर्ब वाढतो.फुल गळ समस्या खूप कमी होते.पांढऱ्या मुळांची संख्या माहिती होते.
• पीक पाहणी होत असल्याने पिकावर कुठली फवारणी आवश्यक आहे असे समजते.त्यामुळे चिकट सापळे लावणे खूप महत्वाचे आहे.पिकांची सूत्रे समजते.पिकांचे नियोजन समजतात.कारण शेतकरी मित्रच शेती तज्ञ आहे. • खुरपणी करताना प्रत्येक पिकाची समस्या समजते तसेच जमिनीमधून पिकांना काय कमी पडत आहे त्यांचे नियोजन करता येतात.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यूट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.
टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560
0 टिप्पण्या
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र
कु- हा , अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू 9529600161