Minimal and modern theme for Blogspot. Use it for personal blog or multi-author blog / magazine.
शेतकऱ्यांना शेती पिके घेताना उडत्या हानिकारक कीटकांमुळे मोठे नुकसान (Agriculture Technology) सोसावे लागते. या उडत्या किडींमध्ये प्रामुख्याने नाकतोडा, पतंग पाकोळ्या आणि काही फळ माशांचा समावेश असतो. तर कुठे अळी तयार करणाऱ्या अळीच्या पतंगाचा समावेश असतो. शेतकरी काही भागांमध्ये या किटकांना "पतंग पाकोळ्या" या ग्राम…
अधिक वाचासध्या कुक्कुटपालन हा व्यवसाय सध्या तरी मोठ्या प्रमाणात होत आहेत. व शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी कुक्कुटपालन हा व्यवसाय नियमित करत आहे. व सगळीकडे हा उपक्रम लोकप्रिय झाला आहे, पण जर तुम्ही हे कुक्कुटपालन करत असाल तर तुम्हाला हिवाळ्यात व उन्हाळ्यात कोंबड्यांना होणारे रोग माहीत असणे आवश्यक आहे. वर्षभरामध्ये कोंबड्यांना विव…
अधिक वाचाआपला भारत देश कृषीप्रधान देश असल्याने जवळ जवळ ७५% लोक ग्रामीण भागात राहून शेती या व्यवसाय करतात. तसेच शेती या विषय न समजणारा असल्याने दिवसेंदिवस शेतीच्या गरजा वाढतच आहे. कृषीप्रधान देशात महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत, असल्याची बाब समोर आली आहे. मागील वर्षामध्ये आलेल्या NCRB च्या रिपोर्टनुसार २०२२ मध्ये १२,३४० शेतकरी आत…
अधिक वाचासंयुक्त राष्ट्र संघाने सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (InterNational Millets Years) म्हणून घोषित केले, या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्त्व, त्याचे फायदे तसेच त्याचबरोबर तृणधान्य पिकांचे क्षेत्र, आंतरपीक पद्धतीचा वापर करून भरडधान्यांना आपल्या जेवणातील मुख्य घटक म्हणू…
अधिक वाचाजुनं ते सोनं खरचं आहे आणि आपल्याला सुद्धा जुन्या परंपरा जोपासणे आवश्यक आहेत. हल्ली मिलेट्स हा शब्द सातत्याने खूप २०२३ वर्षात ऐकू येतोय आणि खूप काही शेतकरी मित्रांनी मिलेट्स हा शब्द कायमचा कानमंत्र दिल्या सारखा वाटत आहे. आपल्या खाद्य संस्कृती मधून हद्दपार झालेले आपलेच जुने देशी परंपरागत धान्य ज्यांना "श्री धान्य&quo…
अधिक वाचामका पिकावरील लष्करी अळीचे सेंद्रिय पद्धतीने करायचे व्यवस्थापन शेतकरी मका पीक लागवड केल्यानंतर अळी नियंत्रण करण्यासाठी बरेच फवारणी करतात. पण मका पिकावरील लष्करी अळी नियंत्रण होत नाहीत. कारण, लष्करी अळीचा एकदा प्रादुर्भाव झाला की नियंत्रण करणे फार अवघड होऊन बसतं आणि नुकसानीची पातळी ओलांडली की मका पिक पूर्णपणे नष्ट…
अधिक वाचाफळमाशी नियंत्रण वेलवर्गीय आणि फळवर्गिय पिकातील. तसेच फळमाशी नुकसान फळमाशी आकाराने ७ मिमी लांब असून,घरमाशीएवढी असते. फळमाशीचे पंख पसरलेले असतात आणि तिला पंखांची एकच पारदर्शक जोडी असते. जीवनक्रम :- चार अवस्था - अंडी, अळी, कोष आणि माशी. अंडी :- फळमाशीची मादी टोकदार अंडनलिकेच्य…
अधिक वाचामी निखिल मधुकर तेटू माझ्या वयाच्या १३ वर्षा पासून मी माझ्या, घरच्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहे. तसेच मी शेती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याने करत आहे. माझी शेती ५ एकर असून सर्व शेती जैविक पद्धतीने सुरू आहे. तसेच जैविक निविष्ठा मी स्वतः वापर करून विषमुक्त अन्न तयार करतो. माझ्या शेतात मी जैविक शेती जेव्हा पासून सुरू केली तेव्हा पासून मला मधमाशी ,फुलपाखरू, सोनपाखरू, पक्षी दिसतात. खूप मोठ्या प्रमाणात दिसत असल्याने यांच्याशी मला खूप प्रेम आहे. त्यांना जेवण सुद्धा विषमुक्त मिळत असल्याने माझे प्रिय मित्र कीटक माझ्या शेतातच राहतात. मी माझ्या शेतात सर्वात जास्त वापर शेणखताचा करतो. नाडेप कंपोस्ट खत प्रक्रिया चा वापर करतो. मी प्रक्रिया केलेले शेणखत, गांडूळ खत व गांडूळ पाणी यांचा वापर करतो.कंपोस्ट खत, सोनखत, एरंडी पेंड,निम पेंड,करडई पेंड,मासोळी खत,हाडांचा चुरा,रॉक फॉस्फेट (राख) यांचा सेंद्रिय कर्ब म्हणून वापर करतो.बोरू धेंचा ताग शेतात पेरणी करून फुल अवस्था मध्ये कापणी केली जाते व ते जमिनी मध्ये सेंद्रिय कर्ब वाढवितो व ते आच्छादन म्हणून सुद्धा वापर करतो. माझ्या शेतात जमिनीला पोषक असे जिवाणू खते मी स्वतः बनविलेले आहे व वापर केलेले आहे जीवामृत, पंचगव्य, जैविक ह्यूमिक ,तांदूळ पेज,बेल रसायन, आवळा रसायन, जिवाणूपाणी कल्चर, फळांचा सडवा,GA, जिवाणू वाढविणे,पळसाची फुले, जैविक पोटॅश, तरल खत, राख, गारबेज enzymes व गूळ फवारणी करतो. शेतात बीजप्रक्रियासाठी मी नेहमी यांचा वापर करतो. :- गावरान गायचे ताजे शेण,गोमूत्र,हिंग,हळद, काळा गूळ, वारूळ माती किंवा सुपीक माती,मासोळी तैल. तसेच मला बीजप्रक्रिया स्पर्धा मध्ये Second Prize सुद्धा मिळाले आहे. जैविक पद्धतीने मी स्वतःबनविलेले कीटकनाशक:- निम अर्क, दशपर्णी अर्क, तरल खत, अंडा संजीवक,बाजरी कीटकनाशक, हिंगनास्त्र,अग्निहोत्र राख,करंज तेल, कीटकनाशक, ब्रह्मास्त्र,महाअस्त्र, CVR . जैविक बुरशीनाशक :- दही तांबे धातू, अग्निहोत्र राख,गोमूत्र ताक गूळ, ताक तांबे धातू , मासोळी तैल.तसेच मदर कल्चर आणून Trico derma virodi बनविणे नंतर multiply करून वापर करणे. जैविक पद्धतीने कीटक नियंत्रण साठी मी प्रयोग केलेले स्वतः :- प्रकाश सापळे लावणे,लाईट ट्रॅप बांधावर लावणे,पक्षी थांबे,पिवळे निळे चिकट सापळे,मिश्रपीक पद्धती, ऑईल लावून साडी फिरविणे , पांढरा कागद प्लास्टिक आणून शेतात फिरविणे. मित्र कीड संगोपनसाठी मी दरवर्षी वापर करतो:- ट्रायकोग्रामा मित्र कीटक संगोपन कार्ड वापर करणे.पक्ष्यांना अन्न सहज उपलब्ध करून देणे.मधमाशी यांना पाणी फुले जवळपास उपलब्ध करून देणे. शेतात बाजारातील रसायने कोणतेही वापर न करणे. मला संधी कृषी कॉलेजवर जैविक शेती विषमुक्त अन्न हे प्रशिक्षण देण्यासाठी मिळाली आहे. जैविक शेती संगोपन विषयी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलेले आहे.तसेच कृषी विज्ञान केंद्र मध्ये सुद्धा प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिलेले आहे.माझ्या शेतकरी मित्रासाठी मी घरी आणि माझ्या शेतात जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र उघडले आहे.माझे स्वतःचे काही ग्रुप असून मी शेतकरी मित्रांना रोज जैविक शेती ,बाजार,विक्री माहिती देतो.हवामान विषयक सुद्धा महिती देतो.तसेच मी माझ्या सर्व शेतकरी मित्रांची विषमुक्त फळे,धान्य,भाजीपाला विक्री करून देतो. शेतकरी मित्रांना जैविक शेती बद्दल संपूर्ण माहिती,व्यवस्थापन , तसेच नियोजन माहिती अगदी मोफत मिळावी या साठी मी ग्रुप तयार केलेले आहे.तसेच उत्पन्न वाढ आणि विक्री व्यवस्थापन साठी शेतकरी मित्रांना मी नेहमी मदत करतो.कारण अन्नदाता सुखी भव:हेच आमचे ध्येय आहे जैविक पद्धतीने तसेच नैसर्गिक पद्धतीने शेती केली तर पर्यावरण पूरक शेती होणार.विषबाधा होणार नाही. शेती मध्ये पर्यावरण स्वच्छ असल्याने शत्रू कीटक जास्त प्रमाणात राहणार नाही आणि विषमुक्त अन्न ,विषमुक्त फळे तयार होत असल्याने आजारांचे प्रमाण कमी राहणार .शेतीवरील खर्च कमी झाल्याने शेतकरी सुखी होणार.आर्थिक बजेट शेती विषयक कमी होतील. जैविक शेती एकदम कमी खर्चात कशी करावी.जैविक शेती मध्ये विषमुक्त अन्न, धान्य, फळे, भाजीपाला कसा तयार करावा.शेतकरी मित्रांना घरीच जैविक पद्धतीने कीड नियंत्रण माहिती देऊ. नैसर्गिक पद्धतीने शेती का करावी.उत्पन्न वाढ करून शेती वरील खर्च कसा कमी करावा. पिकेल ते विकेल हे मार्गदर्शन शेतकरी मित्रांना देऊ.तसेच आंरराष्ट्रीय शेतमाल कसा विक्री करावा. शेतकरी मित्रांना जैविक शेती बद्दल संपूर्ण माहिती,व्यवस्थापन,तसेच नियोजन अगदी मोफत मिळावी व उत्पन्न वाढ आणि विक्री कशी करावी या माहिती ने शेतकरी मित्रांना मदत व्हावी या साठी ही माहिती देत आहे.
Social Plugin