ज्याला माती कळाली त्याला शेती कळाली.शेती हा विषय न समजणारा आहे त्यामुळे शेतीचा मुख्य पाय म्हणजे माती हा मुख्य घटक समजून घेणे खूप आवश्यक आहे.ऊसाची पाचट जाळु नका.शेतकरी मित्रहो.शेतात कुजवा.सेंद्रिय कर्ब वाढवा.जमिनी सुपीक बनवा.
पाचट जाळणारे शेतकरी मित्र स्वतःचे घर व भविष्य जाळत आहे.त्यासाठी शेतकरी मित्रांनी पुन्हा विचार करायला पाहिजे.शेतात उसाचे पाचट जाळणे म्हणजे जमिनीतील सूक्ष्मजीव नष्ट करणे होय.त्यामुळे प्रत्येक शेतकरी मित्रांनी उसाचे पाचट शेतातच कुजवायला पाहिजे.त्यासाठी आपण डी कंपोजर, जिवामृत,गो कृपा अमृत, यांचा सर्वात जास्त वापर करायला पाहिजे.कारण मी शेतकरी मित्रांच्या शेतातील स्वतः पाचट कुजविले आहे.सेंद्रिय कर्ब वाढविला आहे.ऊस पिकासाठी त्यांना खते सुद्धा कमी द्यावी लागली.रोग ,कीड,बुरशी सुद्धा नियंत्रण झाले.एकरी उत्पन्न सुद्धा चांगले आले.जमिनीतील नैसर्गिक गांडूळ सुद्धा वाढीस आले आहे.
शेतकरी मित्रहो आपण स्वतः स्वर्गाचेही घर जाळत आहेत.आपण जेव्हा एकरी ५ टन उसाचे पाचट जाळतो तेव्हा त्याच जमिनीवर पुढील ऊसाला जगवणारे सर्व तत्वं , पंचतत्व, त्या पाचटजाळण्यांतून नष्ट होते .तसेच जमिनीतील सशक्त बनविणाऱ्या अनंत कोटी जीव जंतूंचं राहतं घर तुम्ही नष्ट करीत आहेत .ऊसाच्या पाचटात असे आहे काय ? हे नक्की समजून घ्या .
ऊस पिक जमिनीतून जी अन्नद्रव्ये उचलतात ,तसेच खत आणि फवारणी मधून जी घटक घेतात ते सर्व घटक उसाचे पाचट मध्ये आहेत. व ती सगळीच असतात.म्हणजे आपण जो ऊस पिकवितो, तो ऊस आपल्या जमिनीतून जे जे काही उचलतं, ते सगळं चिपांड, पाचट व वाढयांत असतं व खोडकीतही असतं हे सगळं (ऊसातील रस सोडून ) जरी जमिनीला आच्छादन म्हणून परत केलं , तरी तेवढा ऊस जगण्याला जे जमिनीतून पाहीजे ते मिळून जातं वरून टाकण्याची गरज राहत नाही . हे पक्के लक्षात घ्यावे . एक हेक्टर उसापासून हे पाचट किती मिळते व त्यात काय असते ? ८ ते १० टन पाचट मिळते . ते जर ऊसात / द्राक्ष /केळी /डाळींब / नारळ / सुपारी / आंबा / संत्रा उभ्या फळपिकात आच्छादन म्हणून वापरले व कुजविले तर त्यापासून ४ / ५ टन खत मिळते हया खतात त्याच्या एकुण वजनाच्या ०.४८ % नत्र , ०.१९ % स्फूरद, ०.९२% पालाश, ०.९४ % कॅल्शिअम , ०.७४ % मॅग्नेशियम , ०.१२% सोडिअम, ०.१७ % लोह, ०.००९ % मॅग्नीज, ०.००४ % जस्त,० .०००३ % तांबे . इत्यादी अन्नघटक असतात. ते वरील सर्व फळपिकांत आच्छादन म्हणून टाकले तर पिकाला सहज उपलब्ध होतातच. ! शिवाय _जीवजंतूची आच्छादनाखाली व परिसरात प्रंचड वाढ होते व आच्छादनाचे इतर सर्व फायदे मिळून येतातच .त्यासाठी ऊसाचे पाचट न जाळून स्व:तावर कृपा करून जीवजंतूचे पर्यायाने निसर्ग सजीव सृष्टीचे रक्षण करुन शाश्वत शेती करूया . जमीन सुपीक बनवूया.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यूट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.
टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560
0 टिप्पण्या
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र
कु- हा , अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू 9529600161