संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (InterNational Millets Years) म्हणून घोषित केले, या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्त्व, त्याचे फायदे तसेच त्याचबरोबर तृणधान्य पिकांचे क्षेत्र, आंतरपीक पद्धतीचा वापर करून भरडधान्यांना आपल्या जेवणातील मुख्य घटक म्हणून समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.
केंद्र शासनाने ज्वारी, बाजरी, नाचणी, कुटकी व इतर लघु तृणधान्य (वरई, राळा, राजगिरा ) या पिकांची आहारातील उच्च पोषक तत्त्वे विचारात घेता या पिकांना पौष्टिक तृणधान्य पिके म्हणून घोषित केले आहे. तसेच २०१८ हे राष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे केले होते. तेव्हापासून देशात भरडधान्याच्या प्रचार व प्रसाराचे काम चालू आहे. त्या अनुषंगाने वर्ष २०२३ हे संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. भरडधान्य हे गवतवर्गीय बारीक धान्यांचा प्रकार असून मध्यम ते हलक्या जमिनीत आणि समशीतोष्ण तसेच थंड अशा तिन्ही प्रकारच्या हवामानात घेतले जातात. भरडधान्यांमध्ये ज्वारी, बाजरी, रागी, राळा, वरई, कोदो, कुटकी, सावा, कुट्टू, राजगिरा अशा १० धान्यांचा समावेश होतो. या पिकांचा मानव व पक्ष्यांसाठी, धान्य म्हणून खाण्यासाठी, जनावरांसाठी चारा तसेच औद्योगिक क्षेत्रातही वापर होतो. महाराष्ट्र राज्यात बाजरी हे पीक प्रामुख्याने खरीप हंगामात घेतले जाते. बाजरी हे पीक नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, पुणे, सातारा, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांत प्रामुख्याने घेतले जाते. या पिकांखालील क्षेत्र कमी होऊन त्याची जागा इतर नगदी पिकांनी घेतली आहे, या बदलामुळे आपले मुख्य अन्न ग्लुटेनयुक्त झाले आहे, कारण ग्रामीण किंवा शहरी भागात गहू नियमित जेवणातून घेतले जाते; परंतु आपल्या पूर्वजांपासून चालत असलेल्या ग्लुटेनमुक्त ज्वारी किंवा बाजरीची जागा ग्लुटेनयुक्त गव्हाच्या चपातीने कधी घेतली ते कळलेसुद्धा नाही. आता तर फास्ट फूडचा जमाना आला आहे. त्यामुळे सकस अन्नद्रव्य मिळवणारी, भरपूर ऊर्जा देणारी, मिनोसिड असलेली आणि खनिजाचे भरपूर प्रमाण असलेली बाजरी महाराष्ट्रातून लुप्त झाल्यासारखी दिसते. त्यामुळे माणसाच्या आरोग्यावर, दुभत्या जनावरांवर सुद्धा परिणाम झाल्याचे दिसते. कारण बाजरी किंवा ज्वारीचा अन्नातून कमी होत चाललेला वापर, ज्वारी, बाजरी नाही तर जनावरांना चारा नाही, जनावरे नाहीत, तर शेतीला शेणखतही नाही. अर्थात पीक पद्धतीतील बदलाच्या या फेरात मानव आणि मातीचे आरोग्यदेखील बदलत चालले आहे. अन्नातील लोह, जस्त, सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे विकसनशील देशांमध्ये राहणाऱ्या, ज्यांचे मुख्य अन्न तृणधान्य पीक आहे व तेच तृणधान्य त्यांची भूक भागवतात, अशा लोकांच्या आरोग्यावर सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे. भारताने आर्थिक बाबतीत प्रगती केली व अन्नधान्याच्या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण झाला, तरीसुद्धा ८० टक्के गरोदर स्त्रियांमध्ये, ५२ टक्के गरोदर नसलेल्या स्त्रियांमध्ये व ७४ टक्के ३ वर्षांखालील बालकांमध्ये रक्तात लोहाची कमतरता आहे. याशिवाय ५२ टक्के ५ वर्षांखालील बालकांच्या रक्तामध्ये जस्ताची कमतरता आहे.
बाजरीमध्ये लोहाचे प्रमाण गहू, मका, भात इ. पिकांपेक्षा जास्त असल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. बाजरीत सल्फरयुक्त मिनोसिड असल्यामुळे लहान मुले व गर्भवती मातांसाठी बाजरी अतिशय उपयुक्त आहे. बाजरीपासून प्रक्रिया करून अनेक उत्पादने बनवता येतात, उदा. बाजरीच्या भाकरीशिवाय बाजरीचे टोस्ट, बाजरीचे बेसन लाडू, भजी, उपमा, थालीपीठ, बाजरीचा हलवा, बाजरीची खिचडी इत्यादी.
🔹आहारात बाजरीचे महत्त्व :-
▪️हृदयरोगापासून सुरक्षा - बाजरी धान्यात मॅग्नेशिअम व पोटॅशिअम हे घटक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रक्तवाहिन्या संकुचित होत नाहीत. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते व रक्तपुरवठा नियमित होण्यास मदत होते.
▪️रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करते - बाजरीमध्ये तंतुमय पदार्थाचे प्रमाण अधिक असल्यामुळे घातक कोलेस्ट्रॉल (चरबी कमी करण्यास मदत होते.
▪️मधुमेह नियंत्रित ठेवते - मधुमेह रुग्णांसाठी बाजरीतील मॅग्नेशिअम हा घटक इन्सुलिन व ग्लुकोज रिसेप्टेरची क्षमता वाढवून नियंत्रित ठेवतो. बाजरीचे नियमित सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी योग्य राहते.
▪️पचनसंस्था सुधारणे - बाजरीतील तंतुमय घटकामुळे जठरातील चयापचय क्रिया नियंत्रित होऊन वातदोष दुरुस्त करून कोठा साफ करण्यास मदत होते. त्यामुळे पचनसंस्थेचे काम सुरळीत होते व पोषण तत्त्वांचे शोषण सुधारते. नियमित पचन होऊन विषारी पदार्थ शरीराबाहेर निघाल्यामुळे हृदय, फुफुस व शरीरातील प्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते.
▪️कॅन्सर नियंत्रित करणे - महिलांमध्ये स्तनांचा कॅन्सर या रोगावर अतिशय लाभदायक, कारण बाजरीतील तंतुमय पदार्थामुळे हा आजार नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
▪️शरीरातील विषयुक्त मुक्त कणांना नष्ट करणे - बाजरीतील उपयुक्त ॲन्टी ऑक्सिडन्ट, कर्करोगास कारणीभूत असलेल्या विषयुक्त मुक्त कणांना नष्ट करतात. तसेच मुत्रपिंड व यकृत ग्रंथींना या विषारीयुक्त कणांपासून स्वच्छ ठेवण्यास मदत करतात.
▪️वजन नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त - बाजरीतील ट्रिप्टोफोन हे उपयुक्त मिनोसिड भुकेला कमी करण्यास मदत करते व वजन कमी होते. बाजरीमुळे घेतलेला आहार मंदगतीने पचवला जातो व जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते व भुकेची इच्छा कमी होते. शिवाय तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कमी आहारातही भूक शमवण्याचे समाधान मिळते व अतिआहार टाळला जातो.
▪️शांत झोपेसाठी उपयुक्त - बाजरीतील ट्रिप्टोफेन या उपयुक्त मिनोसिडमुळे शरीरातील सिरोटोनिन या घटकाचे प्रमाण वाढते व शरीरातील तणाव कमी होण्यास मदत होते, त्यामुळे रात्रीच्या जेवणात बाजरीचे सेवन केल्यास शांत झोप लागते.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या यट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.
टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.
धरतीशास्त्र जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती. शेतकरी मित्र निखिल तेटू +919529600161 / +917721881560
0 टिप्पण्या
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र
कु- हा , अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू 9529600161