Ad Code

Responsive Advertisement

निंबोळी पावडर शेतीसाठी दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य. फायदे जाणून घ्याल तर नेहमी निंबोळी पावडर शेतीसाठी वापर कराल

निंबोळी पावडर शेतीसाठी नेहमी उपयोगी
 

▪️निंबोळी पावडरमधील 
घटक प्रमाण :- 
अ‍ॅझॅडिरॅक्टीन ७०० ppm 
तेलाचे प्रमाण ४.० – ५.० %
सेंद्रिय कर्ब ३५ – ४० %
नत्र ४.० – ५.० %
स्फुरद १.० – २.० %
पालाश १.० – २.५ %
प्रथिने ३० - ३५ %
या शिवाय ह्यामध्ये पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी दुय्यम तसेच सुक्ष्म अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत.
▪️निंबोळी पावडर मध्ये ॲझाडीरेक्टीन घटक असल्यामुळे मातीमधील हुमणी, खोडकीड, कटवर्म, वाळवी, विषाणु, बुरशी या शत्रूकिडी रोगांचा नायनाट करते.
▪️निंबोळी पावडर हे संपूर्ण नैसर्गिक स्वरुपामधील असल्याने जमिनीमधील कोणत्याही उपयुक्त जिवाणुंना हानी पोहचत नाही. तसेच कोणत्याही जीवाणूंना बाधा होत नाही. नैसर्गिक असल्याने मानवाला सुद्धा धोका नाहीत.
▪️निंबोळी पावडर हे रासायनिक खतांमध्ये मिसळून वापरल्याने रासायनिक खतांमधील नत्र टिकून राहते. तसेच झाडांना अन्न नियमित पणे पुरवठा होत असते.
▪️निंबोळी पावडर पिकांच्या सूक्ष्मकृमींच्या, सुत्रकृमींच्या प्रादुर्भावापासून १००% संरक्षण करते.
▪️निंबोळी पावडर मर रोगाच्या प्रमाणामध्ये घट निर्माण करते. जमिनी मधील हानिकारक बुरशी नियंत्रण करते.
▪️निंबोळी पावडरच्या वापरामुळे जमिनीमधील मातीचे कण एकमेकांना चिटकत नाहीत. यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते. भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळत असल्याने माती सुपीक बनते.
▪️निंबोळी पावडर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते. तसेच मातीमधील ह्युमसचे प्रमाण वाढवून पिकांच्या पांढऱ्या मुळांची वाढ होण्यास मदत होते. नैसर्गिक पद्धतीने सेंद्रिय कार्बन मिळण्यास मदत होते.
▪️निंबोळी पावडरच्या वापरामुळे जमिनीचा सामू समांतर राखला जातो. परिणामी ऊत्पादन व गुणवत्ता वाढते. त्यामुळे येणारे रोग नियंत्रण होतात.
▪️आमच्याकडे होलसेल आणि चिल्लर दरात निम पावडर, निम अर्क, निम तैल विक्री केले  जातात. तसेच घरपोच पार्सल पाठविले जातील.
प्रती किलो निंबोळी पावडर १८/- रुपये किलो,
प्रती लिटर निम अर्क २००/- रुपये लिटर,
प्रती लिटर निम तैल ७५०/- रुपये लिटर. शेतकरी मित्र बुकिंग करत आहे. आपण सुद्धा नक्की बुकिंग करा. 9529600161.
▪️वनस्पतीजन्य संसाधनामध्ये कडूनिंबाच्या झाडापासून मिळणा-या पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर जैविक शेतीमध्ये होतो. यात ही कडूनिंबाच्या बियांपासून तयार होणारी निंबोळी पावडर मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये वापरली जाते.
▪️मे-जून महिन्यात परिपक्व झालेल्या शुध्द निंबॊळ्या गोळा करुन व्यवस्थित वाळविले जातात. त्यापासुन कोल्ड प्रेस्ड पध्दतीने निंबोळी पावडर तयार केली जाते. 
▪️या निंबोळी पावडर मध्ये अ‍ॅझाडीरेक्टिन, निम्बीन, सलानिन, निमोनाईड हे घटक १०० ते १००० ppm पर्यंत तसेच सिलिका १५% सह इतर उपयोगी तत्व आलेले असतात. यात ५ ते ७ टक्के तेल असते. त्यामुळे कीटकनाशक गुणधर्मासह इतर अन्नद्रव्ये शेतात मिसळले जातात. यात पूर्ण नत्र ३- ५%, पूर्ण स्फ़ुरद १%, पूर्ण पालाश २% या प्रमाणात असून पिकांच्या मुळांना हळुहळू उपलब्ध होतो. 
▪️कडूनिंबातील विविध घटक जमिनीमध्ये गेल्यानंतर मुळांद्वारे शोषले जातात. या पद्धतीमुळे जमीनीतील वावरणा-या किडींचे तसेच पिकांवरील रसशोषक किडींचे देखील नियंत्रण होते.
▪️तसेच भाजीपाला पिकांवर तसेच डाळींब पिकांच्या मुळांवर गाठी करणा-या हानिकारक सुत्रकृमींचादेखील बंदोबस्त चांगल्या प्रकारे होतो. पिकांमध्ये निंबोळी पावडर वापरल्यानंतर ३ ते ६ आठवड्यात त्याचे फायदे दिसू लागतात.
▪️निंबोळी पावडर मधील घटक जमिनीत हळूहळू काम करत असल्यामुळे सहा महिन्यांपर्यंत याचा परिणाम दिसून येतो.
▪️निंबोळी पावडर शेणखत तसेच इतर सेंद्रिय खतांसोबत वापरण्यास अतिशय सुलभ आहे. रासायनिक खतांच्या बेसल डोसमध्ये देखील वापरता येते. निंबोळी पेंड मुळांच्या कार्यक्षेत्रात व्यवस्थित पोहचेल अशा पध्दतीने टाकावी. 
▪️फळझाडांमध्ये मुळांच्या जवळ ड्रिपरजवळ खड्डा घेउन त्यात निंबोळी पावडर टाकून मातीने बुजवुन घ्यावी. शेत तयार करताना देखील निंबोळी पावडरचा वापर करता येईल किंवा उभ्या पिकात निंबोळी पावडर हाताने फेकून पसरवुन देता येते. 
▪️भाजीपाला पिकामध्ये आणि बेडमध्ये बेसल डोस टाकताना निंबोळी पावडर वापर करता येतो. जैविक निविष्ठा -जैविक खते निंबोळी पावडर सोबत सुलभरित्या वापरता येतात. 
▪️निंबोळी पावडर वापरण्याचे प्रमाण :- 
फळझाड :- १ किलो पासुन ५ किलो प्रति झाड प्रति हंगाम 
भाजीपाला पिके :- बेसल डोसमध्ये ५०० ते १००० किलो प्रति एकरी 
केळी :- २५० ग्राम प्रति झाड २ महिन्यांच्या अंतराने
 ऊस लागवडीच्या वॆळेस ५०० किलो ३ महिन्यांनतर ५०० ते १००० किलो
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.

फेसबुक पेज ला फॉलो करा.


टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती. जैविक शेती मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या