Ad Code

Responsive Advertisement

"जमिनी मधील क्षारयुक्त पाण्यामुळे होणारे पिकांना आजार.त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी पाणी परीक्षण करणे खूप महत्वाचे आहे."

"जमिनी मधील क्षारयुक्त पाण्यामुळे होणारे पिकांना आजार.त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी क्षारयुक्त पाण्याचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी पुढील उपाययोजना नक्की करायला पाहिजेत"

मातीची क्षारता 
माती परीक्षणामुळे मातीत विरघळलेल्या क्षारांचं प्रमाण किती आहे म्हणजेच तिची क्षारता किती आहे , ते कळतं . 
माती परीक्षण अहवालात जर मातीची क्षारता १ पर्यंत आली तर उत्तम ! पण जर ती १ पेक्षा जास्त असेल तर मात्र मातीच्या दर्जात गडबड आहे . असे नक्की समजून घ्यावेत.
१) जर पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण कमी असेल आणि काही प्रमाणात युक्त कार्बोनेटस असतील तर अशा पाण्यात अधूनमधून १५० ते २०० ग्रॅम फेरस अमोनियम सल्फेट किंवा फेरस सल्फेट वापरावे.
२) पाण्यात मध्यम प्रमाणात क्षार असतील व चुनखडी कमी असेल तर पाणी जीप्समच्या पिशवीतून प्रवाहित करावे. 
३) सेंद्रिय खतांचा वापर करावा. निविष्ठांचा वापर करावा.सेंद्रिय शेती पद्धती शेतात वापर करावा.
४) पिकाच्या गरजेनुसार व योग्य प्रमाणात ओलित करावे.तसेच झाडांना लागेल तेवढ्या स्वरूपात पाणी द्यावेत.
५) पिकांची फेरपालट करावी.त्यामुळे पिकांचा दर्जा सुधारतो.पिकांचा उत्पादनात वाढ होते.
६) आच्छादनाचा वापर करावा उदा. ऊसाचे पाचट, पोलिथिन पेपर, साग वृष चे पान सुद्धा वापर करू शकतो.
७) पिकांची लागवड सरीच्या बगलेत करावी म्हणजे क्षारयुक्त पाण्याचा पिकाशी थेट संपर्क येणार नाही.
८) अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्यासाठी योग्य अंतरावर चर खणावेत.क्षारयुक्त पाण्याबरोबर गोडे पाणी उपलब्ध असल्यास आलटून पालटून दोन्ही प्रकारचे पाणी वापरावे.
९) शिफारशीपेक्षा ३५ टक्के अधिक नत्र पाणी अल्कधर्मी असल्यास दयावे.क्षारांचा ताण सहन करणारी पिके घ्यावीत. उदा. गहू, कापूस, बार्ली (सातू) करडई, सुर्यफुल इ.
अशा प्रकारे पाणी परीक्षण अहवालानुसार पीक लागवड, मशागत तंत्र व पाणी व्यवस्थापन केल्यास पाण्याचा कार्यक्षमरित्या वापर तर होईलच परंतु जमिनीचे प्राकृतिक गुणधर्मावर कुठल्याही प्रकारचे विपरीत परिणाम न होता जमिनीची सुपीकता व पिकांची उत्पादकता वाढवण्यास नक्कीच मदत होईल.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यूट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.


टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या