Ad Code

Responsive Advertisement

शेतकरी आत्महत्या मध्ये महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकात

आपला भारत देश कृषीप्रधान देश असल्याने जवळ जवळ ७५% लोक ग्रामीण भागात राहून शेती या व्यवसाय करतात. तसेच शेती या विषय न समजणारा असल्याने दिवसेंदिवस शेतीच्या गरजा वाढतच आहे. कृषीप्रधान देशात महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत, असल्याची बाब समोर आली आहे. मागील वर्षामध्ये आलेल्या NCRB च्या  रिपोर्टनुसार २०२२ मध्ये १२,३४० शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. जे २०२१ मध्ये झालेल्या आत्महत्या पेक्षा २.७५% टक्क्यांनी वाढ आहे. २०२२ मध्ये खूप वाढ झाली असून २०२१ मध्ये ११,२३० शेतकरी व शेतकरी मजूर यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. NCRB रिपोर्ट २०२२ नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो(NCRB) च्या २०२२ मधील कृषीप्रधान देशातील शेतकरी आत्महत्याच्या अहवाल जास्तच आहेत. २०२३  यामध्ये कृषीप्रधान देशातील सर्वात जास्त महाराष्ट्र राज्यात ४५४३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यानंतर दुसरा नंबर कर्नाटक आणि तिसरा नंबर आंध्रप्रदेश राज्याचा लागतो.
पूर्ण जगात भारत हा देश कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो, पण शेतकऱ्यांची अवस्था पहिल्या आणि त्याच्या होत असलेल्या दुर्दशा पाहून या देशाला कृषीप्रधान देश म्हणून घेण्याची लाज वाटत आहे.कारण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेतकरी हा सुखी होते. शेतकरी हा राजा होता. कारण संपूर्ण राज्याचा कारभार हा शेतकरी पाहत होता. त्यामुळे त्याला "राजा" असे म्हटले जात होते. 
पण आज शेतकरी या सर्व समस्यांचा सामना करताना दिसत आहे. त्यातील समस्या  वीजवापर, रासायनिक खते वापर, फवारणी खर्च, मजुरी खर्च, वाढलेला GST, यंत्र मशागत खर्च, वाढलेला खर्च, उत्पन्न घट, बंजर होत असलेल्या जमिनी, निसर्गाचा लहरीपणा, बँकेचे कर्ज, बोगस बियाणे आणि खते, बोगस औषधी, हे सर्व दिसत आहे.

शेतकरी आत्महत्येचे कारणे :- 
 ▪️शेतकऱ्यावरील असलेले कर्ज - शेतकरी आत्महत्यांचे पाहिले कारण म्हणजे शेतकऱ्यांवर वाढलेला कर्जाचा बोजा हे आहेत. त्यामुळे बँक कर्मचारी नेहमी घरी येऊन धमकी देऊन जात असतात. हेच कर्ज वाढण्याचे कारण आहे, शेतामध्ये रात्रंदिवस कष्ट करूनही त्याला रोजच्या गरजा भागतील एवढेही उत्पन्न निघत नाही आणि उत्पन्नाला हमीभाव सुद्धा मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवरील कर्ज हे वाढत जाते आणि एक वेळ अशी येते की त्याला ते कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी  जीवन संपवण्यास भाग पाडते. ह्याच कारणामुळे सर्वाधिक आत्महत्या होत आहेत.

▪️ शेतमालाच्या घटत्या व स्थिर आधारभूत किंमती - सध्या आपण पाहतच आहोत सोयाबीनचा भाव ४७०० प्रती क्विंटलच्या पुढे जायचं नाव घेत नाही आणि कांद्याचा भाव कसातरी वाढला होता, सरकारने त्यावरही निर्यात बंदी लावली आणि त्याचेही भाव पाडले. आता मार्केटात हे व्यापारी कमी भावात शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करतात आणि निव्वळ खुर्ची वर बसून नफा खातात. तर अशा प्रकारच्या किंमतीमधील अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांच्या कुठल्याच पिकाला योग्य भाव मिळत नाही. याचा परिणाम पिकांचा उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन कमी असे गणित हे फक्त शेतकऱ्यांच्या बाबतीतच घडते. आणि देशात इतर सर्व वस्तूच्या किंमती हे त्यांचे उत्पादक व मालक ठरवतात. पण शेतकऱ्यांच्या बाबतीत असे कधीच घडत नाही आणि शेतकऱ्यांचा माल कवडीमोल भावाने विकला जातो. अशा अस्थिर किंमतीमुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय कोणताच सापडत नाहीत. कारण कलियुगातील केंद्र आणि राज्य सरकार तर त्यांच्या पार्टी फोडण्यात आणि पार्टी जोडण्यात व्यस्त आहे त्यांना शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही. जाती धर्मात दंगे फसाद करण्यात दंग आहे.

 ▪️नोकरशाहीची दिरंगाई - शेतकऱ्यांचे शिक्षण ग्रामीण भागात जास्त न झाल्याने नोकरदार धमकी देतो. शेतकऱ्यांना नवीन घडामोडीचा अंदाज नसतो. त्यामुळे सरकारने काढलेल्या नवीन योजना त्याच्यापर्यंत कधीच पोहोचतच नाही. कारण या योजना शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाण्याचे काम सरकारी नोकरदारांचे असते. पण त्यांच्या अनु उत्सुकता आणि काम कंटाळ्यामुळे या योजनेचा शेतकरी प्रत्यक्षात लाभच घेऊ शकत नाही. त्यामुळे विविध योजनेसाठी शेतकऱ्यांना जास्त पैसे खर्च करावे लागतात. प्रत्येक अधिकारी वर्गाला शेतकऱ्यांना पैसे प्रत्येक अटी नुसार पुरवावे लागतात.

▪️शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या वाढत्या किमती - शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या किमती वाढल्या नाहीत, पण शेतीसाठीचे अवजारे असतील त्यांच्या किंमतीत वाढ होऊन अतिरिक्त GST लावलेला आहे. तसेच शेतमजूर असतील यांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादकता खर्च वाढला आहे. उत्पन्नात कुठलीही भर न पडल्यामुळे शेती व्यवसायात त्याला मोठ्या नुकसानी भरपाई करावी लागते. फवारणी औषधांवरील वाढलेला खर्च, रासायनिक खतांवरील अतिरिक्त होत असलेला खर्च, त्यावरील लादलेली मोठ्या प्रमाणात GST आणि यंत्र वापर करिता वाढलेले जास्त किंमतीचे पेट्रोल यामुळे अतिरिक्त खर्च जास्त येतो. 

▪️ निसर्गाचा लहरीपणा - सरकाराच्या लहरीपणा तर वाढतांनाच दिसत आहे. पण त्यासोबतच सर्व सजीव सृष्टीने निसर्गाचे समतोल न राखल्याने आज निसर्गही शेतकऱ्यांना साथ देत नाही आहेत. पावसाळ्यामध्ये पाऊस पडत नाही आणि उन्हाळ्यामध्ये पाऊस पडत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीट या सारख्या नैसर्गिक समस्या वाढल्या आहे. तापमान बदलामुळे होत असलेल्या पिकांवर परिणाम दिसत आहे. कारखानदारी आणि इतर गोष्टीमुळे वाढलेल्या प्रदूषणामुळे वाढलेल्या तापमानामुळे शेतीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.

▪️अपुरा वीज पुरवठा - सर्व उद्योगाला २४ तास नियमित वीज पुरवठा केला जातो,पण शेतीला ८ तास च वीजपुरवठा मिळतो पण त्यातील मोजून ५ तास वीज शेतकऱ्यांना व्यवस्थित दिली जातात. त्यामुळे शेतकरी आपल्या पिकाला वेळेवर पाणी देऊ शकत नाही. परिणामी त्याचे उत्पादन घटते. 

 ▪️बी बियाणे, खते, औषधी या कंपन्याकडून शेतकऱ्यांची होणारी सर्वात जास्त फसवणूक - शेतकऱ्यांची बी बियाणे कंपन्याकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. त्यांना निकृष्ट दर्जाचे बियाणे, फवारणी औषध, बोगस खते पुरवले जातात. ज्यामुळे पीक योग्य येत नाही किंवा पिकांची उगवणच होत नाही, त्यामुळे त्यांचा खर्च वाढतो आणि परत त्यांना बियाणे आणून दुबार पेरणी करावी लागते. काही औषधी मुळे पीक पूर्ण जळून जातात. या वर कंपनीचे प्रतिनिधी काहीच बोलत नाहीत. खते विरघळत नसल्याने जमिनीत ते खत दीर्घकाळ पडून राहत असल्याने जमीन कडक होत आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होताना दिसत आहे.

 ▪️बँकाची शेती कर्ज पुरवठा करण्यात दिरंगाई - शेतकऱ्यांला कर्ज द्यायचं म्हणलं की बँकांच्या जीवावर येते. बँका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कागदपत्र गोळा करायला लावतात. आणि हे सर्व प्रकिया नंतर सुद्धा बँका काहीतरी कारण काढून शेतकऱ्यांना कर्ज देत नाही. त्यामुळे शेतकरी कुठल्यातरी खाजगी कर्जदारांकडून कर्ज घेतो व त्याचे व्याजदर १६-१८% असतात. हे व्याजदर जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर तयार होतो. यासोबतच शासनाच्या अयोग्य धोरण, अपुऱ्या सिंचनसुविधा, ह्या महत्त्वाच्या कारणामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहे.
या सर्व गोष्टीचा कृषीप्रधान देशातील केंद्र आणि राज्य सरकारने बारकाईने अभ्यास करून अंमलबजावणी करावी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज शेती विषयक धोरणाची अंमलबजावणी मोहीम यशस्वी करावीत. ज्यामुळे  शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होणार नाही. शेतकरी हा सुखी होतील. निसर्गाचा समतोल राखून शेती करायला शेतकरी तयार होतील. मातीचे आरोग्य सुधारून माती वाचविली जाणार.
शेतकरी आत्महत्या ही केवळ शेतकऱ्यांची समस्या नसून हे कृषीप्रधान देशाची समस्या आहे, कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. आणि शेतकरी हाच राजा आहेत. भारतात विशेषता महाराष्ट्रात या समस्येने उग्ररूप धारण केले आहे. २०२० पासून शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजना प्रभावी ठरल्या नाहीत, हे यावरून सिद्ध होते. त्यामुळे शेतकरी आत्महत्या सर्वात जास्त विदर्भातील अमरावती जिल्ह्यात झाल्या आहे. या कडे अजून सुद्धा सरकारचे लक्ष नाहीत. भारत देशाला जर आर्थिक महासत्ता व्हायचे असेल तर अन्नदाता जगविणे हाच एक खरा धर्म आहे. अन्नाचा तुटवडा निर्माण होत नाहीत याचे उत्तर एकच अन्नदाता शेतकरी आहे. कारण जेव्हा शेतकरी स्वतः एकजूट होऊन निर्णय घेणार की स्वतः पुरते अन्न पिकवायचे आणि मार्केट मध्ये नेणे बंद करायचे. तेव्हा जनतेला खायला अन्न मिळत नसल्याने जनता सुद्धा आत्महत्या करणार हे मात्र नक्की आणि तेव्हा "अन्नदाता शेतकरी" हा नक्की आठवतील. आणि शेतकऱ्यांनी जर एकजूट होणे सुरू केले तर शेतकरी सुखी व्ह्यायला वेळ लागणार नाहीत. 
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.

टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.
धरतीशास्त्र जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती. शेतकरी मित्र निखिल तेटू +919529600161 / +917721881560

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या