Ad Code

Responsive Advertisement

एकात्मिक किड व्यवस्थापनसाठी जैविक शेतीमध्ये शेतकऱ्यांचे परभक्षी मित्र कीटक लेडी बर्ड बिटल, प्रार्थना कीटक माहिती

जैविक शेतीमध्ये परभक्षी मित्र कीटक किडी नियंत्रणाचे काम करतात.
◾ परभक्षी कीटक - हे कीटक नुकसानकारक किडीपेक्षा आकाराने मोठे व सशक्त असतात. एक परभक्षी कीटक त्याच्या जीवनात अनेक किडींचा नायनाट करतो.
1) लेडी बर्ड बीटल
(ढाल किडे) हे परभक्षी कीटक बहुतांश पिकांवरील रस शोषण करणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे व पिठ्या ढेकूण आदी किडींवर उपजीविका करतात. मका, ज्वारी, कापूस, ऊस, कडधान्ये, भाजीपाला इत्यादी पिकांवर हे मित्रकीटक मोठ्या प्रमाणावर आढळतात. यांच्या अनेक प्रजाती आढळून येतात.
प्रसारण - 2500 प्रति हेक्टर
2) ग्रीन लेस विंग
अर्थात क्रायसोपर्ला (हिरवा जाळीदार पतंग) - या कीटकाच्या अळी व प्रौढ अवस्था या मावा, पांढरी माशी, तुडतुडे, कोळी, फुलकिडे, पिठ्या ढेकूण, खवले किडी यांच्या सर्व अवस्था व बोंड अळीची अंडी, प्रथमावस्थेतील अळ्या खातात. हे कीटक कापूस, मका, कडधान्ये व भाजीपाला पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात.
प्रसारण - 5000 अंडी प्रति हेक्टर किंवा 10 हजार अळ्या प्रति हेक्टर
3) प्रार्थना कीटक
हे मित्र कीटक निसर्गतः आढळून येतात. हे कीटक पतंगवर्गीय किडींच्या अळ्या खाऊन त्यांची संख्या नियंत्रित ठेवतात.
4) डिफा (कोनोबाथ्रा) एफिडीव्होरा
हे कीटक जैविक नियंत्रणातील उत्कृष्ट उदाहरण आहेत. उसावरील लोकरी माव्याच्या प्रभावी जैविक नियंत्रणासाठी यांचा उपयोग होतो. पूर्ण विकसित अळी 300 पेक्षा जास्त मावा किडी खाते. एक अळी पानावरील लोकरी मावा तीन ते पाच दिवसांत संपवते.
प्रसारण - लोकरी माव्याचा प्रादुर्भाव दिसून येताच 50 कोष प्रति गुंठा किंवा 1000 अळ्या प्रति हेक्टर सोडाव्यात.
5) परभक्षी कोळी (एम्ब्लीसियस)
 हे कीटक भाजीपाला, फुलझाडे व पॉलिहाऊसमधील पिकांवर नुकसान करणाऱ्या लाल कोळी व दोन ठिपक्यांच्या कोळी नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
6) सिरफीड माशी
या परभक्षी कीटकांची अळी मुख्यतः मावा या रसशोषक किडीला फस्त करतात. या कीटकांचा उपयोग ऊस, ज्वारी, मका, भाजीपाला पिकांमध्ये होतो. हे कीटक निसर्गतः मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यूट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.

फेसबुक पेज ला फॉलो करा.


टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या