Ad Code

Responsive Advertisement

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे नावाजलेले प्रॉडक्ट म्हणजे बायोमिक्स शेतकरी मित्रांसाठी जणू चर्चेचा विषयच

पिक संरक्षण व अन्नद्रव्याच्या उपलब्धतेसाठी जैविक मिश्रण म्हणजे बायोमिक्स
◾14 जिवाणूंचे एकत्र मिश्रण असलेले वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ , 
परभणी चे बायोमिक्स शेतकरी मित्रासाठी चर्चेचा विषयच
◾बायोमिक्स काय आहे ? 
बायोमिक्स हे एक उपयुक्त जैविकांचे मिश्रण असून ते निरनिराळ्या बुरशी आणि जीवाणूंपासून बनविले गेले आहे.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी चे डॉ . कल्याण आपेट सर विभागप्रमुख वनस्पती रोगशास्त्र विभाग यांनी बनविले आहेत.
यामध्ये प्रामुख्याने 14 जिवाणूंचे मिश्रण असल्याने फारच शेतीला उपयोगी आहे.आणि जमिनीस उपयुक्त सूक्ष्मजीव असल्याने त्या जिवाणूंचे कार्य वेगवेगळे आहे.या एकच जैविक मिश्रण बायोमिक्स मध्ये किड व रोग नियंत्रण करण्यासाठी जिवाणू आहेत. पिकास अन्नद्रव्याची उपलब्धता आहे. एकूण उत्पादन व उत्पादनाचा दर्जा यासाठी फायदेशीर आहे . हे मिश्रण वनस्पती रोगशास्त्र विभाग व विद्यापीठाच्या काही संशोधन केंद्रांवर भुकटी व विद्राव्य स्वरुपात उपलब्ध आहे .
◾बायोमिक्स निर्मितीची पार्श्वभूमी :- 
 सध्याच्या बायोमिक्स निर्मितीपूर्वी वनस्पती रोगशास्त्र विभागाच्याच डॉ . व्ही . टी . जाधव सर यांनी तयार केलेले ' बायोमिक्स ' नावाचेच जैविक मिश्रण उपलब्ध होते. यामध्ये 4-5 उपयुक्त जिवाणूंचे मिश्रण होते.जे खासकरून मोसंबी संत्रा साठी डिंक्या आणि मर रोगासाठी बनवले होते. २०१० साली वसमत तालुक्यातील ' कुरुंदा ' व ' गिरगाव ' गावाचे शेतकरी हळदीच्या कंदकुज व हुमणीच्या निदान आणि उपायासाठी या विभागात आले होते. 
              त्या वेळी डॉ . आपेट यांनी त्यावर उपाय म्हणून तत्कालीन उपलब्ध असलेल्या ' बायोमिक्स ' या जैविकात आणखी सुधारणा करून एक जैविक मिश्रण यासाठी दिले .या जैविक मिश्रणाच्या वापरणे हळदीच्या कंदकुज रोगावर व हुमणी किडीवर या गावांच्या शेतकऱ्यांना नियंत्रण मिळवत आहे . या जैविकाच्या वापराणे रोगनियंत्रणासोबत किडनियंत्रण , अन्नद्रव्याची उपलब्धता इ . फायदे होऊन हळद उत्पादन वाढले . त्यानंतर विद्यापीठाच्या कोणत्याही प्रसिद्धीशिवाय या जैविकाची मागणी वाढून ते शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाले .

◾▪️ बायोमिक्सचे जैविक घटक अनु घटक :- 
 1. ट्रायकोडर्मा व्हिरीडी
 2 . ट्रायकोडर्मा हर्जीयानम
 3. अस्परजिलस नायजर 
 4. सुडोमोनास फ्लुरोसन्स 
5. सुडोमोनास स्ट्राय 
6. बेव्हरिया बासियाना
7. न्यूमोरिया रेलयी
 8. मेटॅरिझियम अॅनिसोप्ली
 9. ग्लुकोनासेटोबॅक्टर
 10. सुडोमोनास लिलियन
 11. बॅसिलस सबटिलिस 
 12. व्हर्टिसिलियम लेकानी
13. पीपी एफ एम अनु घटक
 14. अझोस्पिरीलम ब्राझीलन्स
◾बायोमिक्स वापराची पद्धत व प्रमाण  :- 
 कंद प्रक्रिया : २०० ग्राम / मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून द्रावण करावे व लागवडीसाठी निवडलेले कंद या द्रावणात ३० ते ६० मिनिट बुडवून ठेवावे . नंतर ते बाहेर काढून सावलीमध्ये सुकण्यासाठी पसरून ठेवावे व लागवडीसाठी वापरावे.
▪️ बिजोत्तेजन ( Biopriming ) : १०० लि . पाण्यात २ किलो / लिटर बायोमिक्स मिसळून द्रावण तयार करावे . या द्रावणात बेणे रात्रभर भिजत ठेऊन द्यावे व दुसऱ्या दिवशी बाहेर काढून सुकवून लागवडीसाठी वापरावे .
▪️ आळवणीसाठी ( Drenching ) : आळवणीसाठी २५ ते ५० लिटर पाण्यात ४ किलो / ४ लिटर बायोमिक्स याप्रमाणे द्रावण करावे व ते ठिबक सिंचनाद्वारे पिकास सोडावे किंवा पंपाचा नोझल काढून २०० ग्राम / मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी . 
▪️फवारणीसाठी : १०० ग्राम बायोमिक्स प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

◾ कंदवर्गीय पिकात बायोमिक्स वापराचे फायदे :- 
▪️ बेणे प्रक्रिया / कंद प्रक्रिया आणि आळवणी ( Drenching ) केली असता पिकास कंदकुज व इतर मृदाजन्य रोगांपासून संरक्षण मिळते . 
▪️ बिजोत्तेजन ( Biopriming ) केल्यास सर्वसाधारण वेळेपेक्षा हळद लवकर उगवण्यास मदत होते . 
◾बायोमिक्स फायदे.
▪️हुमणी , कंदमाशी , खोडकीड यांसारख्या किडींपासून पिकाचे संरक्षण होते .
▪️ कंदवर्गीय पिकात कंदाचा आकार , संख्या , लांबी आणि व्यास यामध्ये लक्षणीय वाढ होते .
▪️ जमिनीतील अनुपलब्ध अन्नद्रव्य उपलब्ध होण्यास मदत होते . 
▪️ पिकात पांढऱ्या मुळांची जोमदार वाढ होऊन पिकास उपलब्ध अन्न्द्रव्याचा उत्तम पुरवठा होतो . ▪️पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत बायोमिक्सची फवारणी केल्यास पानांवरील ठिपके व करपा या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो .
▪️ पिकांच्या उत्पादन , उत्पादकता व दर्जात वाढ होते . 
▪️ हळदीत वाळलेल्या हळदीचा उतारा जास्त मिळतो . 
▪️ सुत्रकृमींपासून पिकांचे संरक्षण होते .
◾ बायोमिक्स वापरताना घ्यावयाची काळजी :-  ▪️बायोमिक्सचा वापर इतर रासायनिक घटकांबरोबर करू नये . 
▪️बायोमिक्सची साठवण थंड आणि कोरड्या जागेत करावी . 
▪️बायोमिक्स वापरतेवेळी जमिनीत ओलावा असावा.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.

फेसबुक पेज ला फॉलो करा.


टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या