शेतकरी मित्रांनी तज्ञांच्या सल्ल्यानेच स्वतःच्या शेतामध्ये रासायनिक खते तसेच रासायनिक फवारणी अती प्रमाणात केल्या.त्यामुळे शेतांमध्ये रासायनिक खतांचा भरपूर वापर केला गेला.त्याचे दुष्परिणाम सुद्धा जाणवायला लागले आहेत.त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी रासायनिक खतांच्या ऐवजी सेंद्रीय खतांचा आणि गांडूळ खताचा वापर करणे योग्य आहेत. सेंद्रिय खते,गांडूळ खत,हिरवळीचे खत वापरणे खूप आवश्यक आहे.१९६० च्या दशकामध्ये भारत देशाला पुरेल एवढे धान्योत्पादन होत नव्हते.आज आपल्या देशात २५ कोटी टन धान्योत्पादन होेते. १९५० साली देशात अवघे सहा कोटी टन धान्य उत्पादन होत होते.आजच्या मानाने त्यावेळची लोकसंख्या कमी होती. आज लोकसंख्या १३५ कोटीवर गेली आहे आणि १९५० साली ती अवघी ३८ कोटी होती. असे असले तरीही त्या लोकसंख्येच्या मानाने ते सहा कोटी टन धान्य उत्पादन कमीच होते. मात्र आपल्याला परदेशातून धान्य आयात करावे लागत असत.उदाहरण अमेरिका, रशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशातून आपण सतत धान्य आयात करीत असतो. आपल्या देशात शेती करायला चांगले वातावरण असतानाही आपल्यावर ही वाईट वेळ आली आहे.पण का येत आहे अजून या वर कोणीच बोलायला तयार नाही.धान्याच्या बाबतीत स्वावलंबन गाठणे हे त्या काळात आपले सर्वात मोठे अजेंडा होते. त्यासाठी धान्याची पैदास वाढवणे आवश्यक झाले होते. ती वाढली नसती तर भारतातल्या लाखो लोकांना उपासमार सहन करावी लागली असती. ती टाळण्यासाठी ताबडतोबीने धान्य उत्पादन वाढावे म्हणून सरकारने रासायनिक खतांच्या वापराला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. त्या काळामध्ये रासायनिक खतांचा वापर करणार्या शेतकर्यांना बक्षिसे सुद्धा देण्यात आली.मुफ्त मध्ये खते मिळत गेली.रासायनिक खताच्या अती वापर करावे सांगितले गेले. रासायनिक खतांचा वापर करणारा शेतकरी म्हणजे सुधारलेला शेतकरी असे त्या काळी समजले जात होते. परंतु आता रासायनिक खतांचे अनेक दुष्परिणाम समोर दिसायला लागले आहेत.येणारी पुढील पिढी आजार ग्रस्त दिसत आहे. विचार करणारे तसेच शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करणारे शेतकरी रासायनिक खताच्या ऐवजी सेंद्रीय खतांचा वापर करायला लागले आहेत. त्यामुळे आता आधुनिक आणि सुधारलेल्या शेतकर्यांची व्याख्या पूर्णपणे बदलून गेली आहे. जो रासायनिक खताचा वापर कमी करतो आणि सेंद्रीय खताचा वापर जास्त करतो तो खरा सुधारलेला शेतकरी असे आता समजले जायला लागले आहे. रासायनिक खतांचा वापर जितका जास्त करू तितकी जमिनीची प्रत बिघडते हे तर खरे आहेच.सत्य सुद्धा झालेले आहे. पण शेतातल्या जमिनीमध्ये असणार्या गांडुळांची संख्या कमी झाली. कारण रासायनिक खत गांडूळाला मानवत नाही. ज्या जमिनीत रासायनिक खताचा वापर जास्त होतो त्या जमिनीत गांडूळाची संख्या कमी झाली.सूक्ष्मजीव मारले गेले. गांडूळ कमी झाले की, शेतातल्या मातीमध्ये असणारे कृमी, कीटक आणि रोगजंतू हे मोकाट सुटतात. कारण त्यांचा धाडसा उडविणारे गांडूळ कमी झालेले असतात. त्यामुळे रासायनिक खत जितका जास्त वापरू तितके पिकांवर रोग जास्त पडायला लागतात.बुरशी वाढायला लागली.वर्षानुवर्षांच्या निरीक्षणानंतर असे आढळले आहे की, ज्या शेतात रासायनिक खतांचा मारा केला जातो त्या शेतातल्या पिकांवर रोगही जास्त पडतात. म्हणजे रासायनिक खतांमुळे आधी खतांचा खर्च वाढतो आणि नंतर औषधांचे खर्चही वाढतो .उत्पन्न सर्वात कमी होते.हमीभाव मिळत नाही. शेतांमधल्या पिकांवर औषधांचा मारा जास्त केला की, शेतातली पिके विषारी व्हायला लागतात. औषधे मारल्यामुळे अळ्या आणि लहानसहान कीडी मरतात हे खरे, परंतु अशा प्रकारे मरून पडलेल्या अळ्या किंवा किड्यांना खाण्यासाठी चिमण्या किंवा अन्य काही पक्षी शेतामध्ये यायला लागतात आणि अशा अळ्यांना खायला लागतात तेव्हा त्या अळ्या खाणारे पक्षी सुद्धा मरण पावतात.त्यामुळे आज शेतात सुद्धा पक्षी दिसत नाही आहे. कारण त्या अळ्यांच्या माध्यमातून त्यांच्यावर मारलेले औषध पक्ष्यांच्या पोटात जात आहे.पक्षी मरत आहे. पक्ष्यांना सुद्धा बुद्धी असतेच. शेतातल्या अळ्या खाल्ल्यामुळे पक्षी मरत आहेत हे त्यांच्या लक्षात येते आणि ते पक्षी पुन्हा शेताकडे फिरकत नाहीत. शेतात येत सुद्धा नाही.जिथे नैसर्गिक वातावरण आहे.तिथे ते राहतात.हे पक्षी शेतामध्ये येत राहणे त्यांनी शेतातल्या अळ्या, कीडी खाणे आणि जाताना शेतात विष्ठा टाकून जाणे या गोष्टी शेतीतले नैसर्गिक चक्र फिरत राहण्यासाठी आवश्यक असते. परंतु हे पक्षी शेताकडे फिरकनसे झाले की हे चक्र तुटते आणि शेताला आयतेच मिळणारे हे खत मिळेनासे होते आणि शेतातल्या किड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वारंवार औषधेच वापरावी लागतात. त्याचा परिणाम होऊन शेतातला खर्च वाढतो, पिके विषारी होतात.मानवाला सुद्धा नवनवीन आजार होत आहे. आणि परिणामी पिकांचा दर्जाही घसरतो. तेव्हा हे सारे नुकसान टाळण्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर हितकारक ठरणार आहे.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या यूट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.
टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560
0 टिप्पण्या
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र
कु- हा , अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू 9529600161