Ad Code

Responsive Advertisement

"बीजप्रक्रिया करण्याचे फायदे आणि माहिती समजून घेऊ.बीज प्रक्रिया जैविक पद्धतीने कशी करावी. का करावी.आणि कोणत्या पद्धतीने करावी ते माहिती समजून घेऊ."

"काही वर्षांपासून सर्व बियाण्यावर बिजप्रक्रिया का करावी लागत आहे ?"

पुर्वी साध्या कपाशीच्या सरकीस शेणात ,मातीमध्ये घोळून सावली मध्ये सुकवून लागवड केली जात होती.तसेच उसाचे पाचट जाळून त्याची राख सुद्धा वापर करत होते.म्हणजे शेणात बियांण्याना पुर्ण सुरक्षा मिळत असेल. याचाच अर्थ असा की शेणखत टाकलेली शेत जमिन ही सर्व अर्थात खत, जिवाणु संवर्धन , व पिकवर्धक उत्पादनासाठी जिवंत होती. परंतु कालांतराने अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर झाल्याने जमिनीतील पिकांचे मित्र जिवाणु हे कमी झाल्याने जमिनीत बुरशी, निमॅटोड, वाळवी,कंदकूज,मर, मळकूज, हुमणी चा प्रादुर्भाव खुप वाढला आहे. परिणामी आज प्रत्येक बि.टी बियाणे असो की बाजारातील कुठलेही बियाणे असो त्यांना बिजप्रक्रिया करावी लागत आहे.
बिज  प्रकिया काय आहे.ती कशासाठी असते.व कशी असते असे प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात असतात.पण शेतकरी असेही आहेत कि ज्यांना बिजप्रक्रीया माहित आहे पण ते करायचे टाळतात. बिजप्रक्रीयेचे महत्व जर आपण जाणून घेतले नाही तर आपले फार मोठे नुकसान होऊ शकते.
              म्हणुन आपण जाणून घेऊ बीजप्रक्रिया म्हणजे बियाणे जमिनीत पेरण्यापूर्वी जमिनीतून किंवा बियाण्यातून पसरणारे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच बियाण्यांची उगवण क्षमता वाढविण्यासाठी व रोपे सतेज आणि जोमदार वाढण्यासाठी बियाण्यांवर वेगवेगळी जैविक व रासायनिक औषधांची केली जाणारी प्रक्रिया.बिजापासून वनस्पतीची पैदास होते, त्यामुळे  उत्तम  उगवणशक्ती असलेले, चांगल्या प्रतीचे, सुधारित व  कीड/रोगांपासून मुक्त असलेल्या बियाण्यास बाजारात मागणी असते.
 शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे जर बियाणे उत्तम प्रतीचे असेल तर त्यापासून मिळणारे उत्पादन चांगल्या गुणवत्तेचे असणार आहे. तसेच जसे लहान बालकांना पोलिओ रोगापासून संरक्षण देण्यासाठी पोलिओ डोस दिला जातो, त्याचप्रमाणे बियाण्याला विविध कीड/रोगांपासून वाचविण्यासाठी बिजप्रक्रिया केली जाते. यावरून बियाणे प्रक्रियेचे महत्व लक्षात घेतले पाहिजेत. या अनुषंगाने शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, कोणतेही बियाणे बिजप्रक्रिया केल्याशिवाय पेरू नये.
१. पिकांमध्ये रोगाची निर्मिती सर्वसाधारणपणे बिजांमार्फत, जमिनीमार्फत व हवेमार्फत होत असते.  २. यामध्ये वेगवेगळे घटक रोगप्रसार करण्याकरिता भूमिका बजावतात.जसे हवा, कीटक, शेतीचे  साधने इ. बिजांमार्फत अनेक  हानीकारक रोगजंतूंचा प्रत्यक्ष व अप्रतयक्षरित्या प्रसार होतो.  
३. बिजांमार्फत होणार्‍या रोगांमुळे शेतीची प्रत खालावते.अंकुरण न झाल्यामुळे रोपांच्या संख्येवर विपरीत परिणाम होतो.
४. दुय्यम रोगांचा फैलाव होण्यास मदत होते, परिणामी उत्पादनात घट होते, तसेच दूषित बियाण्याचा आकारमान व रंग बदलतो. 
५. अशा बियाण्यास बाजारात भाव मिळत नाही. तेलवर्गीय बियाण्यांमधील तेलाचे प्रमाण कमी होते.  बिजासोबत जुळलेले सूक्ष्म जीव, प्रति जैविके (टॉकझिन्स) निर्माण करतात.असे बियाणे पेरण्यास तसेच खाण्यास अयोग्य असते.  
५. बीजामार्फत पसरणारे रोग उभ्या पिकात दुय्यम रोगाचा फैलाव करतात.त्यामुळे नुकसानीची पातळी वाढते. पीकसंरक्षणाचा खर्च वाढतो.   
६.अशा वेळेस बियाण्याव्दारे प्रसार होणार्‍या रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे महत्वाचे आहे.
७.बियाण्यांव्दारे उद्भवणार्‍या रोगांच्या नियंत्रणासाठी बीजप्रक्रिया हा कमी खर्चाचा उत्तम उपाय आहे.
बिजप्रक्रियेचे फायदे
१. जमिनीतून व बियाण्यांव्दारे पसरणार्‍या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो.बियाण्यांची उगवण क्षमता वाढते.
२.रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात.पिकाच्या उत्पादनात वाढ होते.
३. बिजप्रक्रियेसाठी कमी  खर्च येतो, त्यामुळे ही कीड/रोग नियंत्रणाची किफायतशीर पध्दत आहे.
रासायनिक बिजप्रक्रीया करण्याच्या पध्दती :- 
बुरशीनाशकाचे द्रावण तयार करून
या प्रक्रियेत एका भांडयात १०० किलो बियाण्यामध्ये १ लिटर पाणी टाकून १ मिनिट घोळून ओलसर करावे. नंतर त्यामध्ये बुरशीनाशक दिलेल्या प्रमाणात टाकून पुन्हा हे बियाणे पाच मिनिटापर्यंत लाकडी दांडा फिरविणे. सहाय्याने चांगले घोळावे. हे मिश्रण कोरडे होईपर्यंत घोळत राहावे. मात्र बियाण्याला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. जास्त प्रमाणावर बीजप्रक्रिया करावयाची असल्यास पाण्याच्या प्रमाणात थोडीफार वाढ करावी.
          ड्रमद्वारे बिजप्रक्रीया हि जुनी पध्दत आहेत. हि प्रक्रिया करण्यासाठी १०० किलो बियाण्यामध्ये १ लिटर पाणी टाकून ते ओलसर बियाणे बिजप्रक्रीया ड्रममध्ये घ्यावेत. नंतर त्यात बुरशीनाशके दिलेल्या प्रमाणात टाकून ३० ते ४० वेळा फिरवावे जास्त प्रमाणावर बीजप्रक्रिया करावयाची असल्यास पाण्याच्या प्रमाणात थोडीफार वाढ करावी. जेणेकरून बुरशीनाशक बियाण्यास सारख्या प्रमाणात चिकटेलण् हि प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवून पेरणीसाठी किंवा पुढच्या जीवाणू संवर्धनाच्या प्रक्रियेसाठी वापरावेण् बियाणे मिश्रण कोरडे होईपर्यंत हि घोल्ण्याची प्रक्रिया चालू ठेवावीण्
३ बियाण्यास बुरशीनाशकाची भुकटी पावडर चोळून
      बियाणे प्रक्रिया शिफारशीमध्ये दिलेल्या शिफारसीनुसार १ किलो बियाण्यास लागणाऱ्या बुरशीनाशकाचे प्रमाण घेऊन बियाण्यास चोळावेण् हे करत असतांना बियाण्यावर पाण्याच शिंपडा देऊन ओले करून घ्यावेण् अशी प्रक्रिया करतांनाए हातामध्ये रबरी किंवा प्लास्टिकचे हातमोजे वापरावेत.
रासायनिक बुरशीनाशकाची बिज प्रक्रियेबाबत काळजी
१. बियाणे प्रक्रियेसाठी मातीचे किंवा प्लॅस्टिक भांडयांचा वापर करावा. या भांडयाचा वापर अन्न शिजविण्यासाठी करू नये.बीज प्रक्रियेनंतर भांडयाचे झाकण किंवा प्लॅस्टिक पिशवीचे तोंड लगेच उघडू नये.
२. बीज प्रक्रियेनंतर शिल्लक राहिलेले बियाणे जनावरांच्या किंवा मनुष्याच्या खाण्यासाठी वापरू नये.बीज प्रक्रिया करताना हातामध्ये रबरी मोजे घालावेत व तोंडावर मास्क लावावा.
३. बीज प्रक्रिया करताना तंबाखू खाणे, पाणी पिणे, सिगारेट ओढणे टाळावे.

बिजप्रक्रिया करण्याचा क्रम:
१. सर्वप्रथम रासायनिक बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया करावी.
२.  त्यानंतर 3-4 तासांनी रायझोबिअम /अॅझोटोबॅक्टरची बिजप्रक्रिया करावी.
३. सर्वात शेवटी पी. एस.बी. ची बिजप्रक्रिया करावी.
जीवाणू संवर्धकाची बिजप्रक्रिया
१. शेंगवर्गीय/द्विदल पिकांसाठी रायझोबिअमची तसेच एकदल व तृृणधान्य पिकांसाठी अॅझोटोबॅक्टर हे जिवाणू संवर्धन वापरावे.
२. 250 ग्रॅम जीवाणू संवर्धन 10 किलो बियाण्यास वापरावे.
३. 1 लिटर गरम पाण्यात 100 ग्रॅम गूळ टाकून द्रावण तयार करावे.
४. द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये 250 ग्रॅम जीवाणू संवर्धन टाकून बियाण्यास हळूवारपणे लावावे किंवा जीवाणू संवर्धकाचा लेप बियाण्यांवर समप्रमाणात बसेल व बियाण्यांचा पृष्ठभाग खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी.
५. बियाणे ओलसर करून जीवाणू संवर्धन सारख्या प्रमाणात बियाण्यास लावावे.
६. नंतर बियाणे सावलीत स्वच्छ कागदावर सुकवावे.अशा बिजप्रक्रिया केलेल्या बियाण्यांची पेरणी ताबडतोब करावी. (24 तासात पेरणी करावी)
७. पर्यावरणावर विपरीत परिणाम होत नाही.जमिनीतून सेंद्रीय पदार्थ कुजवून जमीन सुधारण्यास मदत होते.
जीवाणू संवर्धन बिज प्रक्रियेबाबतची दक्षता
१.  जीवाणू संवर्धन प्रक्रिया ही बुरशीनाशके किंवा कीटकनाशकांची प्रक्रिया केल्यानंतर करण्यात यावी.
२. जीवाणू संवर्धन लावण्यापूर्वी जर बियाण्यास कीटकनाशके, बुरशीनाशके, जंतूनाशके इ. लावलेले असतील तर जीवाणू संवर्धन नेहमीपेक्षा दीडपट जास्त प्रमाणात लावावे.
३. रायझोबियम जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया पाकीटावर नमूद केलेल्या विशिष्ट पिकाच्या गट समुहास करावी.
४. ट्रायकोडर्मा (जैविक बुरशीनाशक) सोबत रायझोबियम, अॅझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळणारे जीवाणू या जीवाणू संवर्धकाची बिजप्रक्रिया करता येते.
जिवाणू संवर्धन म्हणजे काय ?
जिवाणू खत संपूर्ण सेंद्रिय व सजीव असून त्यामंध्ये कोणताही अपायकारक, टाकाऊ अथवा निरूपयोगी घटक नाही. हवेतील नत्र शोषून व साठवून नंतर पिकांना उपलब्ध करून देणार्‍या जिवांणूची प्रयोगशाळेत वाढ करून त्यापासून तयार केलेल्या खतांना जिवाणू खते म्हणतात.
१. अॅझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धन :
या खतातील जिवाणू एकदल व तृणधान्य पिकांना उपयोगी पडते. उदा. गहू, ज्चारी, बाजरी, भात, कपाशी इत्यादी.
२. रायझेबियम जिवाणू संवर्धन :
हे जिवाणू खते फक्त शेंगवर्गीय/द्विदल पिकांसाठी उपयोगी पडते. परंतु निरनिराळया पिकांसाठी विशिष्ट प्रकारच्या रायझोबियम गटाचे जिवाणू खत वापरावे लागते.
 ३. स्फुरद विरघळविणारे जिवाणू (पी.एस.बी.):
जमिनीमध्ये निसर्गत: वेगवेगळया प्रकारचे जिवाणू, बुरशी, शेवाळ व अॅक्टीनोमायसिटस् असतात. त्यापैकी काही जमिनीत अद्राव्य स्वरूपात स्थिर झालेलेल स्फुरद विरघळून ते पिकास उपलब्ध करून देतात. याशिवाय पिकासाठी उपयुक्त असलेले वाढवर्धक द्रव्ये तयार करण्याचे कार्य हे सुक्ष्मजीव करतात. स्फुरद विरघळविणार्‍या जिवाणू  खतांचा बियाण्यावर, रोपाच्या मुळावर अंतरक्षीकरण पद्धतीने वापर करतात किंवा शेणखतात मिसळून जमिनीत पेरतात. हे जिवाणू खत सर्व पिकांना 250 ग्रॅम प्रति दहा किलो बियाण्यास वापरावे.

पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यूट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.


टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या