Ad Code

Responsive Advertisement

नियोजन तसेच व्यवस्थापन खरीप हंगाम मधील कपाशी(कापूस) पिकांचे.कारण कापसाचे भाव सर्वांना माहिती असल्याने चाहूल सर्वात जास्त कपाशी लागवडीची.

"नियोजन तसेच व्यवस्थापन खरीप हंगाम मधील कपाशी(कापूस) पिकांचे."
प्रथमत कपाशी नियोजन करण्याआधी माती परीक्षण आणि पाणी परीक्षण करणे.आपल्या गावाजवळील किंवा शहराजवळील शासकीय माती प्रयोगशाळा मध्ये माती आणि पाणी नेऊन परीक्षण करावे.लवकरच रिपोर्ट प्राप्त करावेत.रिपोर्ट नुसार खतांच्या कोणत्या मात्रा कधी द्यावा हे लिहून ठेवावे.खुप महत्वाचे आहे .त्यानंतर मशागत म्हणजे जमिनीचा पोत सुधारणे होय.तसेच जमिनीतील हानिकारक बुरशी ,कीड,कोष नष्ट करणे होय.त्यासाठी नागरपाळी करणे नंतर वखार पाळी करणे.आणि जमिनीला तापू देणे.
सुरवातीला मान्सूनचा पहिला पाऊस येताच माती सोबत सुंगंध येणार हे मात्र नक्की.नंतर चाहूल बियाणे पेरणी करण्याचे.बियाणे पेरणी कोणते करावेत.या साठी महत्वाच्या काही सूचना. मागील वर्षी बियाणे जास्त कोणते खरेदी झाले.कोणते बियाणे चांगले निघाले.कोणत्या बियाण्यावर रोग कमी आले.उत्पन्न किती आणि कसे झाले.त्यावरील फवारणी खर्च , खते खर्च किती झाला.हे सर्व बारीक तपासून पाहणे.नंतर बियाणे आणणे.किंवा घरी असलेले घरगुती बियाणे पाहणे .त्याला साफ करणे.थोडेफार बियाणे घेऊन बिज प्रक्रीया करणे.नंतर घरीच बियाणे पेरणी करून निरीक्षण करणे.किती दिवसात निघतात.उगवण क्षमता कशी आहे.या नोंदी ठवणे लक्षपूर्वक.
▪️घरचे बियाणे योग्य असणार तर घरीच तयार केलेले बियाणे पेरणी करावे .ते नियोजन आपण कोणत्या पद्धतीने करावेत ते माहिती परिपूर्ण घेऊन करावेत.जमिनीतील पूर्णपणे उष्णता कमी होऊ देणे.जमिनीतील ओलावा सर्वदूर पसरू देणे.नंतर स्वतःचे नियोजन खुप महत्वाचे आहे .जोरखते देणे शक्य होत असल्यास द्यावे
▪️ पेरणीसाठी नियोजन शक्य जसे होईल तसे करावे.एकदम मोकळ्या भागात सरी पद्धतीने पेरणी करावी.म्हणजेच तण नियंत्रणसाठी मजुरी खर्च वाचणार.घरीच तयार केलेले बियाणे पेरणीपूर्वी ३-५ दिवस आधीच कृषी संजीवक आणून ठेवणे फार महत्वाचे आहे.जोरदार पाऊस होताच त्याच दिवशी बियाणे काढावेत.बीज प्रक्रिया साठी कृषी संजीवक वापर करावेत.रात्रभर घरातच सुकू देणे.एकदम सावली मध्ये सुकू देणे.सकाळी तेच बियाणे,सरी साठी लागत असलेले लाकडी तिफन, घेऊन शेतात यावे.सरी झाले पूर्ण केले नंतर  पेरणी करावी.एकदम मोकळ्या पद्धतीने आणि सुटसुटीत.म्हणजे पीक मोठे झाले की हवा सर्व पिकांना मिळाली पाहिजेत.त्यामुळे बोंडे वजनदार होतील.बोंड सडणे ,बुरशी समस्या कमी होणार.सर्व पिकांना उन्ह मिळणार.
▪️सारे पद्धतीने पेरणी झाले नंतर पाऊस पडणे किंवा थोडीफार पावसाची सर येणे खूप गरजेचे असते.नाहीतर दुस - या दिवशी आपण स्वतः थोडेफार स्प्रिंकलरने पाणी दयावे.जमिनीमधून रोपटे उगवणे सुरू असल्यास पाणी व्यवस्थापन खुप महत्वाचे आहे.त्याकडे सर्वात आधी लक्ष देणे.त्यासाठी पाऊस येणे थोडेफार गरजेचे आहे.पीक हे ६ पानी झाले की, पहिला फवारा म्हणजेच वाढवर्धक आणि रोग प्रतिकारशक्ती वर्धक असते.त्यासाठी कृषी संजीवक,देशी ताक ,गांडूळ पाणी ,गूळ ,हिंग,गोमुत्र देणे.माती परीक्षण अहवाल नुसार जोरखते आणि शेणखत किंवा गांडूळ खत द्यावे.नंतर पाणी नियोजन करणे.लागेल तेवढे पाणी आवश्यक द्यावे.सापळा पिके लावणे तसेच मिश्र पीक लावणे.त्यामुळे मित्र कीटक सवर्धन होतात.
▪️तण व्यवस्थापनसाठी आधी डवरणी दयावी.नंतर निंधन करून घ्यावेत.मग पाणी व्यवस्थापन पहावेत.सुरुवातीलाच कीटक नियंत्रणसाठी निम अर्क , दशर्पणी अर्क,गो कृपा अमृत,लमित अर्क,CVR पद्धत,वापर करणे. काळा मावा, तुडतुडे, फुलकिडे, भुंगा कीटक, पांढरी माशी,हिरवे कीटक ,इतर पतंग वर्गीय कीड नियंत्रण करण्यासाठी इको पेस्ट ट्रॅप शेतात एकरी ४ लावावेत.तसेच झाडाला जमिनी मधून तांदूळ पाणी ,नारळ पाणी , गूळ पाणी द्यावे.झाड सक्षम बनण्यासाठी झाडाला कृषी संजीवक सोबत मासोळी तैल द्यावे.पिकांना फुलपाती येताच पाणी व्यवस्थापन करणे.फुल गळ समस्या कमी करण्यासाठी पळस रसायन,कृषी संजीवक,अंडा संजीवक, बेलव रसायन, अमृत पाणी, वापर करणे.अजून काही पिकांना होत असलेल्याला समस्या जाणून घेणे.त्यासााठी कृषी पत्रिका वापर करणे.पुन्हा तण व्यवस्थापन करावेत.त्यामुळे जमिनीची फेरपालट होते.गांडुळांची संख्या वाढ होते.जमिनीत ऑक्सिजन जास्त मिळते.हवा खेळती राहते.जमिनीतील बुरशी आणि हुमणी कीड नियंत्रण होते.नंतर आपण प्रत्येक लक्षपूर्वक आणि काळजीने बोंड अळीचे   पतंग पकडण्यासाठी सापळे असलेले एकरी ६ फेरोमन ट्रॅप लावावे. प्रत्येक अमावस्या मध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी फवारणी कीटक नियंत्रणाची करावी. गळ फांदी काढावी. ज्या फांदीला फुले येतच नाही ती फांदी काढून टाकणे खूप फायद्याचे.
▪️फुल अवस्था मध्ये पिके आल्यास फुल टिकविणे महत्वाचे आहे त्यासाठी कृषी संजीवक ,नारळ पाणी, ताक, पंचगव्य, आवळा रसायन, कोहळा रसायन वापर करणे.निंदन सुद्धा फार महत्वाचे आहे.आणि पिकांना आवश्कतेनुसार पाणी देणे.मित्र कीटक सवर्धन असलेले ट्रायकोग्रामा मित्र कीटक कार्ड वापर करणे.गांडूळ खत व्यवस्थापन करणे.
▪️तसेच एकरी पिवळे निळे चिकट सापळे ५० लावावेत.त्यावर सुद्धा पांढरी माशी, तुडतुडे ,फुलकिडे, भुंगा किड, पतंग वर्गीय किड, रस शोषण करणारे कीटक, हे चीपकुन मरून जातात.त्याच लाकडी काठीवर पक्षी थांबे तयार करावेत.जैविक पद्धतीने अळी नियंत्रण करण्यासाठी पक्षी सुद्धा कार्य करतात.त्यात पाणी नियोजन , फवारणी नियोजन खुप महत्यावे आहे.पक्ष्यांना सुद्धा अन्न पाणी उपलब्ध करून द्यावे.त्यामुळे मधमाशी सुद्धा परागीकरण करतात.
▪️बोंडे अवस्थामध्ये पिकांना खूप काळजी द्यावी लागते ,त्यासाठी कृषी संजीवक सोबत ताक तसेच गो कृपा अमृत फवारणी करावी.माती परीक्षण नुसार खत नियोजन म्हणजे गांडूळ खत, बोनमिल वापर करावा. पहिली - दुसरी वेचणी झाले नंतर कृषी संजीवक फवारणी करणे.फुलांची संख्या वाढ होवुन फुल गळ कमी होतील.बोंड अळी आली तर बोंडअळी नियंत्रण साठी हिंग,गोमुत्र,ताक,तुरटी,मीठ फवारणी करावी.प्रत्येक शेतकरी मित्रांना  उत्पन्न जमिनीतील सेंद्रिय कर्ब पाहून मिळणार.त्यासाठी माती परीक्षण अहवाल नुसार जोरखते मध्ये गांडूळ खत, निंबोळी पेंड, बोन मिल,कंपोस्ट खत,हिरवळीचे खते नियोजन करावेत.पण शक्य झाल्यास खर्च खूप कमी करावा.नैसर्गिक पद्धतीने कोणतेही खत मिळत असतील तर त्याकडे सर्वात आधी लक्ष द्या.तेव्हाच शेती समृध्द होतील.उत्पन्न दुप्पट होतील.योग्य हमीभाव मिळणार.पिकांचा दर्जा सुधारेल तर उत्पन्न मध्ये सुद्धा जास्त हमीभाव मिळणार.
▪️घरी आलेले पीक राखून ठेवणे.कृपया विक्री करायची घाई करू नये.कारण नवनवीन बाजारात पीक आले की सुरवातीला भाव चांगला असतो.नंतर पूर्ण भाव कमी होते.शेतकरी मित्रांना योग्य भाव मिळत नाही.विक्री सुद्धा करायची असेल तर जेवढी गरज आहे तितकेच विक्री करा.कारण कपाशी पिकाला योग्य भाव राहणारच.हे मात्र सत्य आहे.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यूट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.


टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या