Ad Code

Responsive Advertisement

विदर्भाची नागपुरी संत्री (जात, किडी, रोग विषयक माहिती)

संत्री हे फळझाड लिंबू वर्गातील (सिट्रस फॅमिली) असून त्याचे उगमस्थान चीनमधील आहे. भारतामध्ये पिकणाऱ्या सर्व फळांमध्ये लिंबूवर्गीय फळझाडांपासून मिळणाऱ्या फळांचा वाटा बराच मोठा आहे. या फळझाडांमध्ये संत्र्याचे व्यापारीदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे. लिंबूवर्गीय फळ हे भारतातील तिसरे महत्त्वाचे फळपीक आहे आणि त्याच्या विविध वाणांची विदर्भात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. नागपुरी संत्रा आणि मोसंबी विदर्भातील लोकप्रिय फळ आहेत.
               तसेच सर्वात जास्त संत्री उत्पादन अमरावती शहरात घेतले जातात. शेतकरी दरवर्षी मोठ्या संख्येने संत्रा कलमांची लागवड करतात. महाराष्ट्रात विदर्भातील हवामान आणि जमीन या फळझाडाच्या लागवडीसाठी पोषक आहे. विदर्भात संत्र्याची लागवड 80,000 हेक्टर क्षेत्रात केली जाते. महाराष्ट्रातील इतर भागात मात्र तुरळक प्रमाणात संत्र्याची लागवड होते. विदर्भात सर्वात जास्त संत्राचे उत्पादन घेणारा अमरावती जिल्हा आहे. तसेच संत्राच्या कॅलिफोर्निया म्हणून सुद्धा अमरावती शहराची ओळख आहेत. 
विदर्भाच्या अमरावती ची स्पेशल संत्री जगप्रसिद्ध आहेत. फळात गोडी आणि आंबटपणा यांचे छान मिश्रण आहे. संत्र्याच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात 'क' जीवनसत्त्व असते. त्यामुळे संत्र्याच्या फळांचा अथवा रसाचा आपल्या आहारात समावेश करणे अत्यंत आवश्यक असते. संत्रा हे स्वादिष्ट, उत्साहवर्धक व परिपूर्ण असे फळ आहे. संत्राच्या रसात भरपूर प्रमाणात 'क' जीवनसत्त्व असून 'अ' व 'ब' जीवनसत्त्वांचे प्रमाणही चांगले असते.
      ◾  संत्राच्या काही विशिष्ठ जाती 
   🔹नागपुरी : ही संत्र्याची लोकप्रिय जात आहे. मृगबहाराच्या संत्र्याच्या फळाचे बजन 140-150' ग्रॅम तर आंबेबहाराच्या संत्र्याचे वजन 170-180 ग्रॅम भरते. फळे नारिंगी रंगाची असतात. फळे पोला प्रकारची (सैल, मोकळ्या सालीची) असून स्वाद उत्तम असतो. संत्र्याच्या एका झाडापासून सरासरी 700 ते 800 फळे मिळतात. या फळांचे एकूण वजन 90 ते 95 किलो भरते. फळे तयार होण्यासाठी साधारणत: 250 ते 260 दिवस लागतात. 
  🔹 मुदखेड : या जातीची फळे नारिंगी रंगाची असून फळामध्ये बिया फार कमी असतात. फळाचे सरासरी वजन 130ते 155 ग्रॅम भरते. एका झाडापासून सरासरी 600 ते 650 (80 ते 85 किलो) फळे मिळतात. फळे तयार होण्यासाठी 240 ते 260 दिवस लागतात. या जातीच्या फळांची साल घट्ट असते.
  🔹 किन्नो : या जातीची उत्तर भारतात आणि काही प्रमाणात मध्य भारतात बरीच लागवड केली जाते. विदर्भातही या जातीची लागवड यशस्वीपणे करता येते. या जातीच्या झाडाची उंची 250 सेंमी. असून 5 वर्षांनंतर फळधारणेला सुरुवात होते. एका झाडापासून सरासरी 140 फळे मिळतात. फळाचे सरासरी वजन 165 ग्रॅम असते. फळाचा रंग फिकट नारिंगी असून पृष्ठभाग खडबडीत असतो.
◾ संत्र्याच्या झाडांवर अनेक किडींचा उपद्रव दिसून येतो. त्यांचा वेळेवर बंदोबस् केला नाही, तर पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. उत्पादन मध्ये मोठ्या संख्येने घट निर्माण होते.
  पाने पोखरणारी अळी
  पाने खाणारी अळी
  साल खाणारी अळी 
   नाग अळी
   रस शोषण करणारी किडी
   सिट्रस सायला
   माईट्स
   रस शोषणारा पतंग (yudosima ) 
   फळमाशी ( Bactocera Doralisis)
    खोड पोखरणारी अळी
◾संत्री झाडावरच बरेच काही रोग सुद्धा येतात.       त्यामुळे फळे असलेली झाड सुकतात. झाड   लवकर वाळते. बाग ची बाग लवकर बेकार   होतात.
 खैऱ्या
 मूळकूज
 डींक्या
 फळ सड
 ट्रीस्टेझा 
 फळ गळ
 तपकिरी कुज
 लॅसिओडिप्लोडिया शेंडेसुकी
 कोलेटोट्रिकम शेंडेसुकी 
 फ्रूटलेट ब्लाइट
 कोळशी
 Tristiza किंवा जलद रास 
 सायट्रस ग्रीनिंग
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.

फेसबुक पेज ला फॉलो करा.


टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.

धरतीशास्त्र जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती. जैविक शेतकरी मित्र निखिल तेटू +919529600161 / +917721881560






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या