निम तैल शेतीसाठी खूप फायद्याचे.कारण जैविक शेतीमध्ये तैल विघटक वापर करणे म्हणजे शेतातील बुरशी तसेच किडी समस्या नियंत्रण करणे.तसेच पिकांना संरक्षण देणे होय.निम तैल वापर केल्याने पिकांना नवीन ऊर्जा प्रदान होतात. निम तैल कोणत्या किडी वर काम करतात.निम तैल संजीवनी म्हणून कसं काम करत आहे.शेतकरी मित्र निम तैल वापरण्यासाठी का जास्त उत्साही आहे. ▪️निम तैल अंडी घालण्यास प्रतिबंधात्मक कार्य करतात खूप चांगले. कडुनिंबापासून तयार करण्यात आलेले निम तैल शेतीसाठी खूप आवश्यक आहे.निम तैल शत्रू किडीस अंडी घालण्यास प्रतिबंधक, अंडीनाशक, कीडरोधक, दुर्गंध, किडीस खाद्यप्रतिबंधक, किड वाढ रोधक व किटकनाशक या विविध मार्गाने परिमाण होतो. पिकातील 300-400 प्रजाती नियंत्रणासाठी प्रभावी ठरतो.
▪️कडुनिंब तैला मुळे पिकावरील विविध किडीच्या मादी अंडी घालण्यापासून परावृत्त होतात. उदा. घाटे अळी (Helicoverpa Armigara) तंबाखूवरील पाने खाणारी अळी (Spodoptera Litura) एरंडीवरील उंट अळी (Castor Semilooper) पांढरी माशी,(pectina) गुलाबी बोंड अळी अंडी घालण्यास प्रतिबंध ठरते.
▪️या निम तैल मुळे किडींची अंडी उबवण्यामध्ये अडचणी येतात.किडी मध्ये मिलन होत नाही.पिकांना हिरवेगार ठेवतात.
▪️ या प्रक्रियेत अंड्याच्या आतील म्हणजेच गर्भाशयातील ढवळाढवळीमुळे प्रभावी नियंत्रण करते. उदा. तंबाखूवरील पाने खाणारी अळी (Spodoptera Litura) व घाटे अळीवर कडुनिंब तैल चा चांगला अंडीनाशक म्हणून कार्य करतो.
▪️ कीडरोधक दुर्गंध कडुनिंबापासून किड तीव्र गंधामुळे विविध किडींना दूर ठेवणे शक्य होते.उदा. भुंगा, पांढरी माशी, घरमाशी, पिसू, जपानी किटक, लष्करी अळी, मिलीबग इत्यादी.
▪️ कडुनिंबाच्या बियांपासून तसेच तेलापासून तयार केलेला अर्क पिकांवर फवारणीसाठी वापरला असता विविध प्रकारच्या किडीस खाद्यप्रतिबंध करतो. उदा. पांढरी माशी, घरमाशी, मिलीबग, लष्करी अळी, तुडतुडे, फुलकिडे, उंटअळी इत्यादी,मावा,thrips,mites.
▪️ कडुनिंबातील अझाडिराक्टीन हा घटक किडीची वाढ थांबवतो. तसेच कात टाकण्यास प्रतिबंध करतो. त्यामुळे कीड गुदमरून मरण पावते. पांढरी माशी, घरमाशी, पिस बटाट्यावरील कोलोरॅडोकिड, लष्करी अळी इत्यादी प्रकारच्या किडींची वाढ थांबते.
▪️या व्यतिरिक्त कडुनिंबाच्या बियातील गरामध्ये मेथेनॉलिक या घटकामुळे पाने खाणारी अळीची वाढ थांबते.
▪️कडुनिंबापासूनचे निम तैल हे कीडनाशके ही कीटकांवर बहुआयामी आंतरप्रवाही किटकनाशकाप्रमाणे कार्य करतात.
▪️ मुख्यत्वे कडुनिंबाची पाने, फळे व झाडाच्या सालीपासून उत्तम किडनियंत्रक तयार करता येते. निंबोळी पासून किड नियंत्रण करणे हे त्याच्या तीव्रता व मात्रेची वेळ यावर अवलंबून असते.
▪️मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, ठिपक्याची बोंडअळी, गुलाबी बोंडअळी, हिरवी बोंडअळी, मुंगी प्रजाती, भुंगा प्रजाती, पाने गुंडाळणारी अळी, उंटअळी, तांबडी केसाळ अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, हिरवे ढेकूण, फळमाशी, ज्वारी व मक्यावरील खोडकिडा, टोमॅटोवरील सूत्रकृमी, कोळी, लाल कोळी, नाकतोडा, लाल ढेकूण, शेंडे व पाने पोखरणारी अळी, लष्करी अळी नियंत्रित होते.
निंबोळी तैल शेतीसाठी वापरल्याने शेतातील पिकांना होणारे फायदे :
१. निर्मिती खर्च अत्यल्प असतो.
२. नैसर्गिक असल्याने प्रदूषण होत नाही.
३. घातक किडींना प्रतिबंध, नियंत्रण करत असले तरी नैसर्गिक शत्रू, मित्रकीटकांसाठी फारसे हानिकारक ठरत नाही.
४. रासायनिक कीटकनाशकांमुळे होणारे दुष्परिणाम टाळून पर्यावरणाचा समतोल राखता येईल.
५. निंबोळी तैल/पेंड वापरल्यामुळे जमिनीतील सूत्रकृमी, मुळे कुरतडणाऱ्या अळ्या नियंत्रित होतात.
Special' Offers निम तैल (Nim oil ) 10000 ppm होलसेल दरात विक्री सुरू आहे. कृषी केंद्र तसेच शेतकरी मित्रांना लागल्यास नक्की संपर्क करा.9529600161. भरपूर शेतकरी गट,शेतकरी आत्मा गट,FPO,शेतकरी गट बुकिंग करत आहे.विक्री सुद्धा सुरू झालेली आहे. Special 'Offers Nim Oil is on sale at wholesale prices.Nim Oil are also on sale.Booking has started.Home Delivery Parcel Service Available Now.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या यट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.
टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560
0 टिप्पण्या
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र
कु- हा , अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू 9529600161