"काही वर्षांपासून सर्व बियाण्यावर बिजप्रक्रिया का करावी लागत आहे ?" पुर्वी साध्या कपाशीच्या सरकीस शेणात ,मातीमध्ये घोळून सावली मध्ये सुकवून लागवड केली जात होती.तसेच उसाचे पाचट जाळून त्याची राख सुद्धा वापर करत होते.म्हणजे शेणात बियांण्याना पुर्ण सुरक्षा मिळत असेल. याचाच अर्थ असा की शेणखत टाकलेली शेत जमिन ही सर्व अर्थात खत, …
अधिक वाचा"वनस्पतींचे पोषण कसे होते ..." एक हेक्टर शेतजमिनीवर शेतकरी सुमारे एक ते दीड क्विंटल गहू पेरतो. तीन ते चार महिन्यांनंतर त्या शेतात 20 ते 25 क्विंटल गहू पिकतो. शेतकऱ्याला पिकाशिवाय कडबाही मिळतो. एका छोट्याशा आंब्याच्या कोयीचे काही वर्षांतच एका डेरेदार विशाल झाडात रूपांतर होते आणि ते द…
अधिक वाचा"सेंद्रिय पदार्थ मातीमध्ये काय करते?" मातीच्या सर्व घटकांपैकी, सेंद्रिय पदार्थ कदाचित सर्वात महत्वाचे आणि सर्वात गैरसमज आहे. सेंद्रिय पदार्थ मातीत पोषक आणि पाण्याचा साठा म्हणून काम करते, कॉम्पॅक्शन आणि पृष्ठभागावरील कवच कमी करण्यास मदत करते आणि मातीमध्ये पाण्याची घुसखोरी वाढवते. तरीही हे बर…
अधिक वाचा"माती परीक्षण" माती परीक्षण म्हणजे नेमके काय ? पिकांच्या लागवडीमध्ये माती हा अतिशय महत्वाचा घटक आहे. आपली माती कशी आहे. मातीचे आरोग्य कसे आहे . गुणधर्म काय आहेत हे समजून घेणे अतिशय गरजेचे आहे. हे जाणून न घेताच रासायनिक खतांचा असंतुलित वापर करणे योग्य नाही.त्यासाठी सेंद्रिय खते सुद्धा देणे गरजेचे आहे. मातीतील अ…
अधिक वाचा""स्कंद पुराण"में एक सुंदर श्लोक है" अश्वत्थमेकम् पिचुमन्दमेकम् न्यग्रोधमेकम् दश चिञ्चिणीकान्। कपित्थबिल्वाऽऽमलकत्रयञ्च पञ्चाऽऽम्रमुप्त्वा नरकन्न पश्येत्।। अश्वत्थः = पीपल (100% कार्बन डाइऑक्साइड सोखता है) पिचुमन्दः = नीम (80% कार्बन डाइऑक्साइड सोखता है) न्यग्रोधः = वटवृक्ष(80% कार्बन डाइऑक्साइड सोखता है…
अधिक वाचाविषमुक्त शेती आणि जैविक शेतीची सुरुवात कशी करावी ?? १.मातीची सुपीकता वाढविण्यासाठी बांध contour नियोजन करावेत.बोरू ,ढेंचा आणि एरोग्रीन सारखे हिरवळीचे पीक लावावे.हे पीक फुलोर अवस्था मध्ये जमिनीमध्ये गाडावे किंवा आच्छादन करावे. हिरवळ खते वापर केल्याने तन सुद्धा नियंत्रण होते. २.पिकांची फेरपालट करावी.एकच पीक त्याच त्याच जाग…
अधिक वाचादेशी बियाणे सवर्धन करा.विषमुक्त अन्न ग्रहण करा. महाराष्ट्राचा पंजाब होऊ शकतो लवकरच. सेवाग्राम वर्धा जवळच्या ग्रामीण भागात १९८५ साली हृदयरोग,रक्तदाब,मधुमेह,मूत्रपिंड आजाराचे भूत नव्हते.मात्र २०१६ च्या सर्वेनुसार २० वर्षांवरील ३०% लोकांना उच्च रक्तदाब, २०% लोकांना मूत्रपिंड किडनी स्टोन तसेच ३५ वर्षांवरील लोकांना ५% लोकांना…
अधिक वाचापिकासाठी नवीन तंत्रज्ञान ने मल्चिंग पेपर वापरण्याचे फायदे माहिती करून घेऊया. शेतात मल्चिंग वापरण्याचे फायदे १ ) तणांचा कायमचा बंदोबस्त होतो.पाण्याची ५० % बचत होते.सर्वच प्रकारच्या जीवजंतुंची जमिनीत झपाटयाने वाढ होते . २) जमिनीची सुपिकता वाढते. जमिनीचा पोत वाढतो. हवेतील ओलावा ओढून घेते. नत्र उपलब्ध होते . ३) प्रथिनांचे प्…
अधिक वाचा🪱 शेतकऱ्याचा खरा मित्र "गांडुळ" च का ? आपण कमी खर्चात गांडूळ शेती करायची आहे तर संपूर्ण ही पोस्ट वाचन करा.समजून घ्या. 🪱 गांडुळाच्या पोटामध्ये प्रचंड शक्ती असते. 🪱 त्याला भूक लागली की, काही तरी खावेसे वाटते, परंतु काय खावे आणि काय खाऊ नये, याची निवड त्याला करता येत नाही. कारण त्याला डोळे नसतात. 🪱 त्यामुळे ज…
अधिक वाचामी निखिल मधुकर तेटू माझ्या वयाच्या १३ वर्षा पासून मी माझ्या, घरच्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहे. तसेच मी शेती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याने करत आहे. माझी शेती ५ एकर असून सर्व शेती जैविक पद्धतीने सुरू आहे. तसेच जैविक निविष्ठा मी स्वतः वापर करून विषमुक्त अन्न तयार करतो. माझ्या शेतात मी जैविक शेती जेव्हा पासून सुरू केली तेव्हा पासून मला मधमाशी ,फुलपाखरू, सोनपाखरू, पक्षी दिसतात. खूप मोठ्या प्रमाणात दिसत असल्याने यांच्याशी मला खूप प्रेम आहे. त्यांना जेवण सुद्धा विषमुक्त मिळत असल्याने माझे प्रिय मित्र कीटक माझ्या शेतातच राहतात. मी माझ्या शेतात सर्वात जास्त वापर शेणखताचा करतो. नाडेप कंपोस्ट खत प्रक्रिया चा वापर करतो. मी प्रक्रिया केलेले शेणखत, गांडूळ खत व गांडूळ पाणी यांचा वापर करतो.कंपोस्ट खत, सोनखत, एरंडी पेंड,निम पेंड,करडई पेंड,मासोळी खत,हाडांचा चुरा,रॉक फॉस्फेट (राख) यांचा सेंद्रिय कर्ब म्हणून वापर करतो.बोरू धेंचा ताग शेतात पेरणी करून फुल अवस्था मध्ये कापणी केली जाते व ते जमिनी मध्ये सेंद्रिय कर्ब वाढवितो व ते आच्छादन म्हणून सुद्धा वापर करतो. माझ्या शेतात जमिनीला पोषक असे जिवाणू खते मी स्वतः बनविलेले आहे व वापर केलेले आहे जीवामृत, पंचगव्य, जैविक ह्यूमिक ,तांदूळ पेज,बेल रसायन, आवळा रसायन, जिवाणूपाणी कल्चर, फळांचा सडवा,GA, जिवाणू वाढविणे,पळसाची फुले, जैविक पोटॅश, तरल खत, राख, गारबेज enzymes व गूळ फवारणी करतो. शेतात बीजप्रक्रियासाठी मी नेहमी यांचा वापर करतो. :- गावरान गायचे ताजे शेण,गोमूत्र,हिंग,हळद, काळा गूळ, वारूळ माती किंवा सुपीक माती,मासोळी तैल. तसेच मला बीजप्रक्रिया स्पर्धा मध्ये Second Prize सुद्धा मिळाले आहे. जैविक पद्धतीने मी स्वतःबनविलेले कीटकनाशक:- निम अर्क, दशपर्णी अर्क, तरल खत, अंडा संजीवक,बाजरी कीटकनाशक, हिंगनास्त्र,अग्निहोत्र राख,करंज तेल, कीटकनाशक, ब्रह्मास्त्र,महाअस्त्र, CVR . जैविक बुरशीनाशक :- दही तांबे धातू, अग्निहोत्र राख,गोमूत्र ताक गूळ, ताक तांबे धातू , मासोळी तैल.तसेच मदर कल्चर आणून Trico derma virodi बनविणे नंतर multiply करून वापर करणे. जैविक पद्धतीने कीटक नियंत्रण साठी मी प्रयोग केलेले स्वतः :- प्रकाश सापळे लावणे,लाईट ट्रॅप बांधावर लावणे,पक्षी थांबे,पिवळे निळे चिकट सापळे,मिश्रपीक पद्धती, ऑईल लावून साडी फिरविणे , पांढरा कागद प्लास्टिक आणून शेतात फिरविणे. मित्र कीड संगोपनसाठी मी दरवर्षी वापर करतो:- ट्रायकोग्रामा मित्र कीटक संगोपन कार्ड वापर करणे.पक्ष्यांना अन्न सहज उपलब्ध करून देणे.मधमाशी यांना पाणी फुले जवळपास उपलब्ध करून देणे. शेतात बाजारातील रसायने कोणतेही वापर न करणे. मला संधी कृषी कॉलेजवर जैविक शेती विषमुक्त अन्न हे प्रशिक्षण देण्यासाठी मिळाली आहे. जैविक शेती संगोपन विषयी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलेले आहे.तसेच कृषी विज्ञान केंद्र मध्ये सुद्धा प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिलेले आहे.माझ्या शेतकरी मित्रासाठी मी घरी आणि माझ्या शेतात जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र उघडले आहे.माझे स्वतःचे काही ग्रुप असून मी शेतकरी मित्रांना रोज जैविक शेती ,बाजार,विक्री माहिती देतो.हवामान विषयक सुद्धा महिती देतो.तसेच मी माझ्या सर्व शेतकरी मित्रांची विषमुक्त फळे,धान्य,भाजीपाला विक्री करून देतो. शेतकरी मित्रांना जैविक शेती बद्दल संपूर्ण माहिती,व्यवस्थापन , तसेच नियोजन माहिती अगदी मोफत मिळावी या साठी मी ग्रुप तयार केलेले आहे.तसेच उत्पन्न वाढ आणि विक्री व्यवस्थापन साठी शेतकरी मित्रांना मी नेहमी मदत करतो.कारण अन्नदाता सुखी भव:हेच आमचे ध्येय आहे जैविक पद्धतीने तसेच नैसर्गिक पद्धतीने शेती केली तर पर्यावरण पूरक शेती होणार.विषबाधा होणार नाही. शेती मध्ये पर्यावरण स्वच्छ असल्याने शत्रू कीटक जास्त प्रमाणात राहणार नाही आणि विषमुक्त अन्न ,विषमुक्त फळे तयार होत असल्याने आजारांचे प्रमाण कमी राहणार .शेतीवरील खर्च कमी झाल्याने शेतकरी सुखी होणार.आर्थिक बजेट शेती विषयक कमी होतील. जैविक शेती एकदम कमी खर्चात कशी करावी.जैविक शेती मध्ये विषमुक्त अन्न, धान्य, फळे, भाजीपाला कसा तयार करावा.शेतकरी मित्रांना घरीच जैविक पद्धतीने कीड नियंत्रण माहिती देऊ. नैसर्गिक पद्धतीने शेती का करावी.उत्पन्न वाढ करून शेती वरील खर्च कसा कमी करावा. पिकेल ते विकेल हे मार्गदर्शन शेतकरी मित्रांना देऊ.तसेच आंरराष्ट्रीय शेतमाल कसा विक्री करावा. शेतकरी मित्रांना जैविक शेती बद्दल संपूर्ण माहिती,व्यवस्थापन,तसेच नियोजन अगदी मोफत मिळावी व उत्पन्न वाढ आणि विक्री कशी करावी या माहिती ने शेतकरी मित्रांना मदत व्हावी या साठी ही माहिती देत आहे.
Social Plugin