Ad Code

Responsive Advertisement

टरबूज खरबूज पिकांची जैविक पद्धतीने नियोजन 🍉🍈 उत्पन्नवाढ आणि व्यवस्थापन माहिती...

टरबूज खरबूज पिकांची जैविक पद्धतीने नियोजन 🍉🍈 उत्पन्नवाढ आणि व्यवस्थापन माहिती...


            सुरवातीपासून आपण टरबूज खरबूज या पिकांची लागवड करत असल्यास माती परीक्षण,पाणी परीक्षण प्रयोगशाळा मध्ये करून घ्यावे. नंतर आपल्याला योग्य प्रकारची मशागत करावी जमिनीला उन्ह द्यावीत.नर्सरी पेक्षा रोप नेहमी घरी बनवावी.बियाणे आणून स्वतः घरी नर्सरी तयार करावी.लागणार तेवढे शेणखत घेऊन बुरशीनाशक आणि निम अर्क मिक्स करून ग्लास स्ट्रे भरावे.नंतर बीज प्रक्रिया केलेले बीज टाकून माती टाकावी.एक एकर मध्ये जवळपास ७००० रोप लागवड होते.नंतर स्प्रिंकल किंवा झारीने पाणी द्यावे.रोपांना उन्ह थोडीफार द्यावे.२१° कमी तापमानात बियाणे अकुरीत होत नाहीत.शक्य झाल्यास पाणी देताना गांडूळ पाणी वापर करावा.निम अर्क वापर करा.डी कंपोजर वापर करावा.लागवड करताना माती परीक्षण नुसार पद्धतीने नियोजन जैविक निविष्ठा वापर करावा.सेंद्रिय खते जिवाणू खते द्यावी.**🌱🌾🌾🌱🌿🍉🍈🍉🍈🍉🍈🍉

            लागवड ही डिसेंबर महिन्यापासून शेतकरी करत असतात ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत.जमिनीला योग्य उन्ह मिळत असल्यास बुरशी , उदळी प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणात येतो. नंतर बेड लावून mulching पेपर झाकून द्यावा.आणि योग्य नियोजन करून घ्यावेत.कारण आता टरबूज खरबूज बाराही महिने चालणारे फळ झालेले आहे.पण शक्य झाल्यास डिसेंबर महिना लागवड साठी योग्य आहेत.कारण वातावरण सुद्धा चांगले असतात.रेताड किंवा नदीकाठी जबरदस्त येणारे हे पीक आहे.हे पीक १००-१२० दिवसांचे आहे.त्यामुळे नियोजन जास्त नसून काळजी खूप पूर्वक आहे.या पिकांना पाण्याची गरज असून Nutrition ची सुद्धा गरज असते.त्यामुळे न चुकता पाणी वेळेवर देणे जास्तच महत्वाचे ठरते.*🥭🍊🍑🥭🍈🍈🍉🍉

            रोप लागवड करण्याआधी drip २ तास सुरू ठेवणे नंतर रोप लागवड करणे.उंदीर नियोजन पाहणे. रोप लागवड करताना बुरशी,कीड समस्या असलेले रोप फेकून देणे.चांगले रोप पाहूनच लागवड करणे.Tricoderma वापर करणे.मर ,भुरी,करपा रोड दिसताच बुरशी नाशक निविष्ठा ची फवारणी करावी. पूर्ण रोप लागवड झाले नंतर झाले नंतर गो कृपा अमृत , डी कंपोजर, PSB,KSB, रायझोबियम जिवाणू खते ड्रीप मधून द्यावे.नाहीतर आळवणी करावी.**✍🏻✍🏻✍🏻✍🏻🙏🏼

            रोप जमिनीमध्ये settle होईपर्यंत तसेच पिकांना नवीन मुळा आणि पालवी निघेपर्यंत पाणी नियोजन करावेत.परीक्षा माहिती समजण्यासाठी सुरवातीलाच काही रोपांना ओळख करून रोज पाहत रहावं.त्यासोबत डी कंपोजर किंवा गो कृपा अमृत द्यावे.नवीन पालवी आल्यानंतर मायक्रोरायझा देणे खूप महत्वाचे आहेत.खते देताना २० मिनिटे पाहिले जमिनीमध्ये ओलावा तयार करणे नंतर खते सोडणे.ड्रीप मधून सूक्ष्म जिवाणू खते, सेंद्रिय खते सोडणे खूप महत्वाचे असते.तसेच दिवसातून एकदा तरी शेतात सर्वदूर चक्कर मारावी.काही ठिकाणी रोग दिसल्यास अजून काही समस्या दिसल्यास नियोजन करावेत. ३० दिवसांनी जिवाणू खते देणे खूप महत्वाचे आहे.एकरी ६ टन गांडूळ खत खूप आवश्यक आहे. पण एकास वेळास न देता थोडे थोडे १ महिन्यातून २ वेळा देणे.**🌻🌻🌻🌺🌻🌻🌺🌺🌺🌸

            पावडर मिल्ड्यू, डाऊनी मिल्ड्यु रोग दिसल्यास बुरशीनाशक फवारणी करणे महत्वाचे असते.मर रोग,भुरी,करपा दिसताच आधीच नियोजन करावे. या समस्या दिसताच बुरशीनाशक फवारणी करणे.मोरचुद फावरणी करणे. वेळेवर आपण बुरशीनाशकची फवारणी करणे जमिनीमधून सोडणे खूप गरजेचे आहे.प्रत्येक वेळी पाणी देताना गांडूळ पाणी , डी कंपोजर, गो कृपा अमृत द्यावे..तसेच पिकांची ताकत पाहून त्या वेलीवर शक्य झाल्यास जास्त फळे ठेवू नये.काही फळे आधीच तोडून घ्यावे.म्हणजेच इतर फळे उतम्म कसदार बनते.वजनदार होते.लवकर वाढ होते.जास्त सूर्यप्रकाश मुळे फळे भाजली जातात.फळे बेकार होतात.त्यासाठी फळांना पानांची सावली खूप महत्वाची ठरते.ते सावली आपण पानांची संख्या वाढवून तयार करू शकतो.किंवा फळांना fruit cover सुद्धा लावू शकतो. Mulching कागद सुद्धा जास्त गरम झाल्याने फळ भाजली जातात.**☀️⛈️🌩️🌨️🌧️⛅🌥️☀️☁️

            फळे लागल्यानंतर पिकांना पाणी ५ दिवसांनी द्यावे.सोबत डी कंपोजर,गो कृपा अमृत,जिवाणू खते द्यावे. वाफसा तयार होत असल्यास पिकांना पाणी सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. वाफसा तयार झाल्यास पिकांना रोग येतात.पिके पिवळी होऊन मरतात.तसेच मधमाशी वाढविण्यासाठी तसेच परागीकरण साठी फळांचा सड तयार करून फवारणी करणे.गूळ ताक फवारणी करणे.शेतात धूर करणे बंद करणे.रासायनिक फवारणी बंद करणे. पंच्यगव्य किंवा गो कृपा अमृत फवारणी करणे .कारण सर्वात महत्वाचा घटक टरबूज खरबूज पिकांना मधमाशी आहे.**🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝🐝

            फळे लागल्यानंतर खूप महत्वाची कारणे आहे.फळांना पाणी लागू न देणे, फळांना उन्ह पासून बचाव करणे,आच्छादन तयार करावेत.नंतर काही दिवसांनी फळे तडकत असल्यास,भेगा पडत असल्यास पळसाची फुले सडवा तयार करून वापर करावं.नाहीतर बोरॉन कॅल्शियम फॉस्फरस लोह असलेले घटक जमिनीमधून द्यावे.आणि वातावरण मधील होणारे बदल पाहून सुद्धा नियोजन करावे. वातावरण मधील होणाऱ्या बदलांमुळे रोग कीटक बुरशी वाढ होण्याचे प्रकार दिसतात. करणे.हळदीचा पाने,सागाची पाने किंवा झाडांच्या पाने वापर करावी.तापमान २४°-२७° असल्यास पेशींच्या,फळांच्या तसेच पानांच्या वाढीसाठी योग्य आहे.जर तापमान १८° कमी झाले तर वेलींच्या,फळांच्या वाढीवर परिणाम होते. ☂️☂️☂️
            कीटक नियंत्रणसाठी तुडतुडे, फुलकिडे,पांढरी माशी,मावा,थ्रीप्स ,हिरवे कीटक,तांबडे भुंगेे, दिसल्यास निम अर्क सोबत गोमूत्र,आणि हिंगणास्त्रची फवारणी करणे.तसेच पिवळे निळे चिकट सापळे एकरी ३० लावावेत.तसेच लाईटा ट्रॅप लावावेत.पानावर नागअळी जास्त दिसल्यास पाणी तोडून जाळून टाकावी.तसेच शक्य झाल्यास पानाच्या खालून फवारणी करणे खूप गरजेचे असतात.गोमूत्र हिंग हळद ताक निम अर्क फवारणी १० दिवसातून एकदा करणे.तसेच जमिनीमधून सुद्धा सोडणे.**✨⚡🌟⚡🌟✨⚡

            फळमाशी नियंत्रणसाठी पीक ३०-४० दिवसांची झाल्यावरच फळमाशी नियोजन महत्वाची आहे.तसेच तेव्हा पासून फळमाशी ट्रॅप लावणे खूप महत्वाचे आहे.एकरी फळमाशी ट्रॅप २० लावावेत.मासोळी तैल फवारणी करणे.फळ कीडक दिसल्यास फळ तोडून नष्ट करावी.फळ प्लॉट पासून खूप दूर अंतरावर नेऊन नष्ट करावेत म्हणजेच फळमाशी नियंत्रण होतील.कुठेही फेकू नयेत.फळांची आपण ज्यूस,पराठे ,भाजी, लोणचे सुद्धा बनवू शकतो.🍈🍉🍈🍉🍉🍈

            फळांची विक्री बाहेरील जिल्ह्यातील आणि राज्यातील बाजारभाव पाहूनच विक्री करावी.फळांची तोडणी ही सकाळी लवकर करावी.आकार ,रंग,वजन यांचा अंदाज पाहून फळांची परिपक्वता समजते.नंतर बाजार मध्ये विक्री करावी.त्यामुळे फळांना सुद्धा चकाकी,ताजेपणा दिसते.तेजस्वीपना येतो.उत्तम स्वादिष्ट आणि चवदार प्रकारची फळे दिसतात.फळांची विक्री स्वतः करावी नाहीतर चांगला जिथे भाव मिळणार तेथून माहिती काढून त्या व्यापारी वर्गाला द्यावेत. 🎋🌿🌱🌾☘️🌾☘️🍀


पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या

यूट्यूब चैनल      


फेसबुक पेज ला फॉलो करा



टेलिग्राम गृपला जॉइन्ट करा

https://t.me/+Xe_Kx5pSrxdhZjRl

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हाअमरावती.जैविक शेतकरी  मित्र निखिल मधुकर तेटू  +919529600161 / +91 77218 81560.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या