Ad Code

Responsive Advertisement

विषमुक्त शेती आणि जैविक शेतीची सुरुवात कशी करावी.

विषमुक्त शेती आणि जैविक शेतीची सुरुवात कशी करावी ??


१.मातीची सुपीकता वाढविण्यासाठी बांध contour नियोजन करावेत.बोरू ,ढेंचा आणि एरोग्रीन सारखे हिरवळीचे पीक लावावे.हे पीक फुलोर अवस्था मध्ये जमिनीमध्ये गाडावे किंवा आच्छादन करावे. हिरवळ खते वापर केल्याने तन सुद्धा नियंत्रण होते.
२.पिकांची फेरपालट करावी.एकच पीक त्याच त्याच जागी घेऊ नये .एकदल पीक घेतले नंतर द्वीदल पीक घ्यावे . आंतर पीक आणि मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करावा.
३. सहचारी पीक सोबत लाल अंबाडी, चवळी, मका,एरंड,मुंग,उडीद,काकडी, बरबटी,मेथी ,मोहरी,लसूण ,कांदा, पिके मध्ये लावून वापर करा.मित्र कीटक जास्त येतात .पक्षी सुद्धा येतात.मधमाशी संगोपन होते.




४.देशी गाय ,बैल गोमूत्र ,शेण जमा करण्यासाठी त्याचा योग उत्तार काढावा.आणि साठवणूक साठी प्लास्टिक ड्रम वापर करावा.


५. जैविक निविष्ठा मध्ये शेतात निम अर्क,जीवामृत,दशपर्णी अर्क,अंडा संजीवक,अमृत पाणी, लामित अर्क,enzymes तयार करावे. गांडूळ खत,कंपोस्ट खत,तयार करावे.
६.देशी बियाणे शक्य झाल्यास जास्त वापर करा.देशी बियाणे वापर केल्यास पिकांना रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होते.शेतकरी मित्रांनी शक्य झाल्यास सर्वात जास्त शेतात मिळणाऱ्या वनस्पती आणि जैविक खते च सर्वात जास्त वापर करायला पाहिजे. अधिक उत्पादनाचा नव्हे तर अधिक उत्पन्नाच्या म्हणजे अधिक निव्वळ नफाच्या वापर विचार करा.

 ७. रोग कीड बुरशी दिसली की कडूनिब,गोमुत्र वापर करावा.फवारणी करण्याची घाई करू नये.नुकसान पातळी तपासून शत्रू कीटक परिपूर्ण माहिती घेऊन फवारणी करावी.पक्षी आणि मित्र कीटक यांना पाहिले शत्रू कीटक नियंत्रण करण्यासाठी संधी द्या.नंतर फवारणी नियोजन करा.


८. काडीकचरा पेटवू नका.त्याचे खत बनवा.आणि शेतात वापर करा.त्यामुळे मधमाशी सुद्धा संगोपन होते .शेतात बांधावरती कडुलिंब, बोर, आवळा,चिंच,बाभूळ,शेवगा, हेटा झाड लावावेत.फुलांचे झाड सर्वात जास्त असल्याने मधमाशी ना अन्न मिळणार.आणि मधमाशी परागीकरण करणार.त्यामुळे रोग नियंत्रण होणार.


पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या

यूट्यूब चैनल      


फेसबुक पेज ला फॉलो करा



टेलिग्राम गृपला जॉइन्ट करा

https://t.me/+Xe_Kx5pSrxdhZjRl

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हाअमरावती.जैविक शेतकरी  मित्र निखिल मधुकर तेटू  +919529600161 / +91 77218 81560.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या