Ad Code

Responsive Advertisement

फळ झाडांचा बहार कोणत्या पद्धतीने घ्यावा

झाडांचा ताण (अन्न पुरवठा बंद करणे)

विशिष्ट विभागाच्या हवामानाप्रमाणे फळझाडांना विशिष्ट हंगामात बहार येतो. काही फळझाडांना वर्षातून तीन हंगामांत बहार येतो; तर काही फळझाडांना वर्षातून एकाच हंगामात बहार येतो. तथापि, तिन्ही हंगामांत बहार न घेता कोणत्याही एका हंगामात बहार धरणे खूप उपयुक्त असते. फळझाडांना नैसर्गिक विश्रांती मिळाली नाही तर कृत्रिम उपाय करून विश्रांती द्यावी लागते. युरोप, अमेरिकेत हिवाळ्यात बर्फ पडतो. बहुतेक झाडांची पानगळ होऊन नुसत्या फांद्या दिसतात. ह्या काळात ही झाडे सुप्तावस्थेत असतात. झाडांवर नवीन पालवी फुटते. झाडांची वाढ पुन्हा सुरू होते.फळझाडांची वाढ नियंत्रित न ठेवल्यास झाडांवर वर्षभर निरनिराळ्या आकाराची फळे दिसून येतात. एका हंगामातील फळे झाडांवर असल्यास दुसऱ्या हंगामाचा बहार कमी प्रमाणात येतो. तसेच फुले आणि फळे वर्षभर आल्याने झाडांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. त्याशिवाय किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. वर्षभर फळझाडांची राखण करावी लागते. फळांची तोडणी करावी लागते. उत्पादनखर्च वाढतो.

बहार धरण्याचे शास्त्र
      विशिष्ट हंगामात बागायती फळझाडांचे पाणी बंद केल्यास त्या झाडांना 'पाण्याचा ताण' बसतो. इंग्रजीत ह्यास 'स्ट्रेस' असे म्हणतात. ताणाच्या किंवा पाणी बंद केलेल्या काळात झाडाची वाढ मंदावते आणि झाडाच्या फांद्यांत अन्नाचा भरपूर साठा होतो. ह्या अन्नाचा उपयोग नवती (पालवी) फुटणे, त्यावर बहार धरणे, फळधारणा होणे आणि फळांच्या जोपासनेसाठी होतो.

 बहार केव्हा घ्यावा ?
फळांचे उत्पादन घेण्यास सुरुवात करण्यापूर्वी फळझाडांची पालेदार वाढ उत्तम आणि जोमदार झाली पाहिजे. बागेत कलमांची किंवा रोपांची लावणी केल्यापासून पहिल्या तीन वर्षांत झाडांची आवश्यक तेवढी वाढ होते. ह्या काळात जर झाडांवर फुले आणि फळे वाढू दिली तर झाडे कमजोर बनतात. म्हणून पहिली तीन वर्षे झाडावरील फुले व फळे खुडून टाकावीत.

महाराष्ट्राच्या हवामानात डाळिंब, पेरू, संत्री, मोसंबी, कागदी लिंबू ह्या फळझाडांना नैसर्गिकपणे वर्षातून तीन वेळा नवीन पालवी फुटते आणि बहार येतो. मृग नक्षत्रात म्हणजेच जून-जुलै महिन्यात येणाऱ्या बहाराला 'मृग बहार' असे म्हणतात. हस्त नक्षत्रात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यामध्ये येणाऱ्या बहाराला 'हस्त बहार' असे म्हणतात. आंब्याच्या झाडांना ज्या वेळी मोहोर येतो, त्या वेळी म्हणजेच जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये 
येणाऱ्या बहाराला ' आंबिया
 बहार' असे म्हणतात.
अशा प्रकारे विशिष्ट फळझाडांना तीन हंगापरंतु ह्यापैकी कोणताही एकच बहार घेणे लाभदायक असते. बहार घेण्यासाठी त्या झाडांना विश्रांतीची आवश्यकता असते. नैसर्गिकपणे ही विश्रांती मिळत नसल्यास पाण्याचा ताण देऊन झाडांना विश्रांती घेण्यास भाग पाडावे लागते. थोडक्यात म्हणजे भरपूर फळांच्या उत्पादनासाठी कोणत्याही एका हंगामात झाडांना विश्रांती देऊन वर्षातून एकच बहार घेणे फायदेशीर असते.
कोणताही बहार घेण्याचे ठरविण्यापूर्वी फळबागेची स्थानिक परिस्थिती, पाणीपुरवठ्याची सोय, मजुरांची उपलब्धता, किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव, फळांची प्रत, बाजारातील फळांची मागणी आणि बाजारभाव ह्या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून त्याप्रमाणे कोणता बहार घ्यायचे ते निश्चित करावे लागते.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.

फेसबुक पेज ला फॉलो करा.


टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.

धरतीशास्त्र जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती. जैविक शेतकरी मित्र निखिल तेटू +919529600161 / +917721881560

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या