देशी बियाणे सवर्धन करा.विषमुक्त अन्न ग्रहण करा.
महाराष्ट्राचा पंजाब होऊ शकतो लवकरच.सेवाग्राम वर्धा जवळच्या ग्रामीण भागात १९८५ साली हृदयरोग,रक्तदाब,मधुमेह,मूत्रपिंड आजाराचे भूत नव्हते.मात्र २०१६ च्या सर्वेनुसार २० वर्षांवरील ३०% लोकांना उच्च रक्तदाब, २०% लोकांना मूत्रपिंड किडनी स्टोन तसेच ३५ वर्षांवरील लोकांना ५% लोकांना मधुमेह,६० वर्षांवरील लोकांना हृदय विकार आढळून आले. मूत्रपिंड आजाराचे नेमके कारण रासायनिक खते, संकरित बियाणे आणि कीटकनाशके कारणीभूत असण्याचे मुख्य कारण आहे. अन्य आजाराचे कारणही मुळ प्रदूषित अन्न आहे.
तसेच महाराष्ट्र राज्य सुद्धा पंजाबच्या दिशेने वाटचाल करत आहे.तिकडे गावोगावी, शहरी भागात कर्करोग,कॅन्सर,मधुमेह,रक्तदाब,मूत्रपिंड हे रोग पसरले आहे.आणि पंजाब ची कॅन्सर ट्रेन पूर्ण जगात प्रसिद्ध झाली आहे.
महाराष्ट्र राज्य मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचे नावाने तणनाशक, संकरित बियाणे,
आणि जी एम् बियाण्याचा वापर खूप वाढला आहे.हे चित्र लवकरच बदलायला पाहिजे नाहीतर लवकरच पंजाब सारखे वारे महाराष्ट्र मध्ये सुद्धा वाहू लागतील.
त्यासाठी जनतेचा मोठा सहभाग असणे खुप आवश्यक आहे. आज घडीला कृषी धोरणात रसायने आणि यंत्र सामुग्री मध्ये खूप मोठे योगदान आहे.जैविक शेती नावडती आहे आणि रासायनिक शेती पट्टराणी आहे. तसेच
जी एम बियाणे , संकरित बियाणे,आणि तणनाशक ,रासायनिक खते ,रासायनिक फवारणी मुळे आज मानवी आरोग्य ,पर्यावरण,जैविक शेतीला गंभीर धोका निर्माण झाला आहे.जी एम बियाण्याचा आणि त्या सोबत वापरल्या जाणाऱ्या रसायनचा वापर थांबिविने खूप महत्वाचे आहे.ही परिस्थिती बदलविने हे सर्व जनतेचे योगदान आहे नाहीतर सुरक्षित अन्न स्वप्न ठरेल.
१. जैविक शेतकऱ्यांना मदत करणे ,संख्या वाढविणे , त्यांना जैविक शेतीचे महत्व सांगणे.शेतात भेटी देणे.
२. देशी बियाणे सवर्धन करणे.शेतात जैविक निविष्ठा तयार करणे.देशी बियाणे महत्व समजून सांगणे.
३.जी एम बियाण्याचा वापर थांबविणे.विक्री बंद करणे.
४.ग्राहक आणि शेतकरी चर्चा वाढविणे.गोमाता आणि बैल आधारित शेती करणे.नवीन तंत्रज्ञान विकसित झालेले त्याची माहिती घेणे.
५. कमी खर्चात शेती कशी करता येईल त्याकडे नेहमी वाटचाल करणे.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यूट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.
टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560
2 टिप्पण्या
Innovative and exccelent information sir🙏🙏🙏🙏👍👍👍
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद सर
हटवाजैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र
कु- हा , अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू 9529600161