Ad Code

Responsive Advertisement

आपण विसरत चाललोय जुनं ते सोनं

 जुनं ते सोनं खरचं आहे आणि आपल्याला सुद्धा जुन्या परंपरा जोपासणे आवश्यक आहेत.
हल्ली मिलेट्स हा शब्द सातत्याने खूप २०२३ वर्षात ऐकू येतोय आणि खूप काही शेतकरी मित्रांनी मिलेट्स हा शब्द कायमचा कानमंत्र दिल्या सारखा वाटत आहे. आपल्या खाद्य संस्कृती मधून हद्दपार झालेले आपलेच जुने देशी परंपरागत धान्य ज्यांना "श्री धान्य" अथवा 'भरड धान्य' किंवा "श्री अन्न" असं सुद्धा आपण म्हणतो. आज त्याचा मोठ्या प्रमाणात बोलबाला सुरू आहे. जागतिक पातळीवरील भारताची जागतिक संघटनेवर २०२३ वर्ष हे भरड धान्य म्हणून साजरे करा अशी शिफारस आहेत. 
उदाहरण आपण एक पाहूया - 
गहू आणि तांदूळ(paddy rice) यामध्ये ग्लुटेन नावाचे एक प्रोटिन असते, जे पचायला जड असते, ज्यामुळे डायबिटीस व लठ्ठपणा वा इतर आजार बळावले जातात. त्यामुळे जुनं ते सोनं या कडे आपल्याला यावं लागेलच आता. 

तसेच अती महत्त्वाचे म्हणजे MahaMillets Quiz Competition मध्ये सहभाग घ्या. Quiz competition खेळा आणि प्रमाणपत्र आणि बक्षीस मिळवा. पौष्टिक तृणधान्ये (Millet) कार्बोहायड्रेट, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा समृद्ध स्त्रोत असुन निरोगी आणि संतुलित आहाराचा आवश्यक भाग आहेत. Millet हृदयरोग, मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका कमी करण्यासाठी ओळखली जातात. Millet विषयी सविस्तर माहिती MahaMilletsQuiz मध्ये नोंदणी करा. खाली दिलेली लिंक ओपन करून Google play Store वर जाऊन download करा. 
 https://cms.tifanindia.org/share/app/HGUO5810 - हा reference कोड टाकायला विसरू नका. 
सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहेत.

आता मिलेटस् /भरडधान्येच का खायची - कारण त्यामध्ये ग्लुटेन नसते, हे गहू तांदूळ मध्ये असणारे ग्लुटेन निरनिराळ्या आजारांना व रोगांना आमंत्रण देतात. भरडधान्यात असणारे मुबलक फायबर्स पोट साफ करण्यासाठी मदत करतात, जेणेकरून पोटाचे विकार दूर होतात, कारण बहुतेक आजारांचे मूळ कारण पोट साफ न होणे हेच असते. परिणामी डायबिटीस, लठ्ठपणा,रक्तदाब, कैंसर, सांधेदुखी, वा इतर विविध शारीरिक विकार. हे आजार विकार दूर करण्यासाठी मिलेटस् फारच हमखास गुणकारी आहेत.
वेगवेगळी भरडधान्ये अन् त्यांचे आरोग्यदायी  fayd खालील प्रमाणे  -
१) ज्वारी/ Sorghum Millet - 
पोषणमूल्ये ✳️
🔹 तंतुमय पदार्थाने संतृप्त
🔹 थायमिन, रायबोफ्लेवीन, फोलिक असिड,
      कॅल्शियम युक्त
🔹लोह, झिंक, सोडियम, फॉस्फरस यांनी समृद्ध
आहारातील महत्व ✳️
▪️ हृदय विकारावर उपयुक्त
▪️स्थलता व संधिवात यावर परिणामकारक
▪️गर्भवती महिलांसाठी आवश्यक खनिजे व     
     जीवनसत्व यांची उपलब्धता
▪️मधुमेहासाठी गुणकारी
♻️ प्रकृतीने थंड, उन्हाळ्यात ज्वारीची भाकरी खावी, Glutein free, भाकरी लाह्या पोहे बनवून खाऊ शकतो. 

२) बाजरी/ Pearl Millet -
पोषणमूल्ये ✳️
🔹कॅल्शियम, व्हिटामिन A, B व फॉस्फरस
      अधिक  मात्रेत उपलब्ध
🔹लोह, फोलेट व मँगेनीज यांची उपलब्धता
🔹 असंतृप्त मेद आम्ल यांनी भरपूर
आहारातील महत्व ✳️
▪️रक्तातील मेदाचे प्रमाण नियंत्रित करते
▪️रक्तदाब करिता उपयुक्त
▪️हिमोग्लोबिन वाढण्यासाठी व ॲनेमीया
      आजारावर मात करण्यासाठी उपयुक्त
♻️ उष्ण प्रकृतीचे, बाजरीची भाकरी हिवाळ्यात खावी. कैल्शियम आयर्न मुबलक, गरोदर माता, स्तनदा माता यांनी जरूर बाजरी खावी, फायबर्स खूपच असल्याने पोट साफ होण्यास मदत होते. 
३) नाचणी/ रागी / Finger Millets - 
पोषणमुल्ये ✳️
🔹लोह, झिंक, सोडियम, फॉस्फरस व बिटा
      कॅरोटीन यांनी समृद्ध 
🔹 प्रथिने, व्हिटामिन A तंतुमय पदार्थांनी युक्त
🔹अमिनो असिड मुबलक प्रमाणात
🔹 कॅल्शियमची उपलब्धता अधिक प्रमाणात आहारातील महत्त्व ✳️
▪️तंतुमय पदार्थामुळे आतड्याच्या कर्करोगावर
      उपयोगी
▪️कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित करते
▪️बद्धकोष्ठतासाठी फायदेशीर
▪️ प्रथिनांमुळे कुपोषणावर उपयुक्त
▪️मधुमेह रुग्णांकरिता लाभदायक
♻️नाचणीला Nutrients Powerhouse असे म्हणतात. नाचणीचे दूधही/Ragi milk तयार करता येते, आणि ते खूप पौष्टिक असते.

४) राळा वा कांगराळे/ Foxtail millet - 
पोषणमुल्ये ✳️
🔹तंतुमय पदार्थांची मात्रा अधिक
🔹कॅल्शियम, खनिज व तांबे मुलद्रव्याने भरपूर 
🔹प्रथिनांचा उत्तम स्रोत
आहारातील महत्त्व ✳️
▪️रक्तातील साखर व मेद नियंत्रित करते
▪️रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
▪️पचन संस्थेच्या विकारावर परिणामकारक
▪️नॉन अलर्जीक व पचनास हलके
♻️राळ्याचा भात खिचडी पोहे असे पदार्थ बनतात. मेंदू आजार विकार, गरोदर मातांच्यासाठी खूप चांगले, अस्थिरोग/हाडांचे रोग व विकार, स्पाईन/मज्जारज्जू संदर्भातील आजार विकार यात फायदेशीर आहे.

५) वरई वा वरीचे तांदूळ वा भगर / Barnyard Millet -
पोषणमुल्ये ✳️
🔹कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक, लोह, मँगेनीज
     या खनिजांनी समृद्ध
🔹 ग्लुटेन मुक्त
🔹जीवनसत्त्वांचा उत्तम स्रोत (फोलिक असिड व
       बी कॉम्प्लेक्स)
आहारातील महत्त्व ✳️
▪️ हृदय विकाराकरिता उपयुक्त
▪️रक्तातील मेदाचे प्रमाण नियंत्रित करते
▪️ स्तनांचे कर्क रोगावर गुणकारी
▪️ ग्लुटेन मुक्त असल्याने सेलिक आजारावर    
     गुणकारी
♻️उपवासासाठी, अल्प उष्मांक अन्न / low calorie food, कैल्शियम आयर्न खूप जास्त प्रमाणात, फायबर्स खूप जास्त म्हणजे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर, लिव्हर, किडनी, पित्ताशय/gall bladder आजारात फायदेशीर, endocrine glands functioning मध्ये महत्त्वाचा रोल व शुद्धिकरणासाठी आहे.
६) कुटकी /Little millets - 
♻️डायबिटीस, थायरौईड, नपुंसकता ह्या विकारात फायदेशीर, कुटकीचा भात पोहे पापड बनतात. 

७) हिरवी कांगणी/ Browntop millets/ Green millets - 
♻️हिरव्या कांगणीत सर्वाधिक 12.5 % फायबर्स असतात, मुळव्याध पाईल्स अल्सर मध्ये जादुई परिणाम, मज्जारज्जूचे विकार आजार, ह्या ब्राऊन टोप मिलेटची लापशी फारच छान बनते. spine disorders & diseases मध्ये फायदेशीर आहे.

८) कोदरा /Kodo millets/Himalayan millet- 
♻️पंजाब मध्ये पूर्वी खूप खात होते, शीख धर्मगुरू गुरूनानकजी कोद्र्याचा भात, भाकरी व साग खात होते, आता बोटावर मोजण्याइतकी शेती केली जातेय कोद्र्याची पंजाब मध्ये, रक्त शुद्धिकरण, हाडीताप(fever), Bone marrow disorders मध्ये फायदेशीर (अस्थिमज्जा आजार विकार), मंदाग्नी प्रदिप्त करतो म्हणजे पोटात पाचकरस digestive enzymes वाढवतो भूक वाढवतो. 

९) राजगीरा/ Sudo millets/ Amaranthus - ♻️राजगीरा चे लाडू, वडी , राजगीरा दूधात टाकून खाल्ला जातो, लहान मुलांना फार पौष्टिक 

 मिलेटस् खाद्य संस्कृतीकडे पुन्हा वळून, तसेच मिलेटस् हे ग्लुटेन फ्री अन्न असल्यामुळे स्वादुपिंडाला बळ मिळते, स्वादुपिंडाचे शुद्धीकरण होते, ग्लुटेन फ्री अन्न म्हणजे लिव्हर किडनीचा विमाच असेच समजा. 
पोट सफा तर हर रोग दफा!
सर्वात महत्वाची बाब म्हणजे फायबर युक्त अन्नाची आज सर्वांना गरज भासत आहे.!
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.

फेसबुक पेज ला फॉलो करा.


टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.

धरतीशास्त्र जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती. शेतकरी मित्र निखिल तेटू +919529600161 / +917721881560



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या