आपण सुद्धा चांगला निंबोळी अर्क घरी बनवु शकतो. निंबोळी अर्क म्हणजे काय ?
निंबोळी अर्क म्हणजे कडुलिंब या झाडाच्या सुकलेल्या किंवा वाळलेल्या बियांपासून, ज्यांना निंबोळ्या (किंवा निंबोण्या) म्हणतात, त्यापासून काढलेला अर्क होय.त्यामध्ये गोमूत्र आणि गूळ सुद्धा वापर करणे गरजेचे असतात.
◾महत्वाचा घटक व कार्य: -
कडुलिंबाच्या झाडामध्ये असलेले 'ॲझाडिराक्टीन' कीटकनाशकाचे काम करते. या घटकाचे प्रमाण याच्या बियांमध्ये जास्त प्रमाणात असते, .तर ते पानांमध्ये प्रमाणात असते.या निंबोळ्यांपासून तयार केलेल्या अर्काचा पिकांवरील बऱ्याच किडींवर हवा तो परिणाम होतो.मावा, अमेरिकन बोंड अळ्या, तुडतुडे पाने पोखरणाऱ्या व देठ कुरतडणाऱ्या अळ्या, कोबीवरील अळ्या,फळमाश्या, लिंबावरील फुलपाखरे,खोडकिडा आदी अनेक किडींवर याचा प्रभाव पडतो व त्यांचा बंदोबस्त होतो.
◾करण्याची पदधत: (५ % द्रावण )
(५ % द्रावण )
◾आवश्यक सामुग्री:
५% शक्तीचे १०० लिटर निंबोणीचा अर्क तयार करण्यासाठी
◾कडुनिंबाच्या निंबोण्या (पूर्णपणे सुकलेल्या) – ५ किग्रॅ
◾पाणी (चांगले व स्वच्छ) – १०० लिटर
◾ साबण (२०० ग्रॅम)
◾ गाळण्यासाठी कापड
पद्धत :-
५ किलो निंबोळ्या ह्या बारीक करून कपड्यात बांधून ती सुमारे 12 तास पाण्याने भरलेल्या बादलीत ठेवाव्यात. मग त्या काढून त्यात जरुरीप्रमाणे १०० ते २०० ग्राम साबणाचा चुरा टाकावा अथवा साबणाची पेस्ट करून त्यात मिळवावी. याला चांगले ढवळून घ्यावे. नंतर हे मिश्रण १०० लिटर बनेल इतके पाणी त्यात टाकावे. या अशा प्रकारे तयार झालेल्या द्रावणास ५% द्रावण असे म्हणतात.
बनवण्याची पद्धत
1. गरजेप्रमाणे निंबोण्या ( ५ किग्रॅ ) घ्या
2. त्या दळून त्यांची पावडर बनवा
3.१० लिटर पाण्यात ही पावडर रात्रभर भिजवा.
4. दुसर्या दिवशी सकाळी लाकडी काठीने हे पाणी दुधासारखे पांढरे दिसेपर्यंत ढवळा
5. दुहेरी कापडातून गाळून घ्या.
6. 1 लिटर पाण्यात 200 ग्रम साबणाचा चुरार टाका व चांगली पेस्ट बनवा.
7.गाळुन घेतलेल्या लिंबोळी अर्क द्रावणात साबनाची पेस्ट टाका.
वरील प्रमाणे 10 लिटर लिंबोळी अर्क द्रावण तयार होईल
वरील प्रमाणे बनवलेले द्रावन हे खालील प्रमाणे 90 लिटर पाणी टाकुन 100 लिटर बनवा अथवा प्रत्येक 09 लिटर पाण्यात आवशकतेप्रमाणे 1 लिटर मिसळा व फवारणी करा.
फवारणी कशी करावी:
फवारणी करतांना वरील बनवलेले 1 लिटर लिंबोळी अर्क द्रावण + त्यात 9 लिटर पाणी टाकुन फवारणी करावी.
काही महत्वाच्या सुचना :--
1. निंबोण्या धरतेवेळीच झाडावरून गोळा करा आणि सावलीत वाळवा.
2. आठ महिन्यांपेक्षा जुन्या निंबोण्या वापरू नका कारण इतक्या जुन्या बियांमध्ये जरूर ती कीडनाशक शक्ती राहात नाही नेहमी निंबोण्यांचा ताजा अर्क (NSKE) वापरा.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या यूट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.
टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560
0 टिप्पण्या
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र
कु- हा , अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू 9529600161