Ad Code

Responsive Advertisement

वॉटर ट्रॅप किंवा पाण्याचा सापळा-ल्युअरचा योग्य वापर करणे म्हणजे पतंग आकर्षित करणे होय.

वॉटर ट्रॅप किंवा पाण्याचा सापळा-ल्युअरचा योग्य वापर करणे म्हणजे पतंग आकर्षित करणे होय.
पिकांवरील कीड म्हणजेच अळी नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांना बर्याचदा भरपूर संघर्ष करावा लागतो. रोज फवारणी केली जाते. विविध रसायन वापर केले जातात.त्यामुळे फायदे कमी नुकसान जास्त होतात.
बऱ्याचदा असे होते की, पीक जोमात असते.उत्पन्न कमी असल्याने बाजार भाव जास्त राहतात.परंतु जास्त किडींच्या प्रादुर्भावामुळे पीक सोडून द्यावे लागतात.यासाठी जर विविध प्रकारचे सापळे वापरले तर एकात्मिक कीटक नियंत्रण करता येते. रसायन वरील खर्च कमी होतो. मधमाशी परागीकरण झाल्याने फुलगळ होत नाही त्यामुळे उत्पन्न दुप्पट होते.
      सुरुवातीला पतंग कीटक, मादी अथवा नर आपल्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा रासायनिक द्रव्य हवेत सोडतात.या द्रवाच्या गंधाने नर किंवा मादी कीटक मिलनासाठी एकमेकांकडे आकर्षित होतात.या द्रव्याला फेरोमन आणि यापासून बनवलेल्या ट्रॅपला वॉटर ट्रॅप असे म्हणतात.हे सापळे म्हणजे कृत्रिमरीत्या तयार केलेल्या फेरोमन द्रावणाने भिजवलेले जाडसर रबर असतात.त्यांच्या गंधाने नर कीटक त्या कडे येतात.आकर्षित होतात.आकर्षित होऊन त्या वॉटर ट्रॅप मध्ये अडकले जातात. व त्यांचा नायनाट होतो.ते मरून जातात. 
           किडींचे प्रकार व संख्येने निरीक्षण करण्यासाठी एकरी विविध सहा सापळ्यांचा उपयोग करावा.त्या सापळ्याच्या माध्यमातून शेतकरी मित्राला कीड नियंत्रण करता येतात.
वॉटर ट्रॅप किंवा पाण्याचा सापळा-ल्युअरचा योग्य जागी वापर करून आकर्षक केलेले पतंग त्या खाली ठेवलेल्या पाण्यात पडून मरतील.नियंत्रण मध्ये येतील.त्यामुळे होणारे नुकसान कमी होतील.
अशा प्रकारची संरचना यामध्ये केलेली असते. यामध्ये नरसाळ्याच्या आकाराच्या प्लास्टिकच्या भांड्यात पाणी ठेवतात आणि त्यावर छोट्या दांड्यांची टोपी लावून तिच्या खाली ल्युअर बसवले जातात.नरसाळे लाकडी काठीवर उभे करतात. फेरोमन ल्युवरला आकर्षित झालेले पतंग नरसाळ्या तील पाण्यात पडतात.नंतर पाण्यात पडल्यावर मरतात.
हा पाण्याचा सापळा(वॉटर ट्रॅप) वांग्यावरील शेंड अळी व फळ पोखरणाऱ्या अळी, कोबी आणि फ्लॉवर मधील हिरव्या ठिपक्याच्या पतंग नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.तसेच टोमॅटो मधील फळ पोखरणारी अळी साठी खूप कामात येतो. शेतकरी मित्र आता सर्वात जास्त वापर करत आहे. आपण सुद्धा नक्की वापर करा. आणि येणारा आपल्याला अनुभव मल सांगा.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.

फेसबुक पेज ला फॉलो करा.


टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.

Organic Farming Trainer
Nikhil Tetu
9529600161

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या