नंतर वाफे पद्धती किंवा बेड पद्धती तयार केले असतील तर गरजेपुरते पाणी द्यावेत.नंतर रोप निघण्यास १२-१३ दिवस लागणार.त्या नंतर आपण लवकरच तण नियंत्रण करावेत.आणि रोप वाढ साठी गांडूळ पाणी, डी-कंपोजर,जैविक हयुमिक दृंचिग करावेत.तसेच चिकट सापळे लावावेत.नंतर कीटक नियंत्रणसाठी निम अर्क सोबत मासोळी तैल वापर करावा .🏞️🏞️🏞️
पाल हिरवी ठेवण्यासाठी देशी गोमूत्र फवारणी करावी.तसेच जास्त कीटक दिसल्यास कीटक नियंत्रण साठी हिगनास्र फवारणी करावी.अंडा संजीवक ,खट्टा रसायन, ताक गूळ वापर करावा.📜📜📜📜📜📜📜
रोप लागवडसाठी तयार झाले नंतरच लागवड करावी.तसेच रोपांची मुळे Tricoderma मध्ये बुडवून ठेवणे.नंतर अर्धा तास नंतर लागवड करावेत. घाई करू नये.त्यासाठी सुद्धा वातावरण पाहून ,कृषी हवामान सल्ला पाहूनच लागवड करावी .लागवड करताना वाफा पद्धत,सरी पद्धती करा.⌛⏳⏳⏳⏳⏳
रोपांना पाणी लागल्यास पाणी द्यावेत.जमिन पाहून पाणी व्यवस्थापन बरोबर करावेत.हुमणी अळी नियंत्रणसाठी बायोमिक्स किंवा मेटारायझम वापर करावा.जास्त पाणी झाल्यास रोप पिवळे पडतात,रोग वाढ होते.बेसल डोस आपण जीवामृत, गांडूळ पाणी, पंचगव्य,गो कृपा अमृत,गांडूळ खत,सेंद्रिय कर्ब, डी कंपोजर, देऊ शकतो.🪄🪄🪄🪄
कीटक नियंत्रणसाठी पुन्हा चिकट सापळे एकरी २५-३० लावावेत.निम अर्क किंवा तरल खत ,दशपर्णी अर्क, निम ऑईल, हिगणास्त्र वापर करावा. वर्टीसिलीयम लेकानी , बिव्हेरिया वापर करावा.🌿🍀🌿
पूर्ण पद्धतीने जैविक कांदा असल्याने दोनदा तरी जीवामृत, गांडूळ पाणी, पंचगव्य, गांडूळ खत,अंडा संजीवक देणे महत्वाचे आहे.कांदा फुगवणसाठी द्रिंचींग् मध्ये बेलव रसायन देणे महत्वाचे आहे. आवळा रसायन आणि मासोळी तैल सुद्धा शेवटी फवारणी करावी .उत्पन्न वाढसाठी तण नियंत्रण ,रोग नियंत्रण,बुरशी नियंत्रण करावेत.कांद्याला सर्वात जास्त पाती आल्यास कांदा जास्त फुगवण करते.उत्पन्न वाढ होते. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सकाळी सकाळी दाट धुके, धुवारी पडल्यास त्याच दिवशी साधी फवारणी करावी.ताक गोमूत्रची.जास्त खर्च करू नयेत.रासायनिक खते आणि फवारणी मुळे कांदा सर्वात जास्त सडतो.काळा पडतो.रोग जास्त येतात.जमीन सुद्धा खराब होते.लक्ष द्या शेतकरी मित्रहो आता थोडे तरी ..🙏🏻🙏🏻⏳
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +91 77218 81560.
3 टिप्पण्या
9011351545
उत्तर द्याहटवाखूप छान माहिती दिलीत भाऊ. मी जून महिन्यात 10 एकर लागवाड करणार आहे चालेल का?
उत्तर द्याहटवाहो सर. जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु-हा, अमरावती.9529600161
उत्तर द्याहटवाजैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र
कु- हा , अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू 9529600161