Ad Code

Responsive Advertisement

"एक जबरदस्त पॉवरफुल टाॅनिक उंबर फळांचे"

"नमस्कार मित्रांनो
आज तुम्हाला एक जबरदस्त पॉवरफुल टाॅनिक बद्दल माहिती सांगत आहे."
साहित्य :-
• उंबराची पिकलेली फळे 1किलो.  
• परात (भांडे) 
• काळा गुळ 1किलो.
• काचेची बरणी (चिनी मातीची बरणी) किंवा प्लॅस्टिकची बरणी. 
बनवण्याची कृती :- 
प्रथम गुळ बारिक करून घ्या. एखाद्या परातीमध्ये पिकलेली उंबराची पिकलेली फळे चांगली बारीक कुस्करून घ्या. नंतर, चांगले बारीक केलेले गुळ उंबरावर टाकून एकजीव होईपर्यंत कालवून घ्या, नंतर ही पेस्ट बरणी मध्ये भरून सावलीमध्ये ठेवा.
       दररोज सकाळी बरणी चे तोंड मोकळे करा. जेणेकरून बरणी च्या आतील गॅस बाहेर निघून जाऊ द्या. हे द्रावण सावलीमध्ये 10दिवस ठेवायचे आहे. दहा दिवसानंतर हे द्रावणाचे टाॅनिक तयार होते. 
महत्वाची सुचना :- अती आवश्यक.
उंबराव्यतीरीक्त कोणतेही फळ वापरू नये. 
वापरण्याची पद्धत :- 
फवारणीचे प्रमाण पंपाला 100मिली.
मित्रांनो हे एक संजिवक आहे. लागवडीनंतर हे पंधराव्या दिवशी फवारणी करू शकता. 
निरिक्षण व प्रत्यक्ष अनुभव :- 
पिकाच्या कोणत्याही अवस्थेत हे फवारता येते. 
फायदे :- 
पिकांची वाढ एकसमान होते, फुलांची संख्या भरपूर प्रमाणात वाढते. फळांचा आकार एकसमान होतो. फळांवर एक चांगली चमक (काॅलेटी)वाढते.
सल्ला :- 
अॅमिनो अॅसिड, गारबेज एन्झाईम्स बरोबर फवारणी केली तरी चालते. मित्रांनो सेंद्रिय शेती करा. सम्रुद्ध व्हा विषमुक्त शेती काळाची गरज आहे. 
हे वापरून सर्वस्वी तुमच्या हातात आहे. 
शेवटी तुमची साथ असावी, हिच एक अपेक्षा.  धन्यवाद शेतकरी मित्रांनो.
 मी सय्यद गणी हुसेन उर्फ गणीभाई
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यूट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.


टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या