Ad Code

Responsive Advertisement

आंबा उत्पादन विषयक माहिती

◾ आंबा 
          सर्व प्रकारच्या फळांमध्ये आंब्याला फळांचा राजा असे म्हणतात. आंबा हे गरीब आणि श्रीमंतांचे सारखेच आवडते फळ आहे. आंब्याच्या सर्व जातींमध्ये पोषक अन्नद्रव्यांच्या दृष्टीने हापूस आणि दशेरी ह्या जाती सर्वश्रेष्ठ आहेत. पिकलेल्या हापूस आंब्यामध्ये 'अ' जीवनसत्त्वाचे प्रमाण 4,000 ते 13,000 आंतरराष्ट्रीय युनिट्स् इतके असून 100 ग्रॅम गरामध्ये 50 ते 85 मिलिग्रॅम 'क' जीवनसत्त्व असते. हापूस आंब्याची परदेशात निर्यात केली जाते.
        कच्च्या तसेच पिकलेल्या आंब्यापासून अनेक टिकाऊ पदार्थ तयार करतात. कच्च्या आंब्याच्या फोडी वाळवून ठेवतात आणि आंबट चवीसाठी त्या भाजीत घालतात. कच्च्या आंब्याचे पन्हे, मुरांबा, लोणचे, आमचूर, आंबा पावडर, चटणी, पंचामृत तयार करतात. पिकलेल्या हापूस आंब्याचा रस व फोडी डबाबंद करून परदेशात निर्यात करतात. पिकलेल्या आंब्यापासून सरबत, स्क्वॅश, सिरप, जॅम, आंबापोळी, मँगोबार, श्रीखंड, आंबा बर्फी, का इत्यादी पदार्थ तयार करता येतात.
🔹आंब्याच्या उन्नत जाती
▪️ हापूस 
▪️ पायरी 
▪️गोवा मानकुर
▪️केसर
▪️ तोतापुरी 
▪️नीलम
▪️ बेनिशान 
▪️ दशेरी 
▪️ लंगडा 
▪️नागीण
▪️निरंजन
🔹आंब्याच्या संकरीत जाती
▪️रत्ना
▪️सिंधू
▪️मल्लिका
▪️ आम्रपाली 
▪️नीलगोवा
▪️अर्का अरूणा 
▪️ अर्का पूनित
▪️ अर्का अनमोल
🔹आंब्यावरील प्रमुख किडी
▪️तुडतुडे
▪️ खोडकिडा 
▪️ फळमाशी
▪️ मिजमाशी
▪️पिठ्या ढेकूण
▪️पाने खाणाऱ्या अळ्या 
▪️ फुलकिडे 
▪️शेंडे पोखरणारी अळी
▪️ साल खाणारी अळी
▪️ कोयितील कीड
🔹आंब्यावरील प्रमुख रोग
▪️करपा
▪️भुरी रोग
▪️ मर रोग
▪️ मूळ कुजव्या
आंब्याच्या कलमांना दुसऱ्या वर्षापासून मोहोर येण्यास सुरुवात होते. मात्र हा मोहोर धरू नये (खुडून टाकावा). कारण सुरुवातीच्या 3-4 वर्षांच्या काळात झाडांची चांगल्या प्रकारे शाखीय वाढ होणे आवश्यक असते. चौथ्या वर्षानंतर नियमितपणे फळे घेण्यास सुरुवात करावी. लागवडीनंतर दहाव्या वर्षापासून पुढे फळांचे अधिक उत्पादन मिळू लागते. आंब्याचे उत्पादन जातीनुसार झाडाचे वय, हवामान आणि झाडाची निगा कितपत चांगली राखली आहे यांवर अवलंबून राहते. कलम केलेल्या आंब्याच्या एका झाडास 6 व्या वर्षी सुमारे 50-75 फळे मिळतात. तर 10 व्या वर्षी 300 ते 400 फळे मिळू शकतात. पूर्ण वाढ झालेल्या आंब्याच्या झाडास हंगाम अनुकूल असताना झाडाची निगा चांगली राखली तर 3,000 पर्यंतही फळे मिळू शकतात.
  सर्व फळबाग विषयक प्रशिक्षण दिले जातात. तसेच जैविक शेती विषयक संपूर्ण पिकांचे मार्गदर्शन दिले जातात. होलसेल दरात आमच्या कडे चिकट सापळे, फळमाशी ट्रॅप, सोलर लाईट ट्रॅप, कामगंध सापळे, जैविक निविष्ठा, खते विक्री सुरू आहे. घरपोच पार्सल पाठविले जातात.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.

फेसबुक पेज ला फॉलो करा.


टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.

धरतीशास्त्र जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती. जैविक शेतकरी मित्र निखिल तेटू +919529600161 / +917721881560


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या