Ad Code

Responsive Advertisement

येणाऱ्या पावसाळामध्ये वृक्ष रोपण करूया.पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी वड, पिंपळ, उंबर , कडूनिंब झाड लावून जगवूया

"झाडे लावा, झाडे जगवा"
पावसाळा मध्ये हे काम नक्की करा.तेव्हाच उन्हाळ्यात तापमान कमी होतील.विश्रांती साठी सावली मिळणार.
वड, पिंपळ, उंबर , कडूनिंब च झाड का लावायचे ?? 
त्याचे कारण काय. पंचतत्व तसेच हिंदू संस्कृती मध्ये का महत्वाचे आहेत.झाडांची पूजा का केली जाते.
● पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यावर जास्तीत जास्त पाणी जमिनीमध्ये खोल वर जाऊन भू गर्भातील पाण्याची पातळी वाढली जाते.त्यामुळे झाड महत्वाचे आहे.
●  झाडाची मुळे जमिनीमध्ये जवळ-जवळ १ ते २ अडीच किलोमीटर खोलवर जातात पाऊस पडला की मुळ्या मार्फत पाणी जमिनीमध्ये खोलवर जाते आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते.
●  झाडाच्या पानांचा आकार मोठा आहे त्यामुळे त्याच्या पानांची गळती झाल्यावर शेतीमध्ये खत म्हणून उपयोग होतो.
●  झाडांच्या काड्यांचा हिंदू संस्कृती परंपरा मध्ये  होम-हवन साठी उपयोग करतात.त्यामुळे वातावरण शुद्ध होते.आजार कमी होतात.
●  झाडांची सावली इतकी गारद असते खूप प्रमाणात सावली त्यापासून मिळते. पृथ्वी वरील सर्व सजीव सृष्टी ना सावली देते.
●  झाडाखालच्या मातीचा उपयोग जिवामृत बनवण्यासाठी करता येतो.खत बनविण्यासाठी होतो.
●  झाडाच्या खालच्या मातीमध्ये सुपीकता आणि जिवाणू बनवण्याची क्षमता खूप आहे.त्यामुळे फवारणीसाठी सुद्धा उपयोग करू शकतो.
●  शेतकऱ्यासाठी आणि मानव जातीच्या फायद्यासाठी झाड हे खूप महत्वाचे,अनमोल खजिना आहे.
●  झाडाचे आयुर्वेदिक उपचारासाठी उपयोग पण खूप होतो.प्राचीन काळात ऋषी मुनी सुद्धा वापर करत होते.
● या झाडांच्या कार्यात ऑक्सिजन सुद्धा खूप प्रमाणत देण्याची ताकद  असल्याने नेहमी झाडाची हवा आरोग्य कारक असते
●जमिनीमध्ये जास्तीत जास्त पावसाचे पाणी पोहचले तर जमिनीची उष्णता कमी होईल. पाण्याची पातळी वाढ होतील.दुष्काळ हा प्रश्न तयार होणार नाही.

●वडाच्या झाडाची पूजा केली जाते का.
हिंदू संस्कृती मध्ये एक अशी परंपरा आहे की तिथे झाडाची सुद्धा पूजा केली जाते.झाड सुद्धा लावले जातात.झाडाला महत्व दिले जातात.झाडाचे आयुष्य जास्त दिवस टिकून राहावे त्यासाठी झाडांची देखरेख सुद्धा करतात. गमतीची गोस्ट म्हणजे प्रत्येक घारातील सुवासिनींना पूजा करण्यासाठी, दोरा बांधण्यासाठी वडाची गरज आहे.

◾अजून बरेच असे खूप फायदे वडाच्या झाडापासून मिळतात.
मागच्या 25 ते 30 वर्षांत वड खूप प्रमाणात नामशेष झालेत.विकासाच्या नावावर. रस्ते बांधणी नावावर. घर पडतात नावावर.वन्य प्राणी त्रास देतात नावावर.काही उपयोग नाही या नावावर.
रस्त्याच्या दुतर्फा मध्ये खूप मोठी विशालकाय वडाची झाडे होती त्याची खुप मोठ्या प्रमाणात कत्तल गेल्या 5 वर्षात केली गेली. गावातील पाणवढ्याला वडाचे झाडे खूप होती ती सुद्धा नामशेष झालीत.
◾आपण काही झाले तरी येणाऱ्या 
पावसाळ्यात कितीही किंमत असो किंवा काय का होईना.लोक काही पण मन्हो.काही पण बोलो.पण  एक वड, पिंपळ, उंबर , कडूनिंब च  झाड लावणार असा संकल्प आपण घेऊया. स्वार्थ पणा सोडून झाड लावून त्याला जगवूया. त्याला अन्न ,पाणी उपलब्ध करून देऊया.
आणि प्रत्येक मनुष्याला , व्यक्तीला, जनतेला  याची माहिती देऊन झाड लावण्यासाठी प्रेरित करू.

◾◾◾वसुंधरेचा आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. जागतिक पर्यावरण दिवसाच्या सर्व शेतकरी मित्रांना मनपूर्वक शुभेच्छा.
"झाडे लावा,झाडे जगवा,निसर्ग वाचवा,माती वाचवा,पाणी वाचवा."  येणाऱ्या पुढील पिढीच्या भविष्याचे विचार करा.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या

यट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.

https://youtube.com/channel/UCMgI-5G6wRzARE-CbSWf8uA

फेसबुक पेज ला फॉलो करा.

https://www.facebook.com/nikhil1mitr/

https://www.facebook.com/100102642144899/posts/315558533932641/

टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.

https://t.me/+Xe_Kx5pSrxdhZjRl

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या