स्वतः शेतात कष्ट करा, झिझा, पाणी व मातीचा अभ्यास करा,कोणतीही फसवनुक करू नका स्वतःचा कष्टाने ब्रँड झाला पाहिजे, मग बघा आयुष्यात काहीच कमी पडणार नाही मित्रांनो...!!! हवा, रूबाब ज्यांना करायचा त्यांना करू दया, वेळ आपलीही येणार आहे, यावर विश्वास ठेवा..!! स्वतःला मातीत मिसळून घ्या.. एकरूप व्हा.. आपल्या शेतातील मातील…
अधिक वाचाटरबूज खरबूज पिकांची जैविक पद्धतीने नियोजन 🍉🍈 उत्पन्नवाढ आणि व्यवस्थापन माहिती... सुरवातीपासून आपण टरबूज खरबूज या पिकांची लागवड करत असल्यास माती परीक्षण,पाणी परीक्षण प्रयोगशाळा मध्ये करून घ्यावे. नंतर आपल्याला योग्य प्रकारची मशागत करावी जमिनीला उन्ह द्यावीत.नर्सरी पेक्षा रोप नेहमी घरी बनवावी.बियाणे आणून स…
अधिक वाचाशेतकरी मित्राने बनविलेले एक जैविक कीड नियंत्रण कीटकनाशक... हिंगणास्त्र हे एक जैविक कीटकनाशक आहे.. हे जैविक कीटकनाशक **काळा मावा, पिवळा मावा, हिरवा मावा, थिप्स, तुडतुडे, पांढरी माशी, रस शोषन करनारे सर्व रोग कीटक, मिरची वरील बोकड्या व्हायरस, टोमॅटो वरील लीफ व्हायरस, भेंडी वांग्यावरील शेंडे अळी , लाल कोळी, नाग …
अधिक वाचा🍉टरबुज (कलिंगड)/खरबूज फळवर्गीय तसेच वेलवर्गीय फळभाजीत फळमाशीचे नियंत्रणसाठी फळमाशी ट्रॅप महत्वाचे....🍐🥝🍈🥒🍅🍑🫒🥒🍊 🍎🍏🍋🍉🍓🥭🍅🍆🥑🥒🫑 भारतामध्ये फळमाशीच्या सुमारे १६ प्रजातींची नोंद झाली असून, त्यापैकी ४ प्रजाती हंगामनिहाय फळांचे आणि फळभाज्यांचे नुकसान करतात. यापैकी बॅक्ट्रोसेरा डॉरसॅलिस बॅक्ट्रो…
अधिक वाचाकांदा व्यवस्थापन महिती अगदी जैविक पद्धतीने.एकदम कमी खर्चात..🧅🧅🧅🧅 १ एकर मध्ये कांदा बियाणे पेरणी साठी २.५-३ किलो लागणार .त्यासाठी सर्वात महत्वाचे जमिनीचे योग्य प्रकारे मशागत करणे.जमिनीला उन्ह जास्त वेळ देणे.हुमणी उदळी खूप दिसत आहे त्यामुळे फवारणी करायची असल्यास जैविक मेटारायझमची करावीत.तसेच बीज प्रक्रिया …
अधिक वाचास्वयंचलित इको-पेस्ट ट्रॅप' ( प्रकाश सापळा) शेतकरी मित्रहो आता जैविक कीटक नियंत्रण इको पेस्ट ट्रॅप मुळे इको-पेस्ट ट्रॅप' हा प्रकाश सापळा, चिकट सापळा आणि कामगंध सापळा याचे संयुक्तरित्या काम करते. पिवळा चिकट सापळा दिवसा शेतात उडणारे हानिकारक कीटक उदा. पांढरी माशी, तुडतुडे, फळ…
अधिक वाचामी निखिल मधुकर तेटू माझ्या वयाच्या १३ वर्षा पासून मी माझ्या, घरच्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहे. तसेच मी शेती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याने करत आहे. माझी शेती ५ एकर असून सर्व शेती जैविक पद्धतीने सुरू आहे. तसेच जैविक निविष्ठा मी स्वतः वापर करून विषमुक्त अन्न तयार करतो. माझ्या शेतात मी जैविक शेती जेव्हा पासून सुरू केली तेव्हा पासून मला मधमाशी ,फुलपाखरू, सोनपाखरू, पक्षी दिसतात. खूप मोठ्या प्रमाणात दिसत असल्याने यांच्याशी मला खूप प्रेम आहे. त्यांना जेवण सुद्धा विषमुक्त मिळत असल्याने माझे प्रिय मित्र कीटक माझ्या शेतातच राहतात. मी माझ्या शेतात सर्वात जास्त वापर शेणखताचा करतो. नाडेप कंपोस्ट खत प्रक्रिया चा वापर करतो. मी प्रक्रिया केलेले शेणखत, गांडूळ खत व गांडूळ पाणी यांचा वापर करतो.कंपोस्ट खत, सोनखत, एरंडी पेंड,निम पेंड,करडई पेंड,मासोळी खत,हाडांचा चुरा,रॉक फॉस्फेट (राख) यांचा सेंद्रिय कर्ब म्हणून वापर करतो.बोरू धेंचा ताग शेतात पेरणी करून फुल अवस्था मध्ये कापणी केली जाते व ते जमिनी मध्ये सेंद्रिय कर्ब वाढवितो व ते आच्छादन म्हणून सुद्धा वापर करतो. माझ्या शेतात जमिनीला पोषक असे जिवाणू खते मी स्वतः बनविलेले आहे व वापर केलेले आहे जीवामृत, पंचगव्य, जैविक ह्यूमिक ,तांदूळ पेज,बेल रसायन, आवळा रसायन, जिवाणूपाणी कल्चर, फळांचा सडवा,GA, जिवाणू वाढविणे,पळसाची फुले, जैविक पोटॅश, तरल खत, राख, गारबेज enzymes व गूळ फवारणी करतो. शेतात बीजप्रक्रियासाठी मी नेहमी यांचा वापर करतो. :- गावरान गायचे ताजे शेण,गोमूत्र,हिंग,हळद, काळा गूळ, वारूळ माती किंवा सुपीक माती,मासोळी तैल. तसेच मला बीजप्रक्रिया स्पर्धा मध्ये Second Prize सुद्धा मिळाले आहे. जैविक पद्धतीने मी स्वतःबनविलेले कीटकनाशक:- निम अर्क, दशपर्णी अर्क, तरल खत, अंडा संजीवक,बाजरी कीटकनाशक, हिंगनास्त्र,अग्निहोत्र राख,करंज तेल, कीटकनाशक, ब्रह्मास्त्र,महाअस्त्र, CVR . जैविक बुरशीनाशक :- दही तांबे धातू, अग्निहोत्र राख,गोमूत्र ताक गूळ, ताक तांबे धातू , मासोळी तैल.तसेच मदर कल्चर आणून Trico derma virodi बनविणे नंतर multiply करून वापर करणे. जैविक पद्धतीने कीटक नियंत्रण साठी मी प्रयोग केलेले स्वतः :- प्रकाश सापळे लावणे,लाईट ट्रॅप बांधावर लावणे,पक्षी थांबे,पिवळे निळे चिकट सापळे,मिश्रपीक पद्धती, ऑईल लावून साडी फिरविणे , पांढरा कागद प्लास्टिक आणून शेतात फिरविणे. मित्र कीड संगोपनसाठी मी दरवर्षी वापर करतो:- ट्रायकोग्रामा मित्र कीटक संगोपन कार्ड वापर करणे.पक्ष्यांना अन्न सहज उपलब्ध करून देणे.मधमाशी यांना पाणी फुले जवळपास उपलब्ध करून देणे. शेतात बाजारातील रसायने कोणतेही वापर न करणे. मला संधी कृषी कॉलेजवर जैविक शेती विषमुक्त अन्न हे प्रशिक्षण देण्यासाठी मिळाली आहे. जैविक शेती संगोपन विषयी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलेले आहे.तसेच कृषी विज्ञान केंद्र मध्ये सुद्धा प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिलेले आहे.माझ्या शेतकरी मित्रासाठी मी घरी आणि माझ्या शेतात जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र उघडले आहे.माझे स्वतःचे काही ग्रुप असून मी शेतकरी मित्रांना रोज जैविक शेती ,बाजार,विक्री माहिती देतो.हवामान विषयक सुद्धा महिती देतो.तसेच मी माझ्या सर्व शेतकरी मित्रांची विषमुक्त फळे,धान्य,भाजीपाला विक्री करून देतो. शेतकरी मित्रांना जैविक शेती बद्दल संपूर्ण माहिती,व्यवस्थापन , तसेच नियोजन माहिती अगदी मोफत मिळावी या साठी मी ग्रुप तयार केलेले आहे.तसेच उत्पन्न वाढ आणि विक्री व्यवस्थापन साठी शेतकरी मित्रांना मी नेहमी मदत करतो.कारण अन्नदाता सुखी भव:हेच आमचे ध्येय आहे जैविक पद्धतीने तसेच नैसर्गिक पद्धतीने शेती केली तर पर्यावरण पूरक शेती होणार.विषबाधा होणार नाही. शेती मध्ये पर्यावरण स्वच्छ असल्याने शत्रू कीटक जास्त प्रमाणात राहणार नाही आणि विषमुक्त अन्न ,विषमुक्त फळे तयार होत असल्याने आजारांचे प्रमाण कमी राहणार .शेतीवरील खर्च कमी झाल्याने शेतकरी सुखी होणार.आर्थिक बजेट शेती विषयक कमी होतील. जैविक शेती एकदम कमी खर्चात कशी करावी.जैविक शेती मध्ये विषमुक्त अन्न, धान्य, फळे, भाजीपाला कसा तयार करावा.शेतकरी मित्रांना घरीच जैविक पद्धतीने कीड नियंत्रण माहिती देऊ. नैसर्गिक पद्धतीने शेती का करावी.उत्पन्न वाढ करून शेती वरील खर्च कसा कमी करावा. पिकेल ते विकेल हे मार्गदर्शन शेतकरी मित्रांना देऊ.तसेच आंरराष्ट्रीय शेतमाल कसा विक्री करावा. शेतकरी मित्रांना जैविक शेती बद्दल संपूर्ण माहिती,व्यवस्थापन,तसेच नियोजन अगदी मोफत मिळावी व उत्पन्न वाढ आणि विक्री कशी करावी या माहिती ने शेतकरी मित्रांना मदत व्हावी या साठी ही माहिती देत आहे.
Social Plugin