Ad Code

Responsive Advertisement

बोरी आणि बाभळीचे वृक्ष शेतात असल्याने शेती कामात होणारे फायदे.जैवविविधता टिकवणे फार महत्वाचे आहे.

बोरी आणि बाभळीचे वृक्ष शेतात असल्याने शेती कामात होणारे फायदे.
वृक्षाच्या अंगावर काटे आहेत. ते संरक्षण करणेसाठी असे आपल्याला वाटत असेल, मात्र अजूनही बरेच काही यात लपले आहे. काटे अर्थात जल नियोजन, आपण प्राचीन इतिहास किंवा अध्यात्म पाहता बरेच काही आपल्याला आपल्या बाबा वडील धारे बाबा कडून समजतात. काटेरी वनामध्ये अगदी १० वर्षे सुद्धा सातत्याने दुष्काळ या बोरी बाभळीनि अनुभवला आहे. मग पाण्याचे नियोजन करायचे असल्यास हे बोरी वृक्षाचे काटे मदत करतात. काटे आतून पोकळ असतात.हे काटे रात्री आणि पहाटेच्यावेळी पडणारे दवबिंदू साठवून सर्व फांद्यांना पुरवितात. त्यामुळे कसल्याही दुष्काळाचा सामना सहजपणे बोरी बाभळी करतात. बोरी ला बहर येतो त्यावेळी तर तिच्या भोवती उभे राहण्याची हिम्मत होणार नाही, कारण एक उग्र असा ऍसिड सारखा द्रव्य वास त्या फुलाभोवती हे झाड निर्माण करते.अगदी एक रसायन तयार करून आपला मोहर सांभाळतात. बाभळीची फुले खूप सुंदर दिसतात.बाभळीची फुले मधमाशी यांना आकर्षित करतात.यावर अनेक मधमाश्या आपला मोर्चा वळवितात. बोरीच्या मोहरावर सुद्धा अनेक मधमाश्या व छोटे कीटक आपला मोर्चा वळवितात. बोरी बाभळी वर मधमाश्या मोठ्या प्रमाणात पोळी बांधतात.कारण तिथे त्यांना सर्वात जास्त संरक्षण मिळते. हे अतिशय महत्वाचे आहे. शेतीच्या दृष्टीने शेतीच्या बांधावर बोरी बाभळी असणे आज उद्या आणि येणाऱ्या काळात नितांत गरजेचे आहे. हि बाब जर वेळीच आपल्या सर्वांच्या लक्षात येणे गरजेचे आहे. अनेकजण बांधावरील बोरी बाभळी तोडून टाकतात आणि परदेशी झाड लावतात. किंवा पूर्णपणे झाडे तोडून टाकतात. मात्र असे करणे म्हणजे शेती कामात मूर्खपणाचा कळस चढविने एवढेच मी म्हणेल. कारण गवताळ भागातील जीवसृष्टीच्या सुरुवातीपासून बोर बाभूळ हि झाड अत्यंत महत्वाची आहेत, हे विसरून चालणार नाही.

 डाळींब पिक करणार्यांनी तर शेतीच्या परिसरात स्वतच्या प्रति १ एकरात बांधावर अगदी १० बोरी व १० बाभळी झाडे लावली खूप फायद्याचे राहतील. आपल्याकडील बारीक छोटी मधमाश्यांची पोळी हि नेहमी अश्या काटेरी झाडांवर पोळी करतात. म्हणून नैसर्गिक झाडे ठेवणे आवश्यक आहे.   
पक्षी मित्रासाठी तर हि बोर व बाभूळ झाड म्हणजे बहुगुणीच. अनेक पक्षी घरटी बांधण्यासाठी बोरी बाभळीचा मोठ्या प्रमाणात उपयोग करतात.नेहमी सतत काम करणारा सुगरण पक्षी तर आपला खोपा अश्या झाडांवर बांधायला नेहमीच अग्रेसर असते. सुगरण पक्ष्याला तर बोरी बाभळीची झाडे खूप आवडतात, मात्र माणसाला नाही, बर का.समजत नाही मला तर. सुगरण पक्षी सर्वाना आवडते मग बाभळ का नको.  
आपल्या शेतीच्या कडेने पक्षी थांबे करणे प्रत्येक शेतकरी मित्रांना आवश्यक आहे. अन्यथा कीडनियंत्रणासाठी फक्त विषारी रासायनिक औषध वापरली जातील आणि माणूस ही विषारी होऊन मृत्यू कडे वाटचाल करेल.पक्षी सुद्धा मरण पावतील.जमीन सुद्धा बंजर होतील.आपल पर्यावरण प्रेम म्हणजे फक्त नाटक असेल ,फोटो साठी दिखावा असेल.व्हिडिओ साठी देखावा असेल तर आजचा कोरोना आजार तरी कुठ वाईट आहे मग. कारण जगात अधिवास नष्ट झाले कि तिथले जीव नष्ट होतात, आणि जिथ जैवविविधता जास्त असते तिथ रोगराई कमी असते. हे आता आपल्याला शिकायला हवे आहे. आज भूतान सारख्या देश्यात फक्त ५ लोकांना कोरोना झालेला असून, हा आजार तिथ जास्त पसरलेला नाही, कारण निसर्ग अर्थात जैवविविधता सर्व जगात जास्त आहे.
आपल्याला माहिती असलेले कोतवाल, खाटिक, पावश्या, सातभाई, सूर्यपक्षी, मुनिया, चिमण्या असे नानविध पक्षी या बोरी बाभळी वर घरटी बांधतात. हि घरटी लांबून पाहताना खूप आंनद वाटतो.बाभळीच्या झाडावर खारुताई घरटे करीत असते. शिवाय तिला राहनेसाठी बाभळी आवश्यक आहेत. शिकारी पक्षाकडून तिला बाभळी मुळे संरक्षण मिळत असते.
आणि कोल्हा व खोकड, बोर आणि बाभूळ झाडाखाली विश्राती घेत असतो. शिवाय बोरही मोठ्या प्रमाणात खात असतो. कोल्हा सुद्धा बोरीची झाड लावायला मदत करीत असतो. 
सश्याच रिंगण तर बोरीच्या झाडाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, कारण गवताळ भागात ओढ्यालगत पसरी बोराची झाड असतात. अहो उंची फक्त ३ फुट एवढीच असते. ससा या बोरीच्या कडेने वाढणार्या गवतात आपले रिंगण तयार करतात आणि पिल्लांना जन्म देतात. काहीजण तर आजही म्हणतात भारतीय ससा बिळात राहतो. पण लक्षात घ्या कि, भारतीय ससा बिळात राहत नाही. ती बहुतांश बिळे घोरपडीने केलेली असतात. त्यामुळे गवताळ भागात जलसंधारण होते.

भविष्यात आपली पिढी टिकावी वाटत असेल तर स्थानिक पातळीवर जैवविविधता वाचली पाहिजे म्हणजेच दक्खनच्या पठारावर बोरी बाभळी वाचल्या पाहिजेत, नाहीतर विनाशाकडे वाटचाल सुरूच आहे आपली, फक्त कोरोना ने विचार करायला संधी दिली आहे एवढंच.ना.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.

टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या