Ad Code

Responsive Advertisement

मका पिकावरील लष्करी अळीचे व्यवस्थापन

मका पिकावरील लष्करी अळीचे सेंद्रिय पद्धतीने करायचे व्यवस्थापन

         शेतकरी मका पीक लागवड केल्यानंतर अळी नियंत्रण करण्यासाठी बरेच फवारणी करतात. पण मका पिकावरील लष्करी अळी नियंत्रण होत नाहीत. कारण, लष्करी अळीचा एकदा प्रादुर्भाव झाला की नियंत्रण करणे फार अवघड होऊन बसतं आणि नुकसानीची पातळी ओलांडली की मका पिक पूर्णपणे नष्ट होते. त्यामुळे उत्पन्न तर होत नाही व कडबा सुद्धा जनावरांसाठी साठी तयार होत नाहीत. पण शेतकरी रसायनांचा भरमसाठ वापर करतात व या अळीवर नियंत्रण मिळवण्याचे टार्गेट पूर्ण करतात. पण अळी नियंत्रण होतच नाहीत. पण हे मका पीक जनावरांच मुख्य अन्न असल्याने मका पिकांची फार मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. त्यामुळे रसायनांचा वापर शक्यतो टाळावा लागतो. म्हणून सेंद्रिय पद्धतीने काय उपाययोजना करता येतील हे सांगण्याचे काम मी सेंद्रिय शेती अभ्यासक निखिल तेटू सांगत आहेत.
          लष्करी अळीच्या अशा प्रजनन पद्धतीमुळे सेंद्रिय असूद्यात किंवा मग रासायनिक पद्धतीच्या व्यवस्थापनामध्ये किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपाययोजना करायला गेलो आणि एक दोन दिवस जरी फवारणी लेट झाली तरी कीड नियंत्रणा बाहेर जाते. त्यामुळे आपण अगोदरच सतर्क राहायचं आहे. पेरणी केल्यानंतर साधारणपणे मका पिक ८-१० दिवसांत पूर्णपणे उगवून येते. त्यानंतर पुढच्या ५-६ दिवसांत आपण घरी बनवलेल्या १५ टक्के निंबोळी अर्काची ५० मिली प्रती १५ लिटर पाणी घेऊन याप्रमाणात फवारणी करायची आहे. त्यानंतर पुढची प्रत्येक फवारणी दर १०-१२ दिवसांनी घ्यायची आहे. दुसरी फवारणी म्हणजेच पेरणी नंतर २० दिवसांनी ताक-अंडी-गूळ-हिंग- काळी मिरी द्रावणाची घ्यायची आहे. तर ताक अंडी द्रावणाची फवारणी घेण्यासाठी १५० मिली प्रती १५ लिटर पाणी याप्रमाणात घ्यायची आहे. ताक अंडी लष्करी अळी नियंत्रणाच काम तर करतच सोबतच संजीवक टॉनिक, बुरशीनाशक आणि किडीनाशक म्हणून देखील काम करत त्यामुळे चांगला फायदा मिळतो.
        अमेरिकन लष्करी अळी प्रवास क्षमता खूप असते. १५ दिवसांत २००० किमी प्रवास करते. यामुळे दुर्गम, दूरच्या भागातील मका पिक शोधून तेथे सुद्धा अंडी घातली जात असल्याने तेथेही प्रादुर्भाव आढळून येतो. लष्करी अळीची मादी पतंग एकावेळी २००-३०० अशा पद्धतीने ७ ते ८ वेळा २०००-२२५० अंडी देते. यामुळे किडीच्या संख्येत अगदी कमी वेळात प्रचंड मोठी वाढ होऊन प्रादुर्भाव लवकर पसरतो. लष्करी अळी मका पिका सोबतच इतर पिकं जसं की ज्वारी, गह, ऊस, हरभरा, भाजीपाला आणि अजून ७०-८० पिकांवर आपली उपजीविका करते. यामुळेच ही कीड जास्त वेळ सूक्ष्म अवस्थेत न जाता हिचा जीवनक्रम कायम चालूच राहतो आणि एका वर्षात ७ ते ८ पिढ्या होत असल्याने यांची संख्या जास्त पटीने वाढत जाते. आता ३० दिवसांनी तिसरी फवारणी आपल्याला घरी बनवलेल्या दशपर्णी अर्काची घ्यायची आहे. त्यासाठी ८०-९० मिली दशपर्णी अर्क प्रती १५ लिटर पाणी याप्रमाणात घेऊन फवारणी करायची आहे. त्यानंतर नक्की हा शेतकऱ्यांनी पर्याय करावा.
 कामगंध सापळे लावणे हा एक सर्वात चांगला उपाय आणि एकात्मिक पद्धतीने किडी नियंत्रण करण्याचा एकमेव पर्याय आहे. लष्करी अळीचे नर पतंग नष्ट करण्यासाठी पिक उगवून आले नंतर २० दिवसांनी लगेच प्रती एकरी १५ कामगंध सापळे लाऊन टाकायचे आहेत आणि दर ४५ दिवसांनी त्यातला ल्युर बदलायचा आहे. Spodopetra litura ही ल्यूर वापरायचा आहे. त्यात अजून अत्यंत फायदेशीर उपाय म्हणजे शेतात पक्षी थांबे लावणे, मका पिक उगवून आल्या नंतर १० दिवसांनी लगेचच एकरी १५-२० पक्षी थांबे लावून टाकायचे आहेत. जेणेकरून शेतातील पक्षी, पक्षी थांब्यावर बसून अळ्या वेचून खातात. कामगंध सापळे आणि पक्षी भांबे आपण एकाच काठीवर देखील लावू शकतो. सोबत पिवळे निळे चिकट देखील आपण वापर करू शकतो. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे कि, पिकाची जसजशी उंची वाढत जाईल, तसतशी पक्षी थांब्याची आणि कामगंध सापळ्याची उंची देखील वाढवायची आहे. नंतर चौथी फवारणी हि ४० दिवसांनी घ्यायची आहे.
 यासाठी आपल्याला मेटारायझम अनिसोप्ली या जैविक जिवाणूंची घ्यायची आहे. फवारणी घेत असताना ७ ग्राम प्रती लिटर पाणी या प्रमाणात डोस घ्यायचा आहे. सुरुवातीला जर या फवारण्या वेळेवर केल्या तर किडी येतच नाही. आणि लष्करी अळी किंवा मका पिकावर येणाऱ्या अन्य इतर किडी या सुरुवातीच्या अवस्थेमध्येच लवकर नियंत्रण होतात. सुरुवातीला जर आपण शेतकऱ्यांनी व्यवस्थापन नीट केले तर अगदी मका पिकात उत्पादन देखील चांगले होतात. आणि जनावरांना सुद्धा कडबा विषमुक्त खायला मिळते. आणि किडींचा प्रादुर्भाव पिकांच्या पुढच्या अवस्थेमध्ये दिसत असल्यास वर दिलेल्या नियोजन नुसार पुन्हा क्रमवारीत फवारण्या घायच्या आहेत. या सर्व फवारण्या घेत असताना फवारणी शक्य झाल्यास अमावास्येचा आणि पौर्णिमेचा दिवस पकडूनच घ्यावी. या फवारण्या घेत असताना प्रती १५ लिटरच्या पंपासाठी अर्धा लिटर पाणी घेऊन त्यात १०० ग्राम गूळ टाकून ते गुळाचे पाणी या प्रत्येक फवारणीच्या द्रावणात टाकून फवारणी करायची आहे. कारण हे एक सेंद्रिय स्टीकर म्हणून काम करत. त्यानंतर फवारणी घेत असताना फवारणी पिकांच्या फक्त बाहेरून न घेता द्रावण पोग्यामध्ये जाईल अशा पध्दतीने फवारणी घ्यायची आहे. त्यासाठी सिंगल होल नोझल वापर करून फवारणी करता येते. फवारणी शक्यतो सकाळी ९ च्या अगोदर करायची किंवा संध्याकाळी ५-६ वाजता करावी. कारण संध्याकाळ नंतर किडीबाहेर येऊन पिकाला खाण्याचं काम करत असते. त्यामुळे या योग्य वेळी फवारणी केली तर चांगला परिणाम मिळतो. 
दरवर्षी पिकांची फेरपालट करावी आणि आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. जमिनीची जेवढी मशागत चांगली होणार तेव्हढी किडी, रोग, बुरशी कमी होतील. आणि पिकांचे उत्पादन वाढतील आणि पीक सेंद्रिय पद्धतीने तयार झाल्याने जनावरांना कडबा विषमुक्त खायला मिळतील त्यामुळे दुधाळ जनावरांच्या दुधात वाढ होतील आणि दुधातील पौष्टिक फॅटचे प्रमाण वाढतील. आणि शेतीवरील रासायनिक खर्च कमी होतील. आणि सेंद्रिय शेती पद्धती व्यवस्थापन केल्याने शेतीवरील खर्च कमी होऊन सेंद्रिय कर्ब वाढ नक्की होतील.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.

फेसबुक पेज ला फॉलो करा.


टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.

धरतीशास्त्र जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती. शेतकरी मित्र निखिल तेटू +919529600161 / +917721881560


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या