Ad Code

Responsive Advertisement

फळमाशी नियंत्रण वेलवर्गीय आणि फळवर्गिय पिकातील.तसेच फळमाशी नुकसान,तसेच नियंत्रण पद्धती.


    फळमाशी नियंत्रण वेलवर्गीय आणि फळवर्गिय पिकातील. तसेच फळमाशी नुकसान,तसेच नियंत्रण  पद्धती.

            फळमाशी आकाराने ७ मिमी लांब असून,घरमाशीएवढी असते. फळमाशीचे पंख पसरलेले असतात आणि तिला पंखांची एकच पारदर्शक जोडी असते.

    जीवनक्रम :-‌ चार अवस्था - अंडी, अळी, कोष आणि माशी.
अंडी :- फळमाशीची मादी टोकदार अंडनलिकेच्या साह्याने फळांच्या सालीवर छिद्रे पाडून त्याखाली अंडी घालते. एका छिद्रात १ ते १५ अंडी असू शकतात. एक मादी एका महिन्याच्या कालावधीत सुमारे १५० ते २०० अंडी घालते. अंडी १ मिमी लांबीची आणि पांढऱ्या रंगाची असतात. ही अंडी हवामानापरत्वे एक आठवड्यात उबतात.अळी अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या पिवळसर रंगाच्या व मागील बाजूस निमुळत्या असतात. त्यांना पाय नसतात. अळ्यांची वाढ एक ते तीन आठवड्यांत पूर्ण होते. अळीचा कालावधी उन्हाळ्यात व पावसाळ्यात ६ दिवस असतो. परंतु, तापमान कमी असल्यास तो २९ दिवसांपर्यंत वाढू शकतो. पूर्ण वाढलेल्या अळ्या फळाला छिद्रे पाडून बाहेर पडतात. जमिनीवर खाली पडून जमिनीत ८ ते १६ सेंमी खोलीवर कोषावस्थेत जातात.         कोष रेशमी कवचाचे आणि दोन्ही बाजूस निमुळते असतात. त्यांचा रंग पिवळसर तांबूस असतो. कोषावस्थेचा कालावधी उन्हाळ्यात ६ दिवस, तर तापमान कमी होत गेल्यास ४४ दिवसांपर्यंत वाढतो. जमिनीत कोषावस्था पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे एका आठवड्यानंतर त्यातून माश्या बाहेर पडतात आणि पुढे अंडी घालण्यास सुरू करतात. अशा प्रकारे जीवनक्रमाचा कालावधी छोटा असल्यामुळे हवामानानुसार आणि फळांच्या उपलब्धतेनुसार फळमाशीच्या वर्षभरात अनेक पिढ्या तयार होतात. 

    नुकसानीचा प्रकार : या अळ्या फळातील गर खातात. कीडग्रस्त फळे सडून पडतात. मादीने अंडी घालण्यासाठी फळांच्या सालीवर पाडलेल्या छिद्रातून फळांत सूक्ष्म रोगकारक घटकांचा शिरकाव होतो, त्यामुळे संपूर्ण फळ सडून जाते. बऱ्याच वेळा फळमाशीने प्रादुर्भाव झालेली फळे बाहेरून चांगली दिसतात. पण, आतून सडलेली असतात. फळे परिपक्व होण्याच्या काळात फळमाशीचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे स्थानिक अथवा निर्यातीसाठी विक्री करण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. जपान, युरोपियन देशांमध्ये आंबा निर्यात करण्यापूर्वी या किडींच्या नियंत्रणासाठी उष्ण वाफेची प्रक्रिया करावी लागते.
नियंत्रणाचे उपाय : - 
            • फळमाशीचा प्रादुर्भाव फळे पक्व झालेल्या फळांवर मोठ्या फळमाशी नियंत्रण वेलवर्गीय आणि फळवर्गिय पिकातील.
     • फळमाशी नियंत्रणसाठी फळमाशी ट्रॅप सोबत लूर वापर करावा.तसेच मासोळी तैल फवारणी करावी.
        • फळमाशीचा प्रादुर्भाव फळे पक्व झालेल्या फळांवर मोठ्या प्रमाणावर होतो. फळे पूर्ण पक्व होण्यापूर्वी थोडी अगोदर काढावीत.
        • फळमाशीच्या नरास आकर्षित करणाऱ्या मिथील युजेनॉल व क्यूलुअर सापळ्याचा बागेत वापर करावा.फळमाशी ट्रॅप चा सर्व शेतकरी मित्रांनी वापर करायला पाहिजे.


पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.


फेसबुक पेज ला फॉलो करा.


टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.
प्रयोगशील जैविक शेतकरी निखिल तेटू 
 +919529600161 / +917721881560


टिप्पणी पोस्ट करा

5 टिप्पण्या

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र
कु- हा , अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू 9529600161