Ad Code

Responsive Advertisement

कपाशी पिकातील शेतकरी मित्रांनी नक्कीच मित्रकीटकांचे संवर्धन करणे खूप आवश्यक

कपाशीतील मित्रकीटकांचे संवर्धन करणे खूपच आवश्यक
◾भारतीय कापूस पिकामध्ये आढळून येणाऱ्या १६२ कीटकांपैकी केवळ १५ कीटक पिकासाठी खूप हानिकारक आहेत. शेतातील कपाशी पिकामध्ये अनेक मित्रकीटक कार्यरत असून, ते पिकाच्या संरक्षणामध्ये मोलाची भूमिका बजावतात.त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
◾ शेतकरी मित्रांनी रसायन ची फवारणी शक्य झाल्यास एकदम कमी करावी.किंवा रसायन फवारणी करू नयेत.कीटक नियंत्रणसाठी निम अर्क,हिंग,गोमुत्र, लमीत अर्क,गो कृपा अमृत,चिकट सापळे,नवनवीन ट्रॅप वापर करणे खूप महत्वाचे ठरते.
कापसाला रोपावस्थेपासून ते वेचणीपर्यंत नुकसान करणाऱ्या प्रमुख किडी :-
▪️बोंडअळी - अमेरिकन बोंडअळी, ठिपक्याची बोंडअळी आणि गुलाबी बोंडअळी,
▪️रसशोषक किडी -  तुडतुडे, मावा, फुलकिडे, पांढरी माशी 
कापूस परिसंस्थेमध्ये पिकासाठी फायदेशीर ठरणारे विविध प्रकारचे मित्रकीटक आढळून येतात. ते पिकांवरील हानिकारक किडींची संख्या कमी करण्यास नैसर्गिकरीत्या मदत करतात. यामध्ये परभक्षक कीटक व परोपजीवी कीटकांचा प्रामुख्याने समावेश होतो. 

◾कापूस पर्यावरणात मित्रकीटकांची जैवविविधता
 1) कपाशीतील प्रमुख परभक्षक :-
              सहा वळणदार ठिपक्याचा ढालकिडा, हरीत पंखी क्रायसोपा, सिरफीड माशी, कोळी परभक्षक,  स्टिंक ढेकूण, डिप्टेरन माशी, परभक्षक माकडमाशी, मोठ्या डोळ्याचा ढेकूण. 

2)कपाशी मधील मित्रकीटक :-
             टॅक्नीड माशी, रोगस, कॉम्पोलेटिस, ॲपन्टेंलीस, ॲसेरोफॅगस पपया, ब्रॅकॉन, गांधीलमाशी, ट्रायकोग्रामा चिलोनिस. 

◾मित्रकीटकांच्या संवर्धनासाठी काय करावे .
             मित्रकीटकांच्या संवर्धनासाठी शक्यतोवर पेरणीनंतर दोन महिन्यांपर्यंत कीटकनाशकांचा वापर टाळावा.30 दिवसा नंतर निम अर्क फवारणी करावी. या काळात मित्रकीटक कापसाच्या शेतामध्ये बहुसंख्येने स्थिर होतील.परभक्षक कीटक ढालकिडा, हरित पंखी क्रायसोपा, कोळी आणि परोपजीवी  मावा परजीवी गांधीलमाशी कापसामधील तुडतुडे, मावा, फुलकिडे, पांढरी माशी यासारख्या रसशोषक किडींची संख्या मर्यादित राखण्यास मदत करतात.
▪️नीम तेल, एरंडी तेल, मासोळी तेल युक्त वनस्पतीजन्य आणि जैविक कीटकनाशकांचा  वापर करावा. 
▪️कमी विषारी असणाऱ्या कीटक नाशक, वाढनियंत्रके, बुरशी नाशकांचा वापर करावा.
▪️ कमी नुकसानकारक दुय्यम पतंग किडी (उदा. पाने गुंडाळणारी अळी, उंट अळी) यासाठी रासायनिक फवारणी शक्यतो टाळावी. या अळ्या कापसाच्या झाडाला फारच कमी इजा पोचवतात, त्यामुळे परोपजीवी कीटकांना (उदा. ट्रायकोग्रामा, ॲपेन्टॅलीस आणि सिसिरिपा) इजा पोचणार नाही. हे कीटक अमेरिकन बोंड अळीच्या नैसर्गिक नियंत्रणाचे काम करतात. 
▪️चिकट सापळे,लाईट ट्रॅप, फेरोमन ट्रॅप, तसेच नवनवीन ट्रॅप चा वापर करावा.पक्षी थांबे एकरी 20 लावावेत.राख फवारणी,कीड नाशक जिवाणूची फवारणी करावी.
▪️मिश्र पीक पद्धती वापर करावे.झेंडू फुलझाड लावावेत.तसेच भाजीपाला वर्गीय काही पिके लावावेत.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यूट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.

फेसबुक पेज ला फॉलो करा.


टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या