Ad Code

Responsive Advertisement

कापूस पीक व्यवस्थापन.पाते गळ,बोंड सड, आकस्मिक मर रोग, येणारे इतर किडी आणि रोग.

कापुस पीक व्यवस्थापन
      कापूस पिक लागवड करून आता ७५-८० दिवस पूर्ण होत आहे, अशा परिस्थितीत कापूस पिक बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे, परंतु सतत पाऊस सुरू आहे, काही भागा मद्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस पडला आहे त्यामुळे कापूस पिक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, अशा परिस्थितीत पाते गळ, बोंड गळ तसेच काही ठिकाणी आकस्मिक मर होत आहे आणि या नंतरच्या काळात पीक लाल होणे ही एक महत्त्वाची समस्या आहे, या सर्व गोष्टींमुळे शेतकरी अडचणीत आहेत बरेच ठिकाणी कापूस पिकाचे नुकसान झालेले दिसून येत आहे.
◾पाते - बोंडे गळ करणे व उपाय :- 
कापूस पिकामध्ये पाते गळ व बोंड गळ ही अतिशय महत्वाची समस्या आहे, त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते .
▪️ किडींचा प्रादुर्भाव
▪️ विपरीत - हवामान ( जास्त प्रमाणात झालेला पाऊस तसेच तापमानातील बदल )
▪️ अतोनात व अवास्थव झालेली वाढ
 ▪️नत्रयुक्त खतांचा जास्त प्रमाणात वापर 
▪️ हार्मोन्स चे कमी अधिक प्रमाण ( hormanal changes )
▪️अन्नद्रव्ये कमतरता व अन्नासाठी होणारी स्पर्धा असे अनेक कारणे यासाठी कारणीभूत असतात.
◾पाते - बोंडे गळ उपाय :-
काहीवेळा किडींचा प्रादुर्भाव झाल्यास पाते व बोंड गळ होते त्यासाठी शिफारशीत कीटकनाशक फवारणी करणे आवश्यक आहे.
▪️ पिकाची वाढ जास्त झाली असेल तर शेंडा खुडून घेणे आवश्यक आहे: पीक ३.५-४ फूट झाले की लगेच शेंडे खुडून घेणे त्यामुळे पाते गळ व बोंड गळ थांबते. तसेच गळ फांदीचा सुध्दा शेंडा खुडून घ्यावा
▪️ नत्रयुक्त खतांचा वापर कमी करणे तसेच ०:५२:३४ या पाण्यात विरघळणाऱ्या खताचा वापर करणे 
▪️ 20-50 PPM NAA ( Planofix ) ची ३-५ ml प्रती पंप याप्रमाणे फवारणी करावी
▪️ अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे सूक्ष्म अन्नद्रव्ये व NPK यांचा योग्य वापर करणे @ ३० प्रती पंप सूक्ष्म अन्नद्रव्ये वापर करावा 
▪️ २ टक्के DAP ची फवारणी आपण करू शकतो तसेच Gebrelic acid चा सुध्दा आपण योग्य प्रमाणात वापर केल्यास पाते व बोंड गळ थांबू शकते.
◾आकस्मिक मर :- 
सतत होत असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्यास आकस्मिक मर झालेली दिसून येत, त्यामध्ये झाड अचानक सुकते म्हणजे वाळते, पण खोड व मूळ कुजत नाही, झाड मात्र वाळलेले दिसते तसेच बोंडे गळू लागतात असे याची लक्षणे आहेत,
 ◾कारणे :- 
सतत पाऊस झाला आणि पाणी शेतात साचून राहिल्यास हा रोग दिसून येतो तसेच तापमानातील बदल
 ◾उपाय :-
१.५ टक्के युरिया व २ टक्के DAP चे द्रावण करून मर झालेल्या झाडाच्या बुडाशी टाकावे तसेच Copper Oxychloride ३०-४० gm प्रती १०-१५ लिटर पाण्यात मिसळून त्याची आळवणी करावी 
▪️ शेतात पाणी साचून राहणार नाही याची विशेष काळजी घ्यावी
▪️ पुन्हा ८-१० दिवसांनी २ टक्के युरिया व DAP यांची आळवणी करावी ( १५०-२०० ml पाणी प्रती झाड याप्रमाणे ).
◾लाल्या रोग -विकृती :-
     लक्षणे व कारणे 
अमेरिकन Bt कापसामध्ये जास्त प्रमाणात अढळून येते, नत्राच्या कमतरते मुळे सुरवातीला पाने पिवळी पडतात व नंतर लाल होतात, 
▪️हलकी जमीन असेल तर अन्नद्रव्ये उपलब्ध होत नाहीत व पाने पिवळी पडून लाल होतात, 
▪️ बोंडे लागण्याच्या अवस्थेत कमाल व किमान तापमान यात कमी फरक असल्यास, बोंडे लागणे व परिपक्व होणे लवकर होते त्यामुळे अन्नद्रव्ये त्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत व त्यामुळे अन्नद्रव्ये कमतरता जाणवते व झाड लाल होते व वाढ खुंटते,
▪️ शिफाशींनुसार खत मात्र न दिल्यास व अन्नद्रव्य व्यवस्थापन न केल्यास कपाशी लाल होते
▪️ रस शोषक किडींच्या जास्त प्रमाणात झालेल्या प्रादुर्भावामुळे सुध्दा कपाशीचे पाने लाल होतात
▪️ पाणी जास्त व कमी झाल्यास सुध्दा कपाशी लाल होते.

◾ उपाय :-
▪️ एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे # खत देणे # सूक्ष्म अन्नद्रव्ये कमतरता असल्यास ३० gm प्रती पंप सूक्ष्म अन्नद्रव्ये याप्रमाणे फवारणी करावी 
▪️ दुसरा डोस देताना magnesium sulfate चा एकरी १० किलो याप्रमाणे खातासोबत वापर करणे
▪️ शेतात पाणी साचून राहिल्यास पाणी काढून देणे व गरज असल्यास जमीन उलनार / फाटणार नाही म्हणून पाणी देणे
▪️ वाढीच्या अवस्थेत २ टक्के युरिया व त्यानंतर बोंडे लागण्याच्या अवस्थेत २ टक्के DAP ची फवारणी करावी 
▪️ तसेच magnesium sulfate ची १ टक्के याप्रमाणे फवारणी करावी तसेच आपण Amino acid चा सुद्धा वापर करू शकता तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये ३० gm प्रती पंप याप्रमाणे फवारणी करावी
▪️ रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी अंतर प्रवाही कीटकनाशक फवारणी करावी तसेच चिकट पिवळे सापळे लावावे ( एकरी २०-२५ ).

 ◾बोंड सड :-
जास्त प्रमाणात पाऊस झाला की सुरवातीच्या काळात लागलेली बोंडे सड होताना दिसते, त्यासाठी पिकात हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी तसेच असे दिसून आल्यास Copper Oxychloride ३० gm प्रती पंप याप्रमाणे फवारणी करावी
याप्रमाणे सद्यस्थितीला कापूस पिक व्यवस्थापन करणे आवश्यक, वरीप्रमाणेच कोणतेही लक्षणे दिसल्यास लगेच उपययोजना कराव्यात जेणेकरून नुकसान होणार नाही.
धन्यवाद...
Dr Anant Ingle
Ph.D. Genetics and Plant Breeding MPKV Rahuri
Vidarbha Agriculture Development Foundation
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.


टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या