Ad Code

Responsive Advertisement

जाणून घेऊया मधाचे प्रकार आणि मधाची वैशिष्टे व गुणधर्म.

प्राचीन काळापासून विविध व्याधींवर तसेच आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मधाचा औषध म्हणुन उपयोग होत आहे.मधाचा उपयोग खूप काही काळापासून केला जात आहे.तसेच मधमाशी सवर्धन सुद्धा खूप काही शेतकरी वर्ग करत आहे.कारण मधाचा उपयोग मनुष्य आपल्या आरोग्यासाठी करत आहेत. व 
मध रक्तात लवकर मिसळत असल्याने त्वरीत कार्यशक्ती मिळते.शरीराला चालना मिळते.रोग प्रतिकाशक्ती वाढते. मधात क्षार , जीवनसत्वे , आम्ले , प्रथिने , प्रेरके इ . घटक विपुल प्रमाणात असल्याने आपल्या शरीरात या घटकांची कमतरता भरून निघते.शरीर निरोगी राहते.अती जास्त थकवा ,परिश्रम नंतर एक चमचा मध पाण्यातुन घेतल्यास उत्साह वाढतो.कमजोरी दूर होतात.
    आधुनिक पद्धतीने मधमाशा पालन व्यवसायात ◾एपिस सिराना इंडिका ( भारतीय सातेरी मधमाशा ) ◾ एपिस मेलिफेरा ( इटालियन अथवा यूरोपियन ) या दोन पाळीव मधमाशांच्या जातींचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात आहेत . मधमाशांच्या नैसर्गिक सवयीनुसार विविध ठिकाणी जंगल व पिक फुलोरा ठिकाणी स्थलांतरीत ( मायग्रेशन ) केल्या जातात , त्यामुळे अनेक प्रकारच्या फुलावरील मकरंद - पराग गोळा करून तो शास्त्रीय पद्धतीने मधमाशांची हानी ( हत्या ) न करता अहिंसक पद्धतीने मधुनिष्काषण यंत्राद्वारे फक्त मधुकोठीतीलच ( सुपर चेंबर्स ) शुद्ध मध
 ( रॉ हनी ) मिळविला जातो.
जाणून घेऊया मधाचे प्रकार 
                       आणि मधाची वैशिष्टे :- 
  जांभुळ मध :- रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवले जाते.कॅन्सर व मधूमेही रुग्णांसाठी उपयुक्त , अति तहान लागणे. वारंवार लघवी होणे यावर नियंत्रण आणि समस्या दूर करतो . 
ओवा मध :- पचन संस्थेच्या विकारावर उपयुक्त , गॅसेस व खोकला यावर गुणकारी . या मधातुन ओमेगा -६ अँटी ऍसिड्स मिळतात.पित्त , अपचन यापासुन आराम मिळतो.दात दुखी , सर्दी , ताप बरा होतो.जखमा लवकर भरून निघतात .मधूमेहांसाठी उपयोगी.
मल्टीफ्लोरल मध :- विविध फुलोऱ्याचा एकत्रित मघ म्हणजे जणू ' अमृतच ' अपचन , पेशी नियमन या मधाच्या सेवनाने मेंदुयुक्त यंत्रणा यांना चालना मिळते . हाडे बळकट होतात . रक्तशुद्धीकरण होते. अतिशय चविष्ट सर्वांना आवडणारा मध.
सूर्यफुल मध :- ताप , सर्दी , खोकला यावर उपयोगी . फुफ्फुस - मूत्रपिंड यांचे रोगांपासून संरक्षण करतो . मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट् असल्याने हृदय आणि धमन्यामधील अडचण दूर करतो .वजन कमी करण्यासाठी वापर केला जातो .
धनिया मध :- इन्सुलिन पातळी नियंत्रणात राखली जाते.यकृत निरोगी ठेवतो .बुद्धीचा विकास होतो.
 तुळस मध :- सर्दी , खोकला कमी करण्यासाठी , घशाचे विकार दूर करण्यासाठी अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म असलेला मध आहे.
निलगिरी मध :- रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी , संसर्गाचा बचाव करतो , श्वसन आणि मुत्रविकार समस्या दूर ठेवतो .
अकेशिया मध :- फ्रुक्टोजचे प्रमाण खूप जास्त , यकृत व आतड्याचे फुफ्फुसाचे विकार दूर करतो . 
कडुनिंब मध :- दाहक व खोकला विरोधी , उच्च रक्तदाबावर फायदेशीर , त्वचेचे विकार दूरक करतो , दात दुखी , संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करतो .चेहरा व मानेवरील पुण्ठ कमी करतो .
 बोरी मध :- डोळ्यांसाठी उपयुक्त , आतड्याच्या कर्क रोगापासून रक्षण करतो .मोठ्या प्रमाणात एैन्थोसायनीन फ्लॅव्होनाइड्स आढळते .दाहक विरोधी गुणधर्म .
शिसम मध :- पचनशक्ती वाढीसाठी , ऊर्जा निर्माण करतो . नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणुन ओळखला जाणारा मध.
 कश्मिरी मध :- त्वचा मुलायम बनविते , रोगप्रतिकारक शक्ती वाढुन आयुष्य वाढते .कश्मिरी फुलांचा मकरंद असल्याने अधिक गोडवा असतो.
लिची मध :- जीवनसत्वे क , ब -६ , नायसिन , रायबोफ्लॅवीन , पोटॅशिअम , मॅग्नेशिअम यांचा भरपुर स्त्रोत .
या 
सर्व प्रकारच्या मधासाठी तसेच इतर परागकण , मेण , रॉयल जेली , बी व्हेनम , गोंद व मधमाशापालन व्यवसायाचे शास्त्रीय पद्धतीचे प्रशिक्षण आणि मधमाशापालन साहित्य , पाळीव मधमाशांच्या वसाहतीसाठी .

मधमाशी वाचवा.शेती फुलवा.निसर्ग वाचवा.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यूट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.

फेसबुक पेज ला फॉलो करा.


टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या