"सोयाबीन तसेच इतर पिकांची बीजप्रक्रिया कशी करावी.
बीजप्रक्रिया म्हणजे काय?"
कृषि उत्पादन वाढीमध्ये बीजप्रक्रिया हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. बियाणे जमिनीत पेरण्यापूर्वी जमिनीतून किंवा बियाण्यातून पसरणारे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच बियाण्याची उगवण क्षमता वाढविण्यासाठी व रोपे सतेज आणि जोमदार वाढविण्यासाठी बियाण्यावर वेगवेगळी जैविक व रासायनिक औषधांची प्रक्रिया केली जाते, याला बीजप्रक्रिया असे म्हणतात.
बीजप्रक्रियेचे फायदे:
१. जमिनीतून व बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो.बियाण्याची उगवणक्षमता वाढते.रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात.
२.पिकाच्या उत्पादनात वाढ होते.बीजप्रक्रियेसाठी कमी खर्च येतो, त्यामुळे ही कीड/रोग नियंत्रणाची किफायतशीर पद्धत आहे.
अ) जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया:
◾ नत्र स्थिरीकरणासाठी सोयाबीन गटाचे (Rhizobium japonicum) रायझोबिअम २५० ग्रॅम आणि स्फुरद विरघळवणारे जिवाणू २५० ग्रॅम या जिवाणूसंवर्धकाचे पाकिट प्रति १० किलो सोयाबीन बियाण्यास वापरावे.
◾ १ लिटर गरम पाण्यात १२५ ग्रॅम गूळ टाकून द्रावण तयार करावे.
◾ सोयाबीन बियाणे ओलसर करून घ्यावे.
३.द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये २५० ग्रॅम जिवाणू संवर्धक टाकून बियाण्यास हळुवारपणे लावावे किंवा जिवाणू संवर्धकाचा लेप बियाण्यावर समप्रमाणात बसेल व बियाण्यांचा पृष्ठभाग खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी.
४.नंतर बियाणे सावलीत स्वच्छ कागदावर सुकवावे.अशा बीजप्रक्रिया केलेल्या बियाण्याची पेरणी ताबडतोब करावी.याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत नाही.
५. जमिनीतील सेंद्रीय पदार्थ कुजवून जमीन सुधारण्यास मदत होते.
जिवाणू संवर्धक बीजप्रक्रियेबाबतची दक्षता:
१. जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया ही बुरशीनाशके किंवा कीटकनाशकांची प्रक्रिया केल्यानंतर करण्यात यावी.
२. जिवाणू संवर्धक लावण्यापूर्वी जर बियाण्यास कीटकनाशके, बुरशीनाशके, जंतुनाशके इ. लावलेले असतील तर जिवाणू संवर्धक नेहमीपेक्षा दीडपट जास्त प्रमाणात लावावे.
ब) जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करणे:
१. सोयाबीन पिकावरील अनेक प्रकारच्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्रति किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा वापरावे.
२. ट्रायकोडर्मा ही एक प्रकारची बुरशी असून ती पिकांना हानीकारक नसते उलटपक्षी बियाण्यांवर वरील रोग पसरविणाऱ्या बुरशींची वाढ न होऊ देता जमिनीमध्ये रोगकारक बुरशींचा नायनाट करून पिकांचे संरक्षण करते.
३. ट्रायकोडर्मा बीजप्रक्रिया करताना बियाणे स्वच्छ फरशी, प्लॅस्टिक किंवा ताडपत्रीवर पातळ थरात पसरवून ट्रायकोडर्मा ओलसर करून शिंपडावे. नंतर हलक्या हाताने बियाण्यास चोळावे.
४. प्रक्रिया केलेले बियाणे अर्धा तास सावलीत सुकवून पेरणी करावी.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या यूट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.
फेसबुक पेज ला फॉलो करा.
टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560
0 टिप्पण्या
जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र
कु- हा , अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू 9529600161