Ad Code

Responsive Advertisement

"पिकांच्या भरघोस उत्पन्नासाठी माती परीक्षण खूप गरजेचे"

"माती परीक्षण"

माती परीक्षण म्हणजे नेमके काय ? 
पिकांच्या लागवडीमध्ये माती हा अतिशय महत्वाचा घटक आहे. आपली माती कशी आहे. मातीचे आरोग्य कसे आहे . गुणधर्म काय आहेत हे समजून घेणे अतिशय गरजेचे आहे. हे जाणून न घेताच रासायनिक खतांचा असंतुलित वापर करणे योग्य नाही.त्यासाठी सेंद्रिय खते सुद्धा देणे गरजेचे आहे. मातीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण तपासून खतांच्या मात्रा देणे फायदेशीर असते. त्याकरिता माती परीक्षण करणे गरजेचे असते.
        माती मध्ये 16 प्रकारचे पोषक घटक असणे आवश्यक असते.कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम.
               सूक्ष्म घटक  झिंक, मॅंगनीज, तांबे, लोखंड, बोरॉन, मोलिब्डेनम आणि क्लोरीन.
            या सर्व घटकांच्या संतुलित प्रमाणात वापर केल्यास योग्य उत्पादन मिळू शकते.
माती परीक्षण केल्याने नेमकं काय कळतं ? 
१.पेरणीपूर्वी जमिनीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणून घेऊन पिकांच्या आवश्यकतेनुसार कमी व अधिक पुरवठा करण्याकरिता.
२.फळझाडांची लागवड करण्यापूर्वी जमिनीची त्या फळ झाडांसाठी योग्यता तपासण्यासाठी.
३.आपल्या जमिनीचे आरोग्य कसे आहे हे जाणून घेण्याकरिता.
४.मातीतील नत्र , स्फुरद आणि पालाश ( एन.पी.के. ) याचं प्रमाण 
तुम्हाला माहितच आहे की पिकांच्या वाढीसाठी नत्र , स्फूरद आणि पालाश हे अत्यंत महत्त्वाचे अन्नघटक आहेत . माती परीक्षणामुळे आपल्या मातीमधलं या ३ घटकांचं नेमकं प्रमाण कळतं की ज्यावरून ते प्रमाण कमी आहे , जास्त आहे की पुरेसं आहे हे ठरवता येतं .
या प्रमाणानुसार आपण पीक घेताना कोणती खतं वापरावीत आणि किती प्रमाणात वापरावीत किंवा वापरूच नयेत , अशा शिफारशी माती परीक्षण अहवालात नमूद केलेल्या असतात . 
५.मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण मातीतील सेंद्रिय कर्ब हा मातीची सुपीकता आणि जलधारण क्षमता दोन्ही वाढवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो . सेंद्रिय कर्बाचे मातीतील प्रमाण ०.५० टक्क्यापेक्षा कमी असेल तर आपली माती आजारी आहे . आणि मग तिला निरोगी करण्यासाठी उपाययोजना करावी लागतात . 
गांडूळ खत , शेणखत , कंपोस्ट खत , हिरवळीची खतं यांसारखी सेंद्रिय खतं जास्तीत जास्त वापरून मातीतल्या सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविता येते .
६) मातीची क्षारता 
माती परीक्षणामुळे मातीत विरघळलेल्या क्षारांचं प्रमाण किती आहे म्हणजेच तिची क्षारता किती आहे , ते कळतं . 
माती परीक्षण अहवालात जर मातीची क्षारता १ पर्यंत आली तर उत्तम ! पण जर ती १ पेक्षा जास्त असेल तर मात्र मातीच्या दर्जात गडबड आहे .
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यूट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.

टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या