Ad Code

Responsive Advertisement

पालेभाज्यांचे आपल्यासाठी औषधी माहिती आणि गुणधर्म .सेवन केल्याने होणारे फायदे

काही पालेभाज्यांचे आपल्यासाठी औषधी माहिती आणि  गुणधर्म. जैविक पद्धतीने पिकवलेल्या पालेभाज्यांचे सवर्धन करणे. आरोग्यासाठी नेहमी वापर करायला पाहिजे.
१ ]  कोथिंबीर(धनिया) :-  उष्णता कमी करणारी, पित्तनाशक असते. हृदरोगावर अतिशय उपयुक्त आहे.
२ ]  गोडलिंब :-  पित्तनाशक व कृमीनाशक म्हणून याचा उपयोग होतो. 
३ ]  पालक :-  मूत्रसंस्था, पचनसंस्था यांच्या आतील सूजेला मऊपणा आणण्यास उपयुक्त असून दमा व खोकला कमी करणारी आहे. 
४ ]  माठ :-  हृदयाच्या कार्याला उपयोगी असून ही भाजी खाल्यावर शौचाला साफ होते. 
५ ]  चाकवत(ताकभाजी) :-  ही पचण्याला सुलभ असून ज्वरनाशक आहे. त्वचेला कांती देणारी अशी ही भाजी आहे. ही भाजी कृमीनाशक असून यकृताच्या सर्व विकारांवर उपयुक्त आहे. 
६ ]  हादगा (हेटा):-  खोकला, पित्त, हिवताप कमी करणारी ही भाजी आहे. या भाजीच्या फुलाच्या रसाचे दोन थेंब काही दिवस डोळ्यात घातल्यास रातआंधळेपणा नाहीसा होतो असे म्हणतात. हा फुलांचा रस मधातून घेतल्याने छातीतील कफ लवकर सुटतो. 
 ७ ]  अळू(कंबर मोडी पाला)  :-   याच्या पानांचा व दांड्यांचा रस जंतुनाशक आहे. त्यामुळे शरिराच्या कापलेल्या भागावर याचा रस लावून पट्टी बांधल्यास जखमा लवकर भरून येतात. याचा रस साखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास मूळव्याध कमी होते.
 ८ ]  अंबाडी :-  मीरपूड व साखर यांच्याबरोबर अंबाडीचा रस प्राशन केल्यास तो पित्तनाशक ठरतो. 
९ ]  घोळ :-  मूळव्याध कमी करण्यास ही भाजी उपयुक्त आहे. शिवाय ती खाल्ल्यामुळे लघवी साफ आणि भरपूर होते. 
१० ]  मायाळू :-  अंगावर पित्त उठले असताना याच्या पानांचा रस आंगाला चोळल्यास पित्त कमी होते. लहानमुलांना थंडी खोकला झाला असताना मायाळूच्या पानाचा रस चमचाभर देतात. 
११ ]  तांदुळजा:-   बाळंतीणीला दूध वाढवण्यास ही भाजी उपयोगी ठरते. 
१२ ]  मेथी :-  सारक व पथ्यकर असलेल्या या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण बरेच आहे. याचे बी वातहारक व शक्तिकारक असते म्हणून बाळंतपणात याचा उपयोग केला जातो. दूधवाढीसाठीही त्याचा उपयोग होतो. मेथ्यांचे पीठ तोंडाला लावल्यास चेहर्‍यावरील सुरकुत्या नष्ट होतात व चेहरा तजेलदार दिसतो. 
१३ ]   शेपू  :-  वातनाशक व पोटदुखी कमी करणारी अशी ही भाजी आहे. 
१४ ]  शेवगा :-  ही भाजी वातनाशक व पित्तनाशक आहे. हृदय व रुधिराभिसरण क्रिया यामुळे सुधारतात. 
१५ ]  सॅलड :-  या भाजीमध्ये लेसीथीन नावाचे द्रव्य असते. मजासंस्थेचे कार्य सुधारण्यास त्यामुळे मदत होते. मेंदूवर जास्त ताण पडणार्‍यांनी नियमित सॅलड खावे.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यूट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.


टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या