Ad Code

Responsive Advertisement

पावसाळ्यात करण्यात येणारे मुख्य नियोजन म्हणजे हुमणी अळी अंडी अवस्था, जीवन प्रणाली माहिती आणि नुकसान व नियंत्रण व्यवस्थापन

पावसाळ्यात करण्यात येणारे मुख्य नियोजन म्हणजे हुमणी अळी अवस्था , जीवन प्रणाली माहिती आणि नुकसान आणि नियंत्रण  व्यवस्थापन 

हुमणी अळी अवस्था आणि ओळख :- 
प्रथम अळी अवस्था पांढरीशुभ्र, पिवळे डोके, सुमारे 8 मी.मी. लांबी. छातीवर पायांच्या तीन जोड्या.पूर्ण विकसित अळ्या पिवळट-सफेद, डोक्‍याचा रंग बदामी व इंग्रजीच्या "सी' अक्षराप्रमाणे अर्धगोलाकार.
पूर्ण विकसित अळीची लांबी सुमारे 40 ते 45 मि.मी.
प्रौढ भुंगेरा तपकिरी किंवा बदामी रंग. 18 ते 20 मि.मी. लांब व 8 मि.मी.पर्यंत जाड. पंखाची प्रथम जोडी ढाली प्रमाणे मजबूत. पंखाची दुसरी जोडी पातळ व घडी करण्यासाठी लवचिक असून, पहिल्या जोडीखाली सुरक्षित व पंख उघडताना मदत करते.
इको पेस्ट ट्रॅप (लाईट ट्रॅप) विक्री सुरू आहे.तसेच घरपोच सुद्धा पार्सल पाठविले जात आहे.आजच संपर्क करा.9529600161.
शेतकरी मित्र सर्व पिकात वापर करू शकते.हा प्रकाश सापळा दीर्घ महिने चालतो.
Special' Offers💥  जिवाणू मेटारिजियम अनिसोप्लि .हुमणी वाळवी कोष नियंत्रण करण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे मेटारिजियम अनिसोप्लि .
            होलसेल दरात विक्री सुरू आहे.कृषी केंद्र तसेच शेतकरी मित्रांना लागल्यास नक्की संपर्क करा.9529600161.बुकिंग सुरू झालेली आहे.विक्री सुद्धा सुरु झालेली आहे.
💥 Special 'Offers Metarhizium Anisopliae is on sale at wholesale prices.💥Booking has started.Home Delivery Parcel Service Available Now.जैविक शेती मित्र निखिल तेटू . 9529600161
हुमणी किडीची जीवन प्रणाली :- 
1) पहिल्या पावसानंतरच प्रौढ भुंगेरे सायंकाळी जमिनीतून बाहेर येतात.
2) कडूलिंब, बाभूळ, बोर यासारख्या वृक्षावर मादीसोबत मिलनासाठी जमतात.नियंत्रण हवे याच वेळी याच काळात बांधावरील यजमान झाडांची पाने खातात.रात्रीच्या वेळी पिवळे प्रकाश सापळे लावून त्यांना आकर्षित करावे. संध्याकाळी व रात्री या झाडांच्या फांद्या जोरात हलवून प्रौढ खाली पाडावेत. ते गोळा करून केरोसीन वा कीटकनाशकमिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत. हे काम सामुदायिकरीत्या करणे अधिक फायदेशीर
3) त्यानंतर सूर्योदयापूर्वी पुन्हा जमिनीत परत जातात.
(दिवसा प्रौढ किडे दिसून येत नाहीत).अंडी घालण्याचा कालावधी जून-जुलै महिन्यात असतो. जमिनीत साधारणपणे 8 ते 10 सें.मी. खोलपर्यंत साबुदाण्याच्या आकाराची व लांबट गोल अंडी एक मादी तिच्या जीवनकाळात अंडी देत. त्या 60 ते 70 अंड्यातून 9 ते 10 दिवसांत अळी बाहेर येते.
अंडी आणि अळी अवस्था :- 
 5 ते 7 महिन्यांचीजमिनीत ती 10 ते 15 सें.मी. खोल अर्धगोलाकार पडून राहते.हीच पिकासाठी नुकसानकारक अवस्था ऑक्‍टोबरच्या तिसऱ्या आठवड्यानंतर अळी जमिनीत खोलवर कोषावस्थेत जाते. कोष तांबूस तपकिरी रंगाचा व टणक. कोषावस्था 20 ते 25 दिवस
प्रौढ- कोषातून निघणारे प्रौढ कीटक पहिल्या पावसापर्यंत जमिनीतच सुप्तावस्थेत भुंगेरे सुरवातीस पिवळसर पांढरट व कालांतराने तपकिरी होतात. भुंगेराचे आयुष्य सुमारे 80 ते 90 दिवस.
हुमणीची अशा प्रकारे एका वर्षात एक पिढी पूर्ण होते.
शेतात नुकसान किती करते :- 
प्रथमावस्थेतील अळ्या पिकाची तंतुमुळे खातात. ती उपलब्ध नसल्यास सेंद्रिय पदार्थ खातात. तंतुमुळांचा फडशा पाडल्यानंतर मुख्य मुळे खाण्यास सुरू करतात. परिणामी झाड वाळते. एका झाडाचे मूळ कुरतडून खाल्ल्यानंतर हुमणी दुसऱ्या झाडाकडे वळते. शेतात एका ओळीत झाडे वाळल्याचे दिसून येते.नुकसान सर्वात जास्त प्रामुख्याने आढळणारे महिने- ऑगस्ट-सप्टेंबर होते. एकात्मिक कीड नियंत्रण उन्हाळ्यात मे महिन्यात 
खोल नांगरट, त्यामुळे जमिनीतील किडीच्या सुप्तावस्था (प्रौढ कीटक) नाश पावतात. लागवडीपूर्वी चारीत एरंडी खत (250 किलो प्रति हेक्‍टर) दिल्यास भुईमुगातील नुकसान टाळणे शक्‍य.
हुमणीचे नैसर्गिक शत्रू- हिंग सुद्धा जमिनी मध्ये drinching ने सोडून नियंत्रण करू शकतो. तसेच -- बगळा, चिमणी, घार, कावळे, रानमांजर, रानडुक्कर, मुंगूस हे हुमणीच्या अळ्या आवडीने खातात.जैविक पद्धतीने सुद्धा हुमणी अळी ,अंडी, कोश नियंत्रण करू शकतो. परोपजीवी बुरशी-बिव्हेरिया बॅसियाना, मेटारायझिम ऍनिसोपली) जिवाणू कल्चर, मेटारायझियम सूत्रकृमी यांचा वापर करून हुमणी अळी नियंत्रण मध्ये आणू शकतो.तसेच प्रकाश सापळे लाऊन सुद्धा भुंगेरे चे नियंत्रण केले जाऊ शकते.
चला शेतकरी मित्रहो मग 
प्रकाश सापळे वापर करूया हुमणी चा नायनाट करूया.चला तर प्रत्येक शेतकरी मित्रांनी सहभागी होवुया शेती विभागाच्या  
हुमणीमुक्त गाव अभियानात .
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यूट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.

टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या