"Ph म्हणजे काय❓
फवारणीच्या पाण्याचा सामू (PH)किती असावा"
Ph (Potential of Hydrogen) संभाव्य हायड्रोजन.
Ph हा शेतीसाठी व आपल्या दैनदिन जीवनासाठी खुप महत्वाचा आहे. कारण Ph मुळे हे समजते की, रसायन हे असिडीक आहे किंवा नॉन असिडीक आहे. आपल्याला असिडीटी झाली होती तेव्हा आपली परिस्थिती काय झाली होती हे आपल्यालाच माहिती. पण याचा अर्थ असा नव्हे की, नॉन असिड चांगले आहे. कारण सजीवांच्या जीवनासाठी ठराविक स्तरापर्यंत असिड हि महत्वाचे आहे. म्हणजेच आपल्याला हे समजले पाहिजे की, असिड व नॉन असिड कसे ओळखायचे व हे मोजायचे मापक म्हणजे PH काय आहेत.
हायड्रोजन
हे रसायन शास्त्रामध्ये Positive व Negative चार्ज मोजण्यासाठी वापरतात.
PH ची व्याख्या अशी करता येऊ शकते की, PH हे नंबरांचे प्रमाण आहे. ते दाखवते द्रव्याचे असिड व नॉन असिड गुणधर्म
हे नंबर 1 ते 14 मध्ये मोजले जातात. जर नंबर 7 पेक्षा कमी आले. तर ते द्रव्य असिड मानले जाते. व जर ते नंबर 7 पेक्षा जास्त आहे तर ते नॉन असिड मानले जाते. व 7 ही संख्या तटस्थ मानली जाते.
नैसर्गिक पाण्याचा PH :- 7 असतो. व तो तटस्थ मानला जातो. म्हणजेच असिड पण नाही आणि नॉन असिड पण नाही. PH जसे शेतीसाठी महत्वाचे आहे.खालील
संख्यावरून साधारण प्रकार पडतात.
3.5 :- जहार अॅसिड....
3.5 - 4.4 :- अत्यंत अॅसिडिक....
4.5 - 5.0 :- अतिशय जोरदार अॅसिड...
5.1 - 5.5 :- जोरदार अॅसिड.....
5.6 - 6.0 :- माफक अॅसिड.....
6.1 ते 6.5 :- किंचित अॅसिड.....
6.6 - 7.3 :- तटस्थ (नैसर्गिक)......
7.4 - 7.8 :- किंचित नॉन अॅसिड....
7.9 ते 8.4 :- माफक नॉन अॅसिड.....
8.5 - 9.0 :- जोरदार नॉन अॅसिड.....
9 :- अतिशय जोरदार नॉनअॅसिड...
PH खूप महत्वाचा विषय आहे.
फवारणीसाठी पाण्याचा सामू (PH) जास्त महत्वाचं असतो टीडीएस नाही.कोणतेही औषध मारताना जवळपास 1% औषध व 99% पाणी च आपण फवारणी करतो अशा वेळी पाणी जर योग्य गुणवत्तेचे नसेल तर फवारणीचा फारसा फायदा होनार नाही.
फवारणीचा चांगला अपेक्षित असा रिझल्ट न मिळणे.
फवारणीमधील बुरषीनाषक पावडर ची थाळ (थर) टाकीच्या खालील भागात फवारणी नंतर शिल्लक राहणे.
औषधे एकसारख्या प्रमाणात पाण्यात मिक्स न होणे. इत्यादी लक्षणे हे आपल्या फवारणीच्या पाण्याचा सामू अधिक असण्याचे आहेत.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या यूट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.
टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560
0 टिप्पण्या
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र
कु- हा , अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू 9529600161